Type Here to Get Search Results !

शिक्षक दिन निबंध मराठी | teachers day essay in marathi

 शिक्षक दिन निबंध मराठी | teachers day essay in marathi | शिक्षक दिन दिवस मराठी निबंध | teachers day nibandh marathi | shikshak din nibandh marathi | शिक्षक दिन 10 ओळी निबंध मराठी | 10 lines essay on teachers day 2022

शिक्षक दिन निबंध मराठी

शिक्षक दिन २०२२ :- नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण 5 सप्टेंबर 2022 वार रविवार रोजी साजरा केला जाणारा दिवस म्हणजे शिक्षक दिन यावर अतिशय सुंदर सोपा असा निबंध बघणार आहोत. शिक्षक दिन निबंध आपण आपल्या शालेय जीवनात विविध प्रकारच्या स्पर्धासाठी नक्की उपयोगी पडणार आहे. तरी तुम्ही खालील शिक्षक दिन निबंध शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.

शिक्षक दिन निबंध मराठी | teachers day essay in marathi

आपल्या भारत देशात दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे थोर विचारवंत, विद्वान तसेच महान शिक्षक होते. त्यांनी शिक्षणक्षेत्रासाठी आपले विशेष योगदान दिले.

५ सप्टेंबर हा दिवस सर्व शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यावर तसेच समाजावर चांगले संस्कार करतात. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा खरा मित्र व मार्गदर्शक आहे.

शिक्षक दिन सर्व शाळा व महाविद्यालयात उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटकार्डे, भेटवस्तू इ. देतात. ऑनलाईन संदेश पाठवतात. विदयार्थ्यांना या दिवशी शिक्षक बनता येते. ते दिवसभर शाळा चालवण्याचे काम करतात. या दिवशी शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो.

आपल्या देशात गुरुचे महत्त्व ईश्वरासमान आहे. आपण सर्वांनी नेहमी त्यांचा आदर करावा.


➡️ गणेश चतुर्थी निबंध मराठी माहिती


शिक्षक दिन १० ओळी निबंध मराठी | 10 lines essay on teachers day

१) ५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

२) ५ सप्टेंबर हा दिवस डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे.

३) डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्वज्ञ, शिक्षक व उत्तम लेखक होते.

४) त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य केले म्हणून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

५) शिक्षक दिनादिवशी सर्व शिक्षकांचा सन्मान केला जातो.

६) आई - वडिलांनंतर शिक्षक अप्रत्यक्षरीत्या आपले पालकच असतात.

७) शिक्षक आपल्या व्यक्तीमत्वाला नानाविध पैलू पाडण्याचे काम करतात.

८) शिक्षक विद्यार्थ्यातील कला-कौशल्ये विकसित करायला मदत करतात.

९) समाजाची भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षक हे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात.

१०) शिक्षक दिनामुळे आपल्याला शिक्षकांविषयी आदर, प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते.


हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) शिक्षक दिन कधी असतो ?
Ans. आपल्या भारत देशात दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 

Q.2) ५ सप्टेंबर शिक्षक दिन का साजरा केला जातो ?
Ans. ५ सप्टेंबर शिक्षक दिन सर्व शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.

Q.3) शिक्षक दिन कोणाच्या जन्मदिनी साजरा केला जातो ?
Ans. शिक्षक दिन डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad