Type Here to Get Search Results !

दत्त जयंती कथा आरती मराठी माहिती 2021 | datt jayanti katha arti marathi mahiti 2021

दत्त जयंती कथा आरती मराठी माहिती 2021 | datt jayanti katha arti marathi mahiti 2021|दत्तात्रेय जयंती कथा आरती 2021 |Dattatreya jayanti kath puja arti 2021


दत्त जयंती कथा आरती मराठी माहिती 2021



दत्त जयंती मराठी माहिती 2021|datt jayanti marathi mahiti|दत्तात्रेय जयंती कथा आरती शुभेच्छा 

नमस्कार मित्रांनो आज आपण दत्त जयंती बद्दल माहिती बघणार आहोत. दत्त जयंती ही मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला असते म्हणजेच 18 डिसेंबर 2021 वार शनिवार रोजी आली आहे.

दत्त जयंतीला दत्तात्रेय जयंती असे देखील म्हणतात,हा एक हिंदुंचा सन आहे जो की दत्त जन्मदिवसाची आठवण करून देतो. दत्तात्रेय हे ब्रम्हा, विष्णू, महेश या तीन देवतांचे एकत्रीत रूप आहेत.


🔰 दत्तात्रेय आरती मराठी | Dattatreya Arti marathi 

!! श्रीदत्ताची मराठी आरती !!


त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा !
नेती नेती शब्द न ये अनुमाना
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना॥1!!

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता !
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता !!

 सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त 
अभाग्यासी कैसी न कळे ही मात !
पराही परतली तेथे कैचा हेत
जन्ममरणाचा पुरलासे अन्त !!2!!

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता !
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता !!

दत्त येऊनियां ऊभा ठाकला
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला !
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला
जन्ममरणाचा फेरा चुकविला !!3!!

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता !
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता !!

 दत्त दत्त ऐसे लागले ध्यान 
हरपलें मन झालें उन्मन !
मी तू पणाची झाली बोळवण 
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान !!4!!

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता !
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता !!




🔶दत्त जयंती कथा आरती शुभेच्छा 2021 | datt jayanti katha arti shubhech 2021|दत्तात्रेय जयंती कथा आरती शुभेच्छा pdf 2021

दत्तात्रेय जन्मकथा 2021

पौराणिक कथेमध्ये असे सांगितले आहे की एकदा नारदमुनी तीनही देवीं असलेल्या ठिकाणी गेले आणि देवी अनुसूयाच्या पतिव्रता धर्माची स्तुती करू लागले.  हे ऐकुन तिन्ही देवींना याचा हेवा वाटू लागला.  नारदमुनी गेल्यानंतर तिनही देवींनी माता अनुसया देवीचा पुण्यधर्म मोडण्यासंबंधित चर्चा सुरू केली.

  तिन्ही देवींनी त्यांच्या पतींना माता अनुसया देवीचा पुण्यधर्म तोडण्यास सांगितले.  त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश विवष होऊन भिक्षुंच्या रूपात माता अनुसया देवीच्या आश्रमात पोहोचले.  

माता अनुसया देवी भिक्षा घेऊन आली परंतु तीन्ही देवांनी ती घेण्यास नकार दिला आणि भोजनाची इच्छा केली आणि माता अनुसया देवीने ते मान्य देखील केल व अन्न तयार केले आणि भोजन मागवले.  

तिन्ही देवतांनी जेवणाच्या ताटावर बसून जेवण केले आणि माता अनुसया देवीला भिक्षा म्हणून स्तनपान करण्यासाठीची मागणी करतात. पण माता अनुसया पतिव्रता नारी
असल्यामुळे त्यांना निराश न करण्याचे वचन देले होते म्हणून माता अनुसयेने त्रिदेवांना लहान बालकांत रूपांतर केले व स्तनपान करून त्यांना जेवू घालून झोपवते.

 माता अनुसया देवीने त्रिदेवांना आईसारखे वाढवायला सुरुवात केली. काही दिवसांनंतर तिन्ही देवतांच्या पत्निंना काळजी वाटू लागली.  त्रिदेव परतले नाही म्हणून तिन्ही देवींनी अनुसूयेकडे जाऊन आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली.

तिन्ही देवींनी त्रिदेवांना परत येण्यास सांगितले परंतु अनुसया देवीने नकार दिला. त्यामुळे तिन्ही देवतांनी ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या भागातून दत्तात्रेय उत्पन्न केले आणि त्यांना त्यांचा पुत्र म्हणून अनुसूया देवीकडे सुपूर्द केले. 

 दत्त देवाला पुत्ररूपात शोधून अनुसया देवीने तिन्ही देवतांना आपल्या तपोबलाने मूळ रूपात बनवले.  अशा पद्धतीने भगवान दत्तात्रेयांचा जन्म माता अनुसयेच्या पोटी त्यांच्या आश्रमात झाला.


🎯 दत्त जयंती कथा आरती शुभेच्छा 2021 | datt jayanti katha arti shubhech 2021|दत्तात्रेय जयंती कथा आरती शुभेच्छा pdf 2021

दत्तात्रेयांचे सोळा अवतार 

दत्तात्रेयांचे खालील प्रमाणे सोळा अवतार दिलेले आहेत.
  • योगिराज
  • अत्रिवरद
  • दत्तात्रेय
  • कालाग्रिशमन
  • योगीजनवल्लभ
  • लिलाविश्वंभर
  • सिद्धराज
  • ज्ञानसागर
  • विश्वंभरअवधूत
  • मायामुक्तावधूत
  • मायायुक्तावधूत
  • आदिगुरू
  • शिवरूप
  • देवदेश्वर
  • दिगंबर
  • कमललोचन


FAQ
Q.1) दत्त जयंती कधी साजरी केली जाते ?
Ans.दत्त जयंती ही मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला असते म्हणजेच 18 डिसेंबर 2021 वार शनिवार रोजी साजरी केली जाणार आहे.

Q.2) दत्तात्रेय हे कोणाचे रूप आहेत ?
Ans. दत्तात्रेय हे ब्रम्हा, विष्णू, महेश या तीन देवतांचे एकत्रीत रूप आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad