Type Here to Get Search Results !

पावसाळा निबंध मराठी | rainy season essay in marathi PDF | पावसाळा निबंध मराठी १० ओळी

 पावसाळा निबंध मराठी | rainy season essay in marathi PDF | पावसाळा निबंध मराठी short | पावसाळा १० ओळी निबंध मराठी | pavsala nibhandh marathi| 10 line essay on rainy season|पावसाळा निबंध मराठी १० ओळी

पावसाळा निबंध मराठी

पावसाळा निबंध मराठी :- 'पाऊस' म्हटलं की सर्वांचे मन आनंदाने नाचू लागते. उन्हाळ्यानंतर धरती मातेला थंड करण्याचे काम करती 'पावसाळा' शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि लहान मुलांच्या आनंदाचा विषय आहे 'पावसाळा' माझा आवडता ऋतू आहे 'पावसाळा.

पाऊस आला की धरती मतिच्या अंगावर पडणारे टपोरे थेंब, त्यातून येणारा मातीचा सुवास. अहाहा.....! जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात होते. आकाशात काळे ढग जमू लागतात, थंड वारा वाहू लागतो आणि पावसाला सुरवात होते..

मोर आनंदाने पिसार फूलवून नाचू लागतात. शेतकरी राजा सुखावतो. आपल्या कामाची आखणी करतो. पशु, पक्षी, प्राणी सुखावतात. लहान मुलांची छत्र्या, रेनकोट घेण्यासाठी लगबग सुरू होते.

सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण होते. पावसाळ्यात धरणीमाता हिरवी साडी नेसलेली दिसते. सर्व झाडे, वेली आनंदाने डोलू लागतात. डोंगर, पठारे खूप सुंदर दिसू लागतात. वातावरण अगदी प्रसन्न बनते. पाऊस कधी रिमझिम तर कधी धी- धी पडतो. पावसाळ्यात सप्तरंगी उधळण करणारा इंद्रधनुष्यही पाहायला मिळतो.

पण माणसांच्या चुकीमुळे अतिवृष्टीमुळे पूर येऊ लागले आहेत त्यामुळे मनुष्यहानी व वित्तहानी होते. हे टाळण्यासाठी नव्या, तलावांची आधीपासूनच स्वछ स्वच्छता केली पाहिजे व शक्य तेवढी झाडे 
लावली पाहिजेत. पाऊस पडल्यामुळे अनेक रोगराई
निर्माण होतात त्याची काळजी घेतली पाहिजे.

असा हा आनंददायी पावसाळा मला खुप आवडतो.


पावसाळा निबंध मराठी short | rainy season essay in Marathi| 10 line essay on rainy season| पावसाळा १० ओळी निबंध मराठी

१) पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे.

२) पावसाळ्यात पाऊस भरपूर पडतो.

३) पावसाळा जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो.

४) पावसाळ्यात शेतकऱ्यांना खूप आनंद होतो.

५)पावसाळ्यात शेतात हिरवीगार पिके डोलताना दिसतात.

६) पावसामुळे सर्व वातावरण आल्हाददायी बनते.

७) नदी-नाले, तलाव पाण्याने तुडुंब भरतात.

८) लोक पावसापासून आपले रक्षण व्हावे म्हणून छत्र्या, रेनकोट वापरतात.

९) पावसाळ्यात नद्यांना पूर येतात.

१०) मी दरवर्षी पावसाळ्याची खूप आतुरतेने वाट पाहतो.



सुध्दा वाचा ⤵️

➡️ स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण निबंध मराठी 
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी
➡️ राम नवमी २०२३ मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण निबंध मराठी
➡️ महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी
➡️ महापरिनिर्वाण दिनी भाषण
➡️ संविधान दिन भाषण मराठी
➡️ अण्णाभाऊ साठे भाषण मराठी
➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध मराठी
➡️ शिक्षक दिन भाषण मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध कविता मराठी
➡️ गुढीपाडवा निबंध मराठी माहिती !
➡️ प्रजासत्ताक दिन भाषण निबंध सुत्रसंचलन
➡️ स्वातंत्र्य दिन भाषण  


FAQS
Q.1) पावसाळा कधी चालू होतो ?
Ans. पावसाळा जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात होते.

Q.2) भारतात मान्सून कोणत्या महिन्यात येतो ?
Ans. भारतात मान्सून जून महिन्यात येतो.

Q.3) पाऊस किती महिने असतो ?
Ans. पाऊस ४ महिने असतो.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad