Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | chatrapati shivaji maharaj jayanti essay marathi

 छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | chatrapati shivaji maharaj jayanti essay marathi | छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी PDF|chatrapati shivaji nibandh marathi | shivaji maharaj essay in marathi pdf 

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी :- नमस्कार मित्रांनो आज १९ फेब्रुवारी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण भारतात मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो अतिशय सुंदर सोपा निबंध ते तुम्ही शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.


छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी| chatrapati shivaji maharaj essay in marathi|छत्रपती शिवाजी महाराज निबंध दाखवा | छत्रपती शिवाजी महाराज निबंध स्पर्धा 

छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाऊंनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. पिता शहाजी राजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला.

शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी महाराष्ट्रात परकीय सत्ता धुमाकूळ घालत होत्या. लाखो मराठा सैनिक मुघलांच्या कैदेत अडकले होते. शेतक-यांना कोणी वाली नव्हता. स्त्रियांवर अन्याय होत होते. ही परिस्थिती बदलण्याचे शिवरायांनी लहानपणीच ठरवले.

छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी स्वराज्याची सूत्रे हाती घेतली. सर्वसामान्य जनतेचे दुःख जाणून घेतले. त्यांना तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, मुरारबाजी अशा अनेक मावळ्यांनी मोलाची साथ दिली.

छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष राजा होते. त्यांनी परस्त्रीला मातेसमान मानले. सर्व जाती-धर्माचा आदर केला. रयतेला सुखी केले. अफजलखान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा बलाढ्य शत्रूचा पराभव केला.

दुर्देवाने, छत्रपती शिवाजी महाराज हे ३ एप्रिल १६८० रोजी अनंतात विलिन झाले. १९ फेब्रुवारी रोजी त्यांची जयंती ' शिव जयंती 'म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते.


शिवाजी महाराज निबंध मराठी १० ओळी | shivaji maharaj essay marathi 10 line | shivaji maharaj essay in marathi pdf | शिवाजी महाराज निबंध मराठी pdf


१) छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, पराक्रमी तसेच आदर्श राजा होते.


२) त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्हयातील शिवनेरी किल्ल्यावर झाला.


३) त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई हे होते.


४) शिवरायांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली.


५) त्यांनी 'गनिमी कावा' तंत्राचा वापर करून अनेक गड-किल्ले जिंकले.


६) त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक शक्तीशाली शत्रूचा पराभव केला.


७) छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला समान न्याय आणि वागणूक दिली.


८) त्यांनी स्त्रियांचा आदर केला.


९) दुर्देवाने, ३ एप्रिल १६८० रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


१०) आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार महाराष्ट्राच्या मातीत जिवंत आहेत.



हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध मराठी 

➡️ शिवजयंती शुभेच्छा संदेश मराठी 

➡️ संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहिती 

➡️ राजमाता जिजाऊ भाषण निबंध मराठी 

➡️ इ.१० वी प्रश्नपत्रिका संच 

➡️ इ.१२ वी प्रश्नपत्रिका संच 

➡️ शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी



FAQ
Q.1) छत्रपती शिवरायांचा जन्म कोठे झाला ?
Ans. छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.

Q.2) छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वडीलांचे नाव काय होते ?
Ans. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई हे होते.

Q.3) छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ वयाच्या कोणत्या वर्षी घेतली ?
Ans. शिवरायांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली.

















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad