Type Here to Get Search Results !

शिक्षक दिन भाषण मराठी मध्ये pdf | teachers day speech in marathi pdf

 शिक्षक दिन भाषण मराठी मध्ये pdf |  teachers day speech in marathi pdf | शिक्षक दिन भाषण मराठी PDF | teachers day bhashan marathi madhe | 5 सप्टेंबर शिक्षक दिन भाषण मराठी | 5 september teachers day speech in Marathi

शिक्षक दिन भाषण मराठी मध्ये pdf

शिक्षक दिन भाषण मराठी मध्ये pdf :- नमस्कार मित्रांनो आज ५ सप्टेंबर २०२३ म्हणजेच शिक्षक दिन याबाबत आपण माहिती बघणार आहोत. 5 सप्टेंबर शिक्षक दिन संपूर्ण देशात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण शाळा, कॉलेज, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा केला जातो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत शिक्षक दिन भाषण मराठी मध्ये हे तुम्हाला विविध कार्यक्रमांमध्ये नक्की उपयोगी पडेल. खालील लेखात दिलेले शिक्षक दिन भाषण मराठी मध्ये हे तुम्ही शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती.

शिक्षक दिन भाषण मराठी मराठी मध्ये pdf | teachers day speech in marathi pdf 

गुरुविना ना मिळे ज्ञान,

ज्ञानाविना ना मिळे सन्मान...

जीवन भवसागर तराया,

चला वंदूया गुरुराया...

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो,सर्वांना माझा नमस्कार !

विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दृष्टी देऊन समाजाला योग्य दिशा देणाऱ्या माझ्या तमाम गुरूंना प्रथम माझे कोटी कोटी प्रणाम.

आज ५ सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिवस, दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. ५ सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती तसेच आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे.

असे म्हणतात की, एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे संपूर्ण जग बदलू शकतात. शिक्षक हे विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याबरोबरच जीवन कसे जगावे हे शिकवतात. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतात; त्याप्रमाणे शिक्षक आपल्याला विद्यार्थ्यांना घडवतात. त्याच्या भविष्याला आकार देतात.

शिक्षक दिन हा देशाच्या तसेच समाजाच्या प्रगतीसाठी कष्ट करणाऱ्या सेवेचा सन्मान आहे. शिक्षकांच्या हातामध्ये देशाचे भविष्य असते. शिक्षकांमुळेच देशाचे भावी डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, लेखक, वकील, खेळाडू तसेच इतर क्षेत्रात प्रगती करणारी सामर्थ्यवान पिढी घडत असते, शिक्षक हा जितका कर्तव्यदक्ष, कुशल आणि हुशार असेल तितका देशाचा विकास झपाट्याने होत असतो.

शिक्षक दिन हा आपल्याला संस्कारांनी सक्षम बनवलेल्या महान शिक्षकांना वंदन करण्याचा दिवस आहे. या दिनी आपण गुरुंना वंदन करून आपल्या देशाचे नाव जगात उंचावण्याचा प्रयत्न करूया. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक, हार्दिक शुभेच्छा !

धन्यवाद.

जय हिंद, जय भारत !



शिक्षक दिन १० ओळी भाषण मराठी| teachers day speech in marathi|10 line speech on teachers day 

१) सर्वांना नमस्कार.

२) माझे नाव अर्णव आहे. 

३) आज ५ सप्टेंबर, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहोत. 

४) प्रथम, सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

५) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आदर्श शिक्षक, तत्त्वज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती होते.

६) शिक्षक हे भावी पिढी संस्कारक्षम डवण्याचे कार्य करतात.

७) कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मूर्ती घडवतात, त्याप्रमाणे शिक्षक  विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देऊन त्याचे व्यक्तिमत्त्व घडवतात.

८) शिक्षक हे आपले खरे मार्गदर्शक आणि मित्र असतात.

०९) ते आपल्या कलागुणांना वाव देतात. 

१०) आज मी सर्व गुरुजनांना नमन करतो, त्यांच्या कार्याचा गौरव करते.





FAQ
Q.1) शिक्षक दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

Q.2) शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी का साजरा करतात ?
Ans. ५ सप्टेंबर, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो.

Q.3) शिक्षक हे कोण असतात ?
Ans. शिक्षक हे आपले खरे मार्गदर्शक आणि मित्र असतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad