Type Here to Get Search Results !

जैष्ठ गौरी पूजा विधी व विसर्जन २०२१ महाराष्ट्र | Jyeshtha gauri pujan vidhi marathi Gauri visarjan 2021 marathi

जैष्ठ गौरी पूजा विधी मराठी माहीती | गौरी आव्हान व विसर्जन पूजा विधी मुहूर्त तारीख 2021 महाराष्ट्र | Jyeshtha gauri pujan vidhi Gauri visarjan 2021 in marathi 

जैष्ठ गौरी पूजा विधी मराठी माहीती


गौरीपुजन [ Gauri pujan 2021 marathi ] म्हणजेच महालक्ष्मी पुजनाचा दिवस.हा सण गणेश चतुर्थीच्या नंतर येत असतो.म्हणुन यास गौरी गणपती म्हणुन देखील संबोधले जाते.आणि हा सण महाराष्टातील सर्व स्त्रियांसाठी एक खुप महत्वाचा सण म्हणुन देखील प्रचलित आहे.

म्हणुन आजच्या लेखातुन ह्याच महत्वाच्या गौरीपुजनाच्या सणाविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.


गौरी पूजन विधी व विसर्जन 2021 (toc)


जैष्ठ गौरीपुजन 2021 म्हणजे काय ? |Gauri avahan 2021 Marathi

गौरीपुजन २०२१ हा महाराष्ट्रात साजरा केल्या जात असलेल्या सणांपैकी एक विशेष सण आहे.जो महिलांसाठी असतो.गौरीपुजनलाच आपण महालक्ष्मी पुजन असे देखील म्हणत असतो.आणि हा सण गणपती बाप्पाच्या आगमनानंतर साजरा केला जातो.म्हणुन ह्या सणाविषयी अशी देखील समजुत आहे की गौरी म्हणजेच गणपती बाप्पाच्या बहिणी आहेत.गणपतीच्या आगमनानंतर लगेच त्यांच्या बहिणी गौरी देखील आपल्याकडे येत असतात.


गौरी म्हणजे काय ? | Jyeshtha gauri pujan vidhi in marathi

जर आपण संस्कृतमधील शब्दकोशांचा अभ्यास करावयास गेलो तर आपणास असे दिसुन येते की गौरी ह्या शब्दाचा अर्थ आठ वर्षाची असलेली कन्या असा होत असतो.आणि गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे.एवढच नव्हे तेरडयाची जी फुले असतात त्यांना देखील गौरी असे संबोधिले जात असते.आणि गौरीलाच आपण सर्व महालक्ष्मी देखील म्हणतो.आणि लक्ष्मी ह्या दोन आहेत एक भगवान श्रीहरि विष्णु यांची पत्नी तसेच देवाधीदेव महादेव यांची पत्नी पार्वती ह्या दोघींनाही लक्ष्मी म्हणुन आपण पुजत असतो.पण या दोघींमध्ये देवी पार्वती ह्या ज्येष्ठा गौरी म्हणुन ओळखल्या जात असतात.


गौरीपुजनाचे स्वरुप कसे असते? महालक्ष्मी पूजनाचे स्वरूप 

घरोघरी गौराईची स्थापणा ही अनुराधा नक्षत्राच्या दिवशी प्रत्येक घरात एकुण तीन दिवसांसाठी केली जात असते.पहिल्या दिवशी तिचे आपल्या घरात आगमन होत असते.म्हणजेच गौरीची स्थापणा केली जात असते.दितीय दिनी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्राच्या दिवशी तिची घराघरात श्रदधेने पुजा केली जात असते.आणि मग शेवटी त्रितीय दिनी मुळ नक्षत्राला अष्टमीच्या दिवशी तिचे विसर्जन केले जात असते.


गौरीपुजनाचा पुजा विधी काय आहे? | Jyeshtha gauri pujan vidhi in marathi

ग्रामीण क्षेत्रामध्ये पाहावयास गेले तर ह्या दिवशी सर्व सवाशिन स्त्रिया नदीवर जात असतात.आणि जाता जाता गाणी म्हणत असतात आणि त्या गाण्यांमध्ये त्यांनी आपापल्या माहेराचा उल्लेख देखील केलेला असतो.मग गाणी म्हणता म्हणता त्या नदीवर जातात आणि मग तिथे नदीतुनच चार पाच खडे उचलत असतात आणि तिरडयाचे पान वाहत आपली पुजा संपन्न करत असतात आणि मग उचललेली खडेच गौर म्हणुन आपल्या घरी घेऊन जात असतात.अशा पदधतीने ग्रामीण क्षेत्रात गौरीपुजन केले जात असते.

पण शहरात असे अजिबात होत नसते.शहरात आपल्या स्वताच्या घराच्या अंगणातुनच म्हणजेच आपल्या घराच्या परसबागेत लावलेल्या तुळशी वृंदावनापासुनच

तिला घरात आणले जात असते.घरात प्रवेश करत असतानाच तिने दारात ठेवलेले धान्याच्या मापाला पाय लावुन घरात प्रवेश करायचा असतो.कारण तिची पावले ही अत्यंत शुभ मानली जात असते.मग तिला घरात आणल्यानंतर जिच्या हातात गौराई असते तिचे पाय धुवले जातात.तिला इतर स्त्रियांकडुन हळद कुंकु लावले जात असते.

ह्या दिवशी प्रत्येक घरासमोर रांगोळी देखील काढली जात असते.मग गौराईचा आपल्या घरात सदैव निवास राहावा यासाठी तिला संपूर्ण घरातुन फिरवले जात असते.मग तिला एका ठिकाणी स्थानापन्न केले जात असते.आणि तिने सदैव आपल्या घरातच वास करीत राहावे यासाठी हात जोडुन तिला प्रार्थना करायची असते.

आणि मग शेवटी प्रथम दिनी आगमन,दितीय दिनी नैवेद्य दाखवुन पुजन करून झाल्यानंतर अखेर त्रितीय दिनी गौरीला शेवटचा निरोप दिला जात असतो.म्हणजेच तिचे विसर्जन केले जात असते.


गौरीच्या स्थापणेचा,विसर्जनाचा मुहुर्त काय आहे?gauri pujan 2021 muhurat time

गौरी पूजन कधी आहे 2021 स्थापणेचा मुहर्त :

गौरीची स्थापणा १२ सप्टेंबरला रविवारी केली जाणार आहे.आणि ही स्थापणा १२ सप्टेबरला ९ वाजुन ४९ मिनिटांनंतर कधीही करू शकतो. 

गौरी विसर्जनाचा कधी आहे 2021  मुहुर्त :

 १४ सप्टेंबर रोजी अष्टमीच्या तिथीच्या दिवशी सकाळी ७ वाजुन ४० मिनिटांनंतर आपण कधीही गौरीचे विसर्जन करू शकतो.


गौरीचे विसर्जन कसे करावे गौरी केले जाते? | Gauri visarjan 2021 date maharashtra

  • गौरी विसर्जनाच्या दिवशी सर्व स्त्रियांनी लवकर उठावे आणि सगळयात अगोदर अंघोळ करावी.
  • मग अंघोळ करून झाल्यानंतर विसर्जन करण्याच्या अगोदर गौरीची पुजा करावी.त्यांच्यासमोर दिवे लावावे त्यांना सुगंधित पुष्प देखील अर्पित करावे.
  • माता गौरीला नैवैद्य दाखवावा ज्यामध्ये फळ,हलवा मिठाई इत्यादींचा समावेश केला गेलेला असतो.
  • मग त्यांची सगळयांनी मिळुन आरती करावी.
  • आरती करून झाल्यानंतर वाजत गाजत त्या मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी घरातुन निघावे.
  • आणि मग शेवटी एखाद्या नदी तसेच समुद्रामध्ये त्यांच्या मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी उतरायचे असते.
  • मग आपण केलेल्या पुजेचा स्वीकार करावा अशी विनंती माता गौरीपुढे करावी आणि पुजेच्या दरम्यान आपल्याकडुन काही चुक झाली असेल तर त्याबाबद देखील माफी मागुन घ्यायची असते.जेणेकरून माता गौरी आपल्यावर रुष्ठ होत नाही.
  • विसर्जन करत असताना मनामध्ये १०८ वेळा माता गौरीच्या नावाचा निरंतर जप करावा.
  • मग गौरीचे विसर्जन करून झाल्यावर प्रसादाचे वितरण करून ब्राम्हणांना किंवा भुकेलेल्यांना जेऊ घालावे आणि थोडेफार पैसे त्यांना दान देखील करावेत.
  • आणि मग सगळयात शेवटी आपण केलेल्या व्रताचे पारायण करायचे असते.

गौरीपुजनाचे महत्व तसेच वैशिष्टय काय आहे?

  1. गौरीपुजन केल्याने विवाहीत स्त्रीला अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशिर्वाद मिळत असतो.
  2. गौरीपुजन केल्याने आपल्या वैवाहिक जीवणात आनंदाचे आगमन देखील होत असते.
  3. बहतेक स्त्रिया हे व्रत संतान सुख मिळण्यासाठी करीत असतात.
  4. अविवाहीत मुलींना त्यांना हवा तसा जोडीदार प्राप्त होत असतो.

गौरीगणपतीचा इतिहास काय आहे?

हिंदु धर्मशास्त्रांमध्ये नमुद केलेल्या प्रमाणे गौरी म्हणजेच पार्वती ह्या देवाधीदेव महादेव यांच्या पत्नी आणि विघ्नविनाशक गणरायाच्या माता आहेत.आणि ह्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये देखील करण्यात आलेला आपणास दिसुन येतो.


गौरी गणपती विविध प्रांतामध्ये कशी साजरी केली जात असते?

1) दक्षिण भारत : भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी गौरीचे आगमन होत असते.आणि ह्या सणाला प्रत्येक गावागावात मुर्त्या तयार केल्या जातात.आणि त्यांची पुजा देखील केली जात असते.

2) कोकण क्षेत्र : ह्या दिवशी महाराष्टात वास्तव्यास असलेले कोकण भागातील रहिवासी असलेले कोळी लोक तेरडयाच्या कोंबची गौरी इल्लो म्हणजेच लक्ष्मी म्हणुन पुजा करत असतात.आणि ह्या सणाला कोळी समाजातील लोक देवीला नैवैद्य म्हणुन मांसे दाखवत असतात.एवढेच नव्हे तर ह्या दिवशी कोळी समाजातील महिला रात्रभर जागरण करीत असतात.आणि कोळी समाजातील पारंपारीक नृत्य देखील करतात.आणि मग अष्टमीच्या दिवशी महापुजा देखील करत असतात.आणि विसर्जनाच्या दिवशी आपली पारंपारीक वेशभुषा परिधान करून गौरी आणि शंकर ह्या दोघांची वाजत गाजत मिरवणुक काढत असतात.


सर्व स्त्रिया ज्येष्ठ गौरीचे व्रत का करत असतात?

पौराणिक कथेत सांगितल्याप्रमाणे जेव्हा सर्व स्त्रिया असुरांच्या रोजच्या त्रासाला पुर्णत कंटाळल्या होत्या तेव्हा त्यांनी सर्वोपरी हताश आणि निराश होऊन आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी माता गौरीला शरण जात त्या असुरांपासुन आपले आणि आपल्या पतीचे रक्षण करावे असे आवाहन केले.तेव्हा भाद्रपद अष्टमीच्या दिवशी देवी गौरीने सर्व असुरांचा संहार केला

आणि त्या सर्व स्त्रियांचे तसेच त्यांच्या सौभाग्याचे देखील रक्षण केले.म्हणुन तेव्हापासुन अशी प्रथा निर्माण झाली की सर्व स्त्रिया ह्या दिवशी सदैव सौभाग्यपती राहण्यासाठी ज्येष्ठा गौरीचे व्रत करत असतात.


ज्येष्ठा गौरीसाठी नैवेद्य कोणता व कसा करावा : 

ज्येष्ठा गौरीला सगळयात पहिले आगमनाच्या दिवशी स्त्रिया भाजी भाकर नैवेद्य म्हणुन दाखवत असतात.आणि दितीय दिनी प्रत्येक प्रांतामध्ये आपापल्या थाटानुसार ज्येष्ठा गौरीसाठी फळ,बर्फी,लाडु इत्यादींचा समावेश केला जात असतो.आणि दुपारच्या वेळेला जेवणासाठी खीर,पुरणपोळया केल्या जात असतात.

अशा प्रकारे प्रत्येक प्रांतात आपापल्या सोयी सुविधेनुसार ज्येष्ठा गौरीचा सण साजरा केला जात असतो असे आपणास दिसुन येते. अशा पदधतीने आजच्या लेखातुन आपण गौरीपुजनाविषयी माहीती जाणुन घेतली आहे.आपल्याला ही माहीती कशी वाटली याबाबद आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.आणि सदर माहीती जास्तीत जास्त ठिकाणी शेअर देखील करा.


🔰 हे सुद्धा वाचा - 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad