Type Here to Get Search Results !

इ 12वी परीक्षा हॉल टिकीट २०२२ डाऊनलोड | HSC exam hall ticket download 2022

 इ 12वी परीक्षा हॉल टिकीट २०२२ डाऊनलोड | HSC exam hall ticket download 2022 |www.mahahsscboard.in


इ 12वी परीक्षा हॉल टिकीट २०२२ डाऊनलोड


 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इ १२वी ची लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० एप्रिल २०२२ यादरम्यान घेतली जाणार आहे. १२वी च्या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र म्हणजेच (हॉल तिकीट) बुधवारी दिनांक ९ फेब्रुवारी २०२२ दुपारी १ वाजता राज्य मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. इ १२वी च्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयातून प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध होणार आहेत.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कोणत्या सुचना दिल्या ?


शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये. हॉल तिकीट मध्ये विषय माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करावयाच्या आहेत. तसेच हॉल तिकीट वरील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या स्वीकारून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. एखाद्या हॉल तिकीटावर सदोष छायाचित्र असल्यास त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, अशा सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी दिल्या आहेत.



इ 12वी हॉल टिकीट डाऊनलोड करण्यासाठी 

                          ⬇️
             DOWNLOAD HERE


इ १२वी च्या लेखी आणि तोंडी परीक्षा कधी होणार आहे ?


१२वी च्या परीक्षांच्या सुधारित वेळापत्रकानुसार नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या विरोधानंतरही या परीक्षा ऑनलाईन न घेता ऑफलाईन पद्धतीनुसारच घेण्यात येतील, असं प्रशासनाने स्पष्ट केलं होत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून या एका प्रसिद्धीपत्रकामार्फत नव्या तारखांची घोषणा करण्यात आली. त्यानुसारच १२वी ची लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 एप्रिल आणि तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


हे सुध्दा वाचा ⤵️







FAQ
Q.1) इ १२वी चे प्रवेशपत्र (hall ticket) कधी उपलब्ध होणार आहे ?
Ans. इ १२वी चे प्रवेशपत्र (hall ticket) दिनांक ९ फेब्रुवारी २०२२ दुपारी १ वाजता उपलब्ध होणार आहे.

Q.2) इ १२वी चे प्रवेशपत्र (hall ticket) कोणत्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे ?
Ans.इ १२वी चे प्रवेशपत्र (hall ticket)   www.mahahsscboard.in या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad