Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय गणित दिन 22 डिसेंबर 2021 | National mathematics day 2021

 राष्ट्रीय गणित दिन 22 डिसेंबर 2021 | National mathematics day 2021 | राष्ट्रीय गणित दिवस मराठी माहिती | rashtriya ganit divas | गणितोत्सव 2021|राष्ट्रीय गणित दिवस शुभेच्छा|श्रीनिवास रामानुजन महिती


राष्ट्रीय गणित दिन मराठी माहिती


नमस्कार मित्रांनो आज आपण राष्ट्रीय गणित दिन याबद्दल माहिती बघणार आहोत.

राष्ट्रीय गणित दिन मराठी माहिती 

राष्ट्रीय गणित दिन 2021: गणित या विषयाची प्रतिभा असलेले श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त 22 डिसेंबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रीय गणित दिन 2021: राष्ट्रीय गणित दिवस हा दरवर्षी 22 डिसेंबर रोजी गणितामधिल प्रतिभावंत व्यक्तिमत्व असलेले श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

 गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी क्षयरोगाने निधन झाले. या त्यांच्या तरुण वयापर्यंत त्यांनी जगाला जवळपास 3500 गणिताची सूत्रे दिली होती आणि ती सुत्रे अजूनही शास्त्रज्ञ पूर्णपणे सिद्ध करू शकलेले नाहीत.

 22 डिसेंबर हा विशेष दिवस साजरा करण्यामागचा मुळ उद्देश म्हणजे मानवतेच्या विकासासाठी गणिताच्या महत्त्वाबाबत लोकांमध्ये जागरुकता आणि आवड निर्माण करणे हा आहे.

महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन हे त्यांच्या काळातील सर्वात प्रभावशाली गणितज्ञ होते. यांनी गणितातील विश्लेषणे, संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि सतत अपूर्णांक यामध्ये विलक्षण योगदान दिले. 

श्रीनिवास रामानुजन यांनी 3900 हून अधिक गणिती निकाल आणि समीकरणे संकलित करण्यापासून त्यांचे नाव शोधण्यापर्यंत, गणितातील त्यांच्या अनेक संशोधनांनी गणितीय संशोधनाचे नवे आयाम उघडले.


अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये join व्हा👇



🔶राष्ट्रीय गणित दिवस 2021 |National mathematics day 2021|श्रीनिवास रामानुजन निबंध इतिहास |rashtriya ganit divas


राष्ट्रीय गणित दिवस 2021: श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1987 रोजी कोइंबतूरच्या "इरोड"गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव कोमलताम्मल आणि वडिलांचे नाव श्रीनिवास अयंगार होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब कुंभकोनमध्ये गेले. जेथे त्यांचे वडील श्रीनिवास यांनी एका कपड्याच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला रामानुजन अगदी सामान्य मुलासारखे होते. त्यांना वयाच्या तीन वर्षापर्यंत बोलताही येत नव्हतं. त्यांना शाळा शिकवण्याची पद्धत बिलकूल आवडत नव्हती. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यात त्यांना प्रथम क्रमांक देखील मिळाला.

रामानुजन यांना गणित हा विषय खूप आवडत होता. इतर विषयांकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळेच मद्रास विद्यापीठाची शिष्यवृत्ती त्यांना गमवावी लागली. तरी त्यांची गणित या विषयाची आवड काही कमी झाली नाही. 1911 मध्ये त्यांचा 'जर्नल ऑफ इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी मध्ये 17 पानाचा एक पेपर प्रकाशित झाला.

 1912 मध्ये रामानुजन यांनी 'मद्रास पोर्ट ट्रस्ट' मध्ये लिपिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत त्यांना एक हुशार असे गणित तज्ञ म्हणून मान्यता मिळाली होती. त्याच वेळी रामानुजन यांना त्या काळातील जग प्रसिद्ध ब्रिटिश गणिततज्ञ 'जी. एच. हार्डी यांच्या कार्याविषयी माहिती मिळू लागली.

हार्डी यांच्या मार्गदर्शनात रामानुजन यांनी स्वतःचे 20 संशोधन पेपर्स प्रकाशित केले. 1916 मध्ये रामानुजन यांनी केंब्रिज येथून विज्ञान पदवी प्राप्त केली आणि 1918 मध्ये ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य झाले.

रॉयल सोसायटीचे सदस्य झाल्यानंतर ते ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळविणारे पहिले भारतीय ही ठरले रामानुजन ब्रिटनमध्ये असताना ब्रिटनचे थंड व ओलसर हवामान त्यांना मानवले नाही आणि त्यामुळेच त्यांची तब्येत खराब झाली आणि 1917 मध्ये त्यांना टीबी झाला.

TB या आजारामुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली आणि ते भारतात परत आले. 26 एप्रिल 1920 रोजी 32 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आजारपणात ही त्यांनी गणिताशी त्यांचे नाते तोडले नाही, ते पलंगावर पडल्या पडल्या प्रमेय लिहायचे. एवढे त्यांचे गणित या विषयावर प्रेम होते.

भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या र्तृत्वाला सलाम करण्यासाठी दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस "राष्ट्रीय गणित दिन" म्हणून साजरा केला जातो. 2012 साली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा दिवस "राष्ट्रीय गणित दिवस "म्हणून जाहीर केला आणि तेव्हापासूनच आपण "राष्ट्रीय गणित दिन" हा साजरा करीत आहोत.


हे सुध्दा वाचा⤵️



FAQ
Q.1) राष्ट्रीय गणित दिवस कधी आहे ?
Ans. राष्ट्रीय गणित दिवस 22 डिसेंबर रोजी आहे.

Q.2) राष्ट्रीय गणित दिवस का साजरा केला जातो ?
Ans.गणित या विषयाची प्रतिभा असलेले श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त 22 डिसेंबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो.

Q.3) श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्म कधी झाला ?
Ans.श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1987 रोजी कोइंबतूरच्या "इरोड"गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. 

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिवस साजरा केला जात आहे.

    उत्तर द्याहटवा

  2. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1987 रोजी
    26 एप्रिल 1920 रोजी 32 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
    D.O.B year wrong

    उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Below Post Ad