Type Here to Get Search Results !

रक्षाबंधन भाषण निबंध मराठी माहिती|Rakshabandhan speech essay in Marathi

 रक्षाबंधन भाषण निबंध मराठी माहिती| Rakshabandhan speech essay in Marathi | रक्षाबंधन भाषण मराठी | Rakshabandhan speech in Marathi| रक्षाबंधन निबंध मराठी| Rakshabandhan essay in Marathi| रक्षाबंधन मराठी माहिती 

रक्षाबंधन भाषण निबंध मराठी माहिती

रक्षाबंधन भाषण निबंध मराठी :- नमस्कार मित्रांनो आज आपण संपूर्ण देशात मोठ्या आनंदात साजरा केला जाणारा सण म्हणजेच रक्षाबंधन याबद्दल माहिती बघणार आहोत. यावर्षी रक्षाबंधन हा सण 30 ऑगस्ट 2023 सर्वत्र साजरा केला जाणार आहे. हा दिवस बहिण भावांच्या प्रेमाचा दिवस आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत रक्षाबंधन भाषण निबंध मराठी माहिती. खालील लेखात दिलेली माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.


रक्षाबंधन भाषण निबंध मराठी माहिती| Rakshabandhan speech essay in Marathi |रक्षाबंधन मराठी माहिती | Rakshabandhan bhashan nibandh marathi mahiti 


रक्षाबंधन हा भारत देशातील अत्यंत लोकप्रिय सण आहे. हा सण श्रावण वण महिन्यातील पौर्णिमेला सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. भारतात वेगवेगळ्या भागात यास वेगवेगळी नावे आहेत. जसे नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, कजरी पौर्णिमा इत्यादी,

रक्षाबंधन हा भाऊ-बहीणीचा सण आहे 'रक्षा' म्हणजे रक्षण, तर बंधन म्हणजे 'धामा रक्षणाचा बांधलेला पवित्र धागा म्हणजे रक्षाबंधन होय. या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या मनगटावर राखी बांधते. भावाला ओवाळते. भावाच्या सुखी, निरोगी, आनंदी दीर्घायुष्यासाठी प्राथना करते. भाऊही या दिवशी बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो. प्रत्येक भाऊ-बहिणीच्या दृष्टीने या सणाला अमूल्य महत्त्व दिले जाते.

"या दिवशी बहीण भावाला गोड पदार्थ खाऊ घालते व भाऊ ही आपल्या प्रिय बहीणीला भेटवस्तू देतो.

या सणामागे अशीही कथा आहे की, महाभारतात कृष्णाने द्रौपदीला बहीण मानून तिचे सदैव रक्षण केले. तर द्रौपदीनेही शिशुपालाच्या वधावेळी श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाल्यावर क्षणाचाही विलंब न लावता आपल्या साडीचा तुकडा फाडून तो जखमेवर बांधला.      
 
आजच्या युगात रक्षाबंधन हा सण केवल भाऊ- वहीण यांच्यापूर्वा मर्यादीत न ठेवता निसर्गाची पूजा,गुरुंची पूजा, आई वडीलांची पूजा करून हा सण साजरा करावा, रक्षाबंधन हा सण शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारा सण आहे. अशा सणाच्या आपणा सर्वांना मनः पूर्वक शुभेच्छा.

         🙏धन्यवाद!🙏





रक्षाबंधन निबंध मराठी दहा ओळी| 10 line essay on rakshabandhan 


१. रक्षाबंधन हा आपल्या भारत देशातील अत्यंत
महत्वाचा सण आहे.

२. रक्षाबंधन दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला
सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो.

३. रक्षाबंधन हा बहीन भावांचा सण आहे.

४. रक्षाबंधन या दिनाला नारळी पौर्णिमा असे ही संबोधले जाते.

५. रक्षाबंधन दिवशी बहिण भावाच्या हाताला राखी बांधते व ती भावला दिर्घायुष्य लाभो अशी देवाला प्रार्थना करते

६. भाऊ या दिवशी बहिणीला भेटवस्तु देतो व तीचे रक्षण करण्याचे तीला वचन देतो.

७. 'रक्षा' म्हणजे संरक्षण आणि 'बंधन' म्हणजे बांधणे आशा प्रकारे 'रक्षा बंधन ' म्हणजे 'संरक्षणाचे बंधन.

८. या दिवशी सर्वाकडे खूप प्रकारचे पदार्थ आणि
मिठाई तयार करतात.

९. राखीचा धागा हा नुसता सुताचा दीरा नसुन ते एक शील, स्नेह, सतत संयमी ठेवणारे बंधन आहे.

१०. रक्षाबंधन हा सण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो.

                🙏धन्यवाद 🙏






FAQ
Q.1) रक्षाबंधन 2023 कधी आहे ?
Ans. रक्षाबंधन 30 ऑगस्ट 2023 रोजी आहे.

Q.2) रक्षाबंधन हा सण कधी साजरा केला जातो?
Ans. रक्षाबंधन दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला
सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो.

Q.3) रक्षाबंधन म्हणजे काय ?
Ans.'रक्षा' म्हणजे संरक्षण आणि 'बंधन' म्हणजे बांधणे आशा प्रकारे 'रक्षा बंधन ' म्हणजे 'संरक्षणाचे बंधन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad