Type Here to Get Search Results !

इ 12वी च्या परिक्षेत झाले दोन बदल | 12th exam new update 2022

 इ 12वी च्या परिक्षेत झाले दोन बदल | 12th exam new update 2022 | इ 12वी चे दोन पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत


इ 12वी च्या परिक्षेत झाले दोन बदल

इ. १२ वीच्या विद्यार्थ्यासाठी महत्वाची बातमी : काही तांत्रिक अपरिहार्य कारणास्तव इ. १२ वीचे ५ मार्च २०२२ व ७ मार्च २०२२ चे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत.

 

इ 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या दोन पेपरच्या तारखेत झाला बदल 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) परीक्षा दि. 04 मार्च ते 30 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये बदल करण्यात येत आहे.

 यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार शनिवार दि. 05 मार्च 2022 रोजी प्रथम सत्रात होणारी हिंदी विषयाची तसेच द्वितीय सत्रात होणारी जर्मन, जपानी, चिनी, पर्शियन विषयांची परीक्षा आता मंगळवार दिनांक 05 एप्रिल 2022 रोजी नियोजित वेळेत होईल. तर, सोमवार दि. 07 मार्च 2022 रोजी प्रथम सत्रात होणारी मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, (अरेबिक/देवनागरी) मल्याळम, तमिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली विषयांची तसेच द्वितीय सत्रात होणारी उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश आणि पाली विषयांची परीक्षा आता 07 एप्रिल 2022 रोजी नियोजित वेळेत होईल.

12वी च्या पेपरबद्लची संपूर्ण माहिती बघा या शासणाच्या अधिकृत वेबसाईट 👇

                   www.mahahsscboard.in


उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) च्या लेखी परीक्षा व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात इतर कोणताही बदल नाही.. त्याचप्रमाणे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तरी वेळापत्रकातील उपरोक्त अंशत: बदलाची सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/ प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.


अधिकृत माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
                       ⤵️
                      येथे पहा


हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ मराठी राजभाषा दिन भाषण निबंध 










FAQ
Q.1) इ 12वी चे कोणत्या तारखेला होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत ?
Ans.इ. १२ वीचे ५ मार्च २०२२ व ७ मार्च २०२२ चे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत.

Q.2) इ 12वी चे पुढे ढकलण्यात आलेले पेपर कोणत्या तारखेला घेण्यात येणार आहेत ?
Ans.इ 12वी चे पुढे ढकलण्यात आलेले पेपर 5 एप्रिल आणि 7 एप्रिल या दोन दिवशी घेण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad