Type Here to Get Search Results !

बाळासाहेब ठाकरे भाषन निबंध विचार मराठी | balasaheb thakarey bhashan nibandh quotes in marathi

 बाळासाहेब ठाकरे भाषन निबंध विचार मराठी | balasaheb thakarey bhashan nibandh quotes in marathi


बाळासाहेब ठाकरे भाषन निबंध विचार मराठी


बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे एक असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले. आपल्या खडक भाषणातून जनतेला प्रभावीत केले आणि आपला मराठी बाणा कायम ठेवला. बाळासाहेबांनी शिवशेना पक्षाची स्थापना करून मराठी माणसाला एकवटण्याचे कार्य केले. आज आपण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे प्रेरणादायी विचार बघणार आहोत हे विचार बघुन तुमच्यामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण होईल.


 बाळासाहेब ठाकरे यांचे विचार pdf 

                    ⤵️

       DOWNLOAD PDF



बाळासाहेब ठाकरे भाषन निबंध मराठी | balasaheb thakarey bhashan  nibandh marathi


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

 बाळासाहेब केशव ठाकरे उर्फ बाळ ठाकरे हे एक धुरंदर राजकारणी, उत्तम व्यंगचित्रकार व संपादक होते. शिवसेना या पक्षाचे ते संस्थापक होते आणि सामना या दैनिकाचे संस्थापक व प्रमुख संपादक होते.

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला. त्यांच्या आईचे नाव रमाबाई ठाकरे असे होते. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे एक मराठी पत्रकार व समाज सुधारक होते.

कारकिर्दीच्या सुरवातीला बाळासाहेबांनी 'फ्री प्रेस जर्नल' मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम केले. पुढे १९६० साली त्यांनी महाराष्ट्राच्या उद्धारासाठी 'मार्मिक' हे स्वतःचे साप्ताहिक सुरु केले.

१९ जून १९६६ रोजी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ही त्यांच्या पक्षाची घोषणा होती. महाराष्ट्रात अनेक उद्योग असूनही मराठी माणूस बेरोजगार व गरीब आहे हे त्यांनी महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिले. त्या दिशेने त्यांनी काम केले व मराठी माणसांना रोजगार उपलब्ध करून दिले. असंख्य गरजवंतांना त्यांनी मदत केली.

बाळासाहेबांचे वक्तृत्व आक्रमक आणि प्रभावी होते. मनात येईल ते स्पष्ट बोलून ते मोकळे व्हायचे. त्यांच्या भाषणाला प्रचंड गर्दी जमत असत. बाळासाहेब आणि गर्दी हे एक समीकरण बनले होते. त्यांच्या रोखठोक भाषाशैलीमुळे ते विरोधकांना पळता भूई करत.

२०१२ मध्ये बाळासाहेबांची प्रकृती बिघडू लागली. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून असंख्य लोक त्यांच्या निवासाजवळ जमू लागले. काही तासातच वेगाने धावणारी मुंबई शांत झाली. शिवाजी पार्क येथे राजकीय सन्मानाने त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.





बाळासाहेब ठाकरे जयंती शुभेच्छा स्टेटस विचार मराठी | balasaheb thakarey status wishes quotes in marathi

आज आपण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे प्रेरणादायी विचार बघणार आहोत हे विचार वाचुन तुमच्यामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण होईल.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी शुभेच्छा संदेश, स्टेटस, फोटो, sms ची आवश्यकता असते या सर्व गोष्टी तुम्हाला पुढे पहायला मिळतील.


🔯 बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

माझे शब्द हे बंदुकीच्या गोळी सारखे असतात, गेली गोळी की गेली, परत शोधत नाही कुठे पडली.


🎯 बाळासाहेब ठाकरे जयंती स्टेटस

  पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना पायाखाली तुडवायला माझ्या आदेश्याची वाट पाहू नका.


🔶 बाळासाहेब ठाकरे जयंती फोटो

     जीवनात एकदा निर्णय करा आणि समोर चालत राहा, मग तुम्हाला इतिहास घडविण्यापासुन कोणीही थांबवू शकणार नाही.

🌐 balasaheb thakre jayanti quotes in marathi

तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा, पण न्याय मिळालाच पाहिजे.

♦️ balasaheb thakre jayanti banner

तुमच्याकडे आत्मबल असेल तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा तुम्हाला मरण नाही.


🔵  balasaheb thakre jayanti sms in marathi

जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका. कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाहीत.


🎯 बाळासाहेब ठाकरे जयंती शुभेच्छा

जे देश हिताचे असेल, ते मी करत राहणार. मला खटल्यांची पर्वा नाही.


🔯 बाळासाहेब ठाकरे जयंती बॅनर

माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे भिती नावाचा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.


🔶 balasaheb thakre jayanti wishes
in marathi

वयाने म्हातारे झाले तरी चालेल, पण विचाराने कधी म्हातारे होऊ नका.


🌐 बाळासाहेब ठाकरे जयंती फोटो hd

एकजुटीने राहा, जाती आणि वाद काढून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा. तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल.


♦️ balasaheb thakre jayanti wishes
in marathi

नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे होऊ, ही महत्वकांक्षा बाळगा.


🔵  बाळासाहेब ठाकरे जयंती शेअर चॅट

श्रद्धा जरूर असावी, पण ती आई-वडिलांपाशी असावी,ते खरे देव आहेत.


🎯  balasaheb thakre jayanti sms in marathi

  मराठी ही आमची मातृभाषा आहे आणि तिला तुम्ही मानलंच पाहिजे, बोललंच पाहिजे.


🔯  बाळासाहेब ठाकरे जयंती photos 

सिंह कधी निवडणूक लढवत नाही तो स्वतःच्या ताकदीने राज्य करतो.


🔶 balasaheb jayanti shubhechha in marathi

देवापुढे वकायच्या ऐवजी आई वडीलांपुढे वाका कारण तेच तुमचे खरे देव आहेत, त्यांनी तुम्हाला जन्म दिला देवाने नाही. 




 हे सुध्दा वाचा ⤵️











FAQ
Q.1) बाळासाहेब ठाकरे यांचे पुर्ण नाव काय होते ?
Ans. बाबासाहेब ठाकरे यांचे पुर्ण नाव बाळ केशव ठाकरे हे होते.

Q.2) बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू कधी झाला ?
Ans.बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू१७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी झाला.





 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad