Type Here to Get Search Results !

जागतिक एड्स दिन 2021 मराठी माहिती निबंध | wold AIDS day 2021 marathi mahiti nibandh

जागतिक एड्स दिन 2021 मराठी माहिती निबंध | wold AIDS day 2021 marathi mahiti nibandh


जागतिक एड्स दिन 2021



1 डिसेंबर जागतिक एड्स दिवस

 १ डिसेंबर हा दिवस 1988 पासून दरवर्षी जागतिक एड्स दिवस म्हणून पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने (UNO-United Nations Organization) घोषित केले आहे. एड्स सारख्या भयंकर रोगाबद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळला जातो.

ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस या दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या (WHO) जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात याची संकल्पना मांडली. डॉ मन् यांचा सहमती नंतर १ डिसेंबर १९८८ पासुन हा दिवस पाळण्यात येऊ लागला. जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्लू बन् व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये १९८८ मध्ये साजरा केला. 

 पूर्वी कर्करोग हा सर्वांत भयानक रोग मानला जाई, मात्र 'एड्स' ह्या रोगाचा शोध लागल्यानंतर त्यालाच सर्वात भयंक ह्या रोगाचा शोध रोग मानले जाऊ लागले. कर्करोगावर आता इलाज निघालेत देखील. चांगले उपचार किंवा शस्त्रक्रिया करून कर्करोग बराही होऊ शकतो. मात्र, १९८१ साली एड्सच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाल्यानंतर आजपर्यंत ह्या रोगावर इलाज, औषध, लस किंवा हा रोग पळवून लावणारी उपचारपद्धती यांचा शोध अद्याप लागला नाही. 

एड्स विषयी आजपर्यंत झालेली जनजागृतीमुळे एड्सच्या रुग्णांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. मात्र असे म्हणून गाफील राहून चालणार नाही. म्हणूनच वरील माहिती कित्येकांना ठाऊक जरी असली तरीही सतर्क रहा ! सुरक्षित रहा !


 जागतिक एड्स्-प्रतिबंधक दिन

 1) डिसेंबर हा सर्व जगभर जागतिक एड्स् नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेने एच. आय. व्ही. (एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत) एक जग एक आशा' (One World, One Hope) हे संदेश देऊन एड्स् वरती विस्तृत प्रतिसाद देण्याचे सर्वांना आव्हान केले आहे.

एड्स् बाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. एड्स् म्हणजे कॉलरा, प्लेग, टायफॉइड नव्हे तर. हे आजार आहेत, यांची उपाय योजना करता येते. परिणामकारक औषधांचा उपयोग करून प्राण वाचविणे शक्य असते. हे होऊच नयेत यासाठी प्रतिबंधक लस उपलब्ध असते. एड्स् च्या बाबतीत तसे नाही. एड्स् वरती आतापर्यंत कोणतीही प्रतिबंध लस नाही.तसेच, तो रोग पूर्णपणे बरा होऊ शकेल, असे औषधोपचार पण नाही.. एड्स् हा आजार व तो ज्या विषाणूमुळे होतो, तो Human Immunodeficiency virus (ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस) (HIV) हे विविध बाबती मध्ये वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

एड्स् ची वैशिष्ट्य कोणती आहेत 

१) एड्स् चे विषाणू मानवी शरीरावर इतर रोगाप्रमाणे हल्ला करीत नसतात. हा रोगजंतू नष्ट करण्याच्या कार्यात सहभाग घेणाऱ्या मदतनीस Lymphocytes (लिम्फोसाइट्स) चा तो नाश करतो. या प्रकारे मानवी शरीरात असणारी रोग प्रतिकारक शक्ती नष्ट झाल्यामुळे तऱ्हेतऱ्हेचे संसर्गजन्य रोग होत असतात. उदा... क्षयरोग, इत्यादी.. स्वतः एड्स् चे विषाणू ही लक्षणे निर्माण करीत नाही. त्यामुळे संसर्गग्रस्त व्यक्ती नुसत्या दिसण्यावरून ओळखता येत नाही.

(२) लागण झाल्यानंतर ही लक्षणे दिसून यायला कमी जास्त काळ लागतो. या काळात कोणतेही लक्षन नसल्यामुळे लागण झालेली व्यक्ती बेफिकीर राहते व एड्स् चा प्रसार करू शकते.

३) एड्स् च्या रुग्णांत क्षयरोग होण्याचे प्रमाण खूपच जास्त असते. एड्स् हा हवेने प्रसार होत नाही; परंतु क्षयरोग मात्र हवेद्वारे पसरतो. 

४) जोडीदारापैकी एकाला एड्स् विषाणू ची लागण झाली, तर दुसऱ्यालाही लागन होण्याची पुर्ण पणे शक्यता असते. मुले पण होतील, त्यांनाही एइस् संसर्ग होण्याची पुर्ण पणे शक्यता असते.


एड्स् च्या वाढीचे प्रमुख कारणे कोणते असतात....

१) वाढते औद्योगिकरण,
२) विभक्त कुटुंब पद्धती,
३) अस्थिर कुटुंब व्यवस्था,
४) लोकसंख्या वाढ व बेकारी,
५) प्रसार माध्यमे,
६) वेश्यागमन,
७) व्यसनमुक्ती चळवळीची मंदगती,
८) दुषित किंवा संसग्रयुक्त रक्त वापरणे,
९) संशोधनास उत्तेजन न मिळणे इत्यादी..,

आजपर्यंत कुणीही व्यक्ती किंवा राष्ट्र (HIV) प्रभावापासून मुक्त नाही आहे. जगामध्ये २ कोटी व्यक्ती (HIV) एड्स् संसर्गासह जीवन जगत आहेत; दर महा मिनिटाअतंर्गत ५ नवीन व्यक्तींना संसर्ग होत आहे.

अधिक लोकसंख्या असलेल्या राष्ट्रांमध्ये एड्स् रुग्णांनी रुग्णालये भरून गेली आहेत. नवजात बालके संसर्गास जन्म घेत आहेत किंवा त्यांचे आई वडील एडस् ने मृत्यू होत असल्याने ती मुले परकीय होत आहेत.

एइस् ही एक जागतिक समस्या आहे. एइस् नियंत्रण कार्यात एखादया राष्ट्राला अपयश आले असेल, तर इतरत्र आलेल्या अनुकूल अनुभवांचा उपयोग करून अशा अपयशावर मात करता येऊ शकतो.

''एक आशा - सर्व जगभर एकच महत्वकांक्षा, " 

एड्स् पासून निरोगी लोकांना दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एड्स् रोगाध्ये सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी अगदी सोप्या पद्धती व उत्तम औषधींचा शोध लावला आहे.

काही पाश्चात्त्य युरोपियन राष्ट्रांमध्ये आणि युगांडा व थायलंड या देशांमधील बऱ्याच मोठ्या समुदायांमध्ये नवीन (HIV) संसर्गाचे प्रमाण बरेच घटले आहे. ही एक मोठी आशादायी गोष्ट आहे.

• शाळा महाविद्यालयांमध्ये एड्स वषयी माहिती किंवा जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले पाहिजे.
• एड्स् विषयक व्याख्याने आयोजित केली पाहिजेत,
• आपल्या मनातील शंका-कुशंका तज्ज्ञांना विचारल्या पाहिजेत.
विविध माध्यमाद्वारे या रोगांविषयीची माहिती मिळवली पाहिजे. .

१ डिसेंबर हा आज जागतिक 'एड्स् दिन या उपक्रमांनी साजरा केला जातो. जगभर एड्स् माहिती मिळाली पाहिजे व जनतेला एड्स् बद्दल भीती न घालता सावध राहावे, म्हणून हीच या दिनाची खरी उपयुक्तता आहे.


हे सुध्दा वाचा⤵️



FAQ
Q.1)जागतिक एड्स्- नियंत्रण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Ans.जागतिक एड्स नियंत्रण दिन 1 डिसेंबर दिवशी साजरा केला जातो.
Q.2) एड्स हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो ?
Ans. एड्स हा रोग HIV ( Human Immunodeficiency virus) या विषाणूमुळे होतो.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad