Type Here to Get Search Results !

19 फेब्रुवारी शिवजयंती भाषण मराठी | shivjayanti speech in marathi | शिवजयंती भाषण pdf

 19 फेब्रुवारी शिवजयंती भाषण मराठी | shivjayanti speech in marathi | शिवजयंती भाषण pdf | shivjayanti speech pdf | 19 February shivjayanti speech in marathi| शिवजयंती निमित्त भाषण दाखवा | शिवजयंती स्पेशल भाषण 


19 फेब्रुवारी शिवजयंती भाषण मराठी

19 फेब्रुवारी शिवजयंती भाषण मराठी :- नमस्कार मंडळी आज आपण संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्यात भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी. शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अतिशय सुंदर भाषण मराठी ते तुम्ही शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती.


19 फेब्रुवारी शिवजयंती भाषण मराठी | 19 February shivjayanti speech in marathi | शिवजयंती भाषण मराठी PDF | shivjayanti bhashan marathi 


छत्रपती शिवाजी राजा,
असा एकच होऊन गेला....
इतिहासाच्या पानांमध्ये,
नाव आपले कोरून गेला ...


१) सर्वांना माझा नमस्कार, माझे नाव शौर्य आहे.


२) आज १९ फेब्रुवारी, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत.


३) प्रथम, सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


४) छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, पराक्रमी आणि महान राजा होते.


५) त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.


६) त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते.


७) छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा बलाढ्य शत्रूचा पराभव केला.


८) छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली.


९) त्यांनी रयतेसाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या.


१०) अखेर, ३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पडद्याआड गेले.
त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम !


बोला - छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय महाराष्ट्र
धन्यवाद !

➡️ शिवाजी महाराज चारोळी शायरी मराठी 

➡️ छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी PDF | chatrapati shivaji maharaj speech in marathi pdf | chatrapati shivaji maharaj bhashan marathi pdf | छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी 19 फेब्रुवारी 


घासल्याशिवाय धार नाही,
तलवारीच्या पातीला....
शिवरायांसारखे दैवत लाभले,
महाराष्ट्राच्या मातीला....


सर्वप्रथम रयतेचा राजा, आदर्श राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा !

सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच सर्व शिवभक्त रसिकहो, सहयाद्रीच्या कड्याकपारींनाही घाम फुटेल, झाडे- झुडपेही शहारतील, विशाल नभालाही ज्याच्यांसमोर झुकावं वाटेल असा रयतेचा राजा, लोककल्याणकारी राजा, मावळ्यांचा सोबती, बहुजनांचा कैवारी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज....

इतिहासाचे साक्षीदार,
उभे तुमच्या समोर,
किल्ला एक- एक न्याहाळा,
आठवा शिवबांचा कारभार....
दिली उभारी मनाला,
झाले वाऱ्यावरती स्वारी,
हर-हर महादेव गर्जले,
ते चार मावळ्यांच्या जोरावर.....

१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर तोफांचा कडकडाट झाला. सनई-चौघडे वाजले, सा-या आसमंती आनंदाची उधळण झाली. राजे शहाजी आणि जिजाऊ माता यांना हर्ष झाला. त्यांच्या पोटी एक तेजस्वी सूर्य जन्मास आला.... अर्थात छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला.


माता जिजाऊंनी शिवबा राजावर उत्तम संस्कार केले. शिवबांचे व्यक्ति- मत्त्व अष्टपैलू घडवले. जिजाऊंनी पाहिलेले स्वरोज्याचे स्वप्न शिवबा राजेंनी प्रत्यक्षात साकार केले. त्यांना स्वराज्यनिर्मिती करताना अनेक संकटे आली पण ते डगमगले नाहीत. आपले स्वराज्यनिर्मितीचे कार्य अविरतपणे चालूच ठेवले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी, बाजीप्रभू, जिवा महाला, सूर्याजी असे जीवाला जीव देणारे मावळे निर्माण केले. स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, अफजलखानचा बंदोबस्त, गड आला पण सिंह गेला, शाहिस्तेखानची फजिती, आग्याहून सुटका असे अनेक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात.

छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजा नव्हते; तर ते युगपुरुष होते. त्यांनी जीवनात भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले. प्रजेवर अन्याय करणा-याला धडा शिकवला. शेतक-याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले, पर स्त्रीला मातेसमान मानले. सर्वधर्मसमभाव या न्यायाने वागले.

पण दुर्देवाने ३ एप्रिल १६८० रोजी हा प्रजाहितदक्ष, आदर्श, महान, शूर व पराक्रमी राजा छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पडद्याआड गेले. मित्र हो, आजही त्यांचे कार्य - विचार आपल्याला नवीन प्रेरणा देतात. अशा या कर्तृत्ववान छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार झालाच पाहिजे.
बोला,
छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय जिजाऊ
जय महाराष्ट्र
जय भवानी,
धन्यवाद !हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध मराठी 

➡️ शिवजयंती शुभेच्छा संदेश मराठी 

➡️ संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहिती 

➡️ राजमाता जिजाऊ भाषण निबंध मराठी 

➡️ इ.१० वी प्रश्नपत्रिका संच 

➡️ इ.१२ वी प्रश्नपत्रिका संच 

➡️ शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी
FAQ

Q.1) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला ?

Ans.छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर तोफांचा कडकडाट झाला.


Q.2) छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणा कोणाचा पराभव केला ?

Ans. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा बलाढ्य शत्रूचा पराभव केला.

Q.3) छत्रपती शिवाजी महाराजांनी कशाची स्थापना केली ?

Ans. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad