Type Here to Get Search Results !

रेशन कार्ड संबंधित केंद्र सरकारनची नवीन योजना | rashan card new update 2022

 रेशन कार्ड संबंधित केंद्र सरकारनची नवीन योजना | Rashan card new update 2022


    
रेशन कार्ड संबंधित केंद्र सरकारनची नवीन योजना


नमस्कार मित्रांनो आज आपण रेशन कार्ड संबंधित केंद्र सरकारच्या नवीन योजनेबद्दलची माहिती बघणार आहोत. आता एका क्लिकवर रेशन कार्ड वरची सर्व माहिती आपल्याला पाहता येणार आहे. पहा कशी आहे केंद्र सरकारनची नवीन योजना. 

रेशन कार्डचा वापर रेशन दुकानातून अन्न धान्य घेण्याशिवाय अन्य महत्वाच्या कामांसाठी देखील केला जातो हे तुम्हाला माहितीच असेल. तसेच रेशन कार्ड मध्ये नाव नसलेल्या व्यक्तींना सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागते. याचा बाबींना लक्षात घेऊन केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.

यामुळे आपल्या शिधापत्रिके-मधील नाव ते रेशन कार्ड संबंधित सर्व माहिती आता घरबसल्या पाहता येणार आहे तेही एका क्लिकवर.


रेशन कार्ड संबंधित तपशील कशी पहावी :

  • रेशन कार्ड संबंधित तपशील पाहण्यासाठी सर्वात आधी आपल्याला अन्न व सुरक्षा विभागाची अधिकृत वेबसाईट म्हणजेच fcs.maha.gov.in यावर तुम्हाला जायचे आहे.


  • http://fcs.maha.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका किंवा /गट-वार्ड निवडायचा आहे.


  • वरिल सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव तसेच आतापर्यंत घेतलेले रेशन यांची सर्व माहिती आपल्याला दिसेल.



रेशन कार्ड कोणतं कुणासाठी असत :


पिवळे रेशन कार्ड - (बीपीएल)

ज्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 15 हजार रुपयांहून कमी आहे अशा व्यक्तिंना पिवळे रेशनकार्ड देण्यात येतात.

● प्रति वर्ष एकूण उत्पन्न

● शहरी रु. 15000/-

● दुष्काळग्रस्त भाग 11000/-

● उर्वरित ग्रामीण भाग 15000/-


केशरी रेशन कार्ड - (एपीएल)

 ज्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तिंना केशरी रेशनकार्ड देण्यात आले आहेत.

● वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी

● 4 चाकी वाहन स्व-मालकीचे नसावे

● कौटुंबिक मालकीची जमीन 4 हेक्टरपेक्षा कमी


पांढरे रेशन कार्ड - (प्रगत उन्नत लोकांसाठी)

ज्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त आहे अशा व्यक्तिंना पांढरे रेशनकार्ड देण्यात आले आहेत.

● वार्षिक उत्पन्न 1 लाखपेक्षा अधिक

● चार चाकी असावी

● कौटुंबिक मालकीची जमीन 4 एकर


केंद्र सरकारने सुरु केलेली ही योजना प्रत्येक नागरीकांसाठी  खूप महत्वाची आहे. या योजनेची माहिती आपण थोडासा वेळ काढून इतरांना देखील अवश्य शेअर करा.



हे सुध्दा वाचा⤵️


FAQ

Q.1) पिवळे रेशनकार्ड कोणाला दिले जाते ?

Ans.ज्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 15 हजार रुपयांहून कमी आहे अशा व्यक्तिंना पिवळे रेशनकार्ड देण्यात येतात.

Q.2) केशरी रंगाचे रेशन कार्ड कोणाला दिले जाते ?

Ans. ज्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तिंना केशरी रेशनकार्ड देण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad