Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय शेतकरी दिन मराठी निबंध भाषण माहिती | National farmers day marathi bhashan nibandh mahiti

 राष्ट्रीय शेतकरी दिन मराठी निबंध भाषण माहिती | National farmers day marathi bhashan nibandh mahiti pdf|राष्ट्रीय शेतकरी दिवस शुभेच्छा pdf rashtriya shetkari divas 2021





नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण राष्ट्रीय शेतकरी दिन या दिवसाबद्दलची माहिती, भाषण आणि निबंध मराठीमध्ये बघणार आहोत त्याअगोदर तुम्हाला शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

राष्ट्रीय शेतकरी दिवस (toc)

राष्ट्रीय शेतकरी दिन मराठी माहिती निबंध | rashtriya shetkari divas | राष्ट्रीय किसान दिन 2021

भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि भारताच्या लोकसंख्येनुसार 60 टक्के लोक शेती करतात व शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.भारताच्या अर्थव्यवस्थेत म्हणजेच (GDP) मध्ये शेतीचे योगदान हे 14 टक्के आहे. 

भारत हा खेड्यांचा देश आहे आणि लोकसंख्येचा बराच मोठा भाग खेड्यात राहतो त्यामुळे 1964 मध्ये देशाचे पंतप्रधान असलेले लाल बहादूर शास्त्री यांचे असे म्हणने होते की देशाची सुरक्षा, स्वावलंबन आणि विकास सैनिक आणि शस्त्रांवरच नाही तर शेतकरी आणि कामगारांवरही आधारित आहे.  त्यामुळेच लाल बहादूर शास्त्री त्यांनी 'जय जवान, जय किसान'चा नारा दिला होता. 

राष्ट्रीय शेतकरी दिन मराठी माहिती|rashtriya shetkari divas| किसान दिवस मराठी माहिती

 आपण अन्नाला अन्न हे पूर्ण ब्रह्म असे म्हणतो. अन्नाशिवाय आपण तर कोणिही जगू शकत नाही हे सांगण्याची गरज नाही. शेतकरी त्यांच्या शेतात अन्न पीकवतात त्यामध्ये फळे, कडधान्ये,दाळी आणि सर्व प्रकारचा भाजीपाला यांचा समावेश आहे जर शेतकरी बांधवांनी हे सर्व बनवले नाही तर सर्व लोकांचे जीवन कठीण होईल म्हणून या दिवसाच्या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना धन्यवाद द्यावे.

 शेतात दिवस रात्र काबाडकष्ट करून शेतकरी जे उत्पन्न पीकवतात त्यावरच आपण पोट भरतो. शेतकऱ्यांशिवाय आपण जगू शकणार नाही.  शेतकरी दिन हा वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो, तर आपल्या देशात दरवर्षी 23 डिसेंबरला शेतकरी दिन साजरा केला जातो.


राष्ट्रीय शेतकरी दिन मराठी माहिती|rashtriya shetkari divas| किसान दिवस मराठी माहिती

 शेतकरी दिन का साजरा केला जातो ?

चौधरी चरणसिंग: भारताचे पाचवे पंतप्रधान हे शेतकरी कुटुंबातील चौधरी चरण सिंह होते. शेतकऱ्यांचा मसिहा मानले जाणारे चौधरी चरणसिंह यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी झाला. चौधरी चरणसिंह यांच्या वाढदिवसानिमित्त 23 डिसेंबर हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.  

 भारतीय शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यामागे चौधरी चरणसिंह यांचा खुप मोठा वाटा आहे याचे श्रेय त्यांना जाते. शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतकर्‍यांच्या समस्या आणि परिस्थितीची चांगलीच जाणीव असल्यामुळे चौधरी चरणसिंह यांनी शेतकर्‍यांसाठी अनेक सुधारणेची कामे केली.

चौधरी चरणसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात कृषी क्षेत्राच्या व शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी आणि कल्याणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती आणि शेतकऱ्यांसाठी अनेक चांगली धोरणे तयार करण्यात आली.  

चौधरी चरणसिंग हे 28 जुलै 1989 ते 14 जानेवारी 1980 येवढा कमी काळ पंतप्रधान असतानाही त्यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व विकासासाठी कठोर परिश्रम घेतले. एवढेच नाही तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या कार्याची आठवण म्हणून सन 2001 मध्ये सरकारने चौधरी चरणसिंग यांचा वाढदिवस किसान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रीय शेतकरी दिन मराठी माहिती|rashtriya shetkari divas| किसान दिवस मराठी माहिती

 शेतकरी दिनाचे महत्व मराठी

 शेतकरी दिन महत्व: शेतकरी दिवस हा खूप महत्त्वाचा आहे कारण की या निमित्ताने समाजातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन उपक्रम, शेतीविषयी,उद्योगांविषयी माहिती देऊन सक्षम बनविण्याची कल्पना दिली जाते.  

शेतकर्‍यांना आपल्या शेतात अन्न पिकवण्यासाठी किती काबाडकष्ट करावे लागतात त्याची जणीव लोकांना व्हावी आणि शेतकरी बांधवांच्या विविध समस्यांबद्दल लोकांना माहिती करण्याचे काम शेतकरी दिन या दिवशी केले जाते.

देशाचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांनी सर छोटू राम यांचा वारसा पुढे नेला, त्यांनी 23 डिसेंबर 1978 रोजी किसान ट्रस्टची स्थापना केली, ज्यामुळे देशातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत जनजागृती करण्यात आली.

हे सुध्दा वाचा⤵️


 FAQ

Q.1) राष्ट्रीय शेतकरी दिन केव्हा आहे ?
Ans. राष्ट्रीय शेतकरी दिन 22 डिसेंबर या दिवशी आहे.

Q.2) राष्ट्रीय शेतकरी दिन का साजरा केला जातो ?
Ans. शेतकऱ्यांचा मसिहा मानले जाणारे चौधरी चरणसिंह यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी झाला. चौधरी चरणसिंह यांच्या वाढदिवसानिमित्त 23 डिसेंबर हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो

Q.3) चौधरी चरणसिंग यांचा पंतप्रधान पदाचा कालावधी किती होता ?
Ans.चौधरी चरणसिंग हे 28 जुलै 1989 ते 14 जानेवारी 1980 येवढा कमी काळ पंतप्रधान पदाचा कालावधी होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad