Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक | life of chatrapati shivaji maharaj

 छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक | life of chatrapati shivaji maharaj |छत्रपती शिवाजी महाराज जीवन व शिकवण निबंध मराठी|शिवाजी महाराज जीवन व शिकवण | शिवाजी महाराज जीवन चरित्र मराठी | life story of chatrapati shivaji maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक

छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2024  :- नमस्कार मित्रांनो आज १९ फेब्रुवारी रोजी आपल्या सर्वांचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म दिवस सर्वत्र अतिशय आनंदाने साजरा करण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आणि अनेक भाषण स्पर्धा आयोजित करण्यात येतात. म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील घडलेले प्रसंग व त्यांनी त्यातून दिलेली शिकवण. खालील लेखात दिलेली माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.


छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक | life story of shivaji maharaj | शिवाजी महाराज जीवन चरित्र व शिकवण 

छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आणि लोककल्याणकारी राजे होते. ते मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांचे संपूर्ण जीवन आणि कार्य आपल्याला प्रेरक आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या जीवनातील असाच एक प्रसंग....
एकदा औरगंजेबाचा मामा शाहिस्तेखान शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी दख्खन प्रातांत आला. त्याने आपल्या- सोबत प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य, फौजफाटा आणला. त्यावेळी त्याने पुण्यातील लाल महालात मुक्काम केला. शिवाजी महाराजांनी अत्यंत चतुराईने खानावर रात्री हल्ला केला.पण शाहिस्तेखान खिडकीवाटे पळून जाण्यात यशस्वी झाला. याप्रसंगी खानाची तीन बोटे तुटली. प्राणावर संकट आल ते बोटावर निभावल अस म्हणत खान पळून गेला. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची नाचक्की झाली.

छत्रपती शिवाजी महाराज शूर आणि पराक्रमी राजे होते. या प्रसंगा- तून त्यांनी आपल्यावर कितीही मोठे संकट आले तरी न घाबरता त्याचा सामना करावा ही शिकवण आपल्याला मिळते.

आले किती गेले किती,
उडून गेले भरारा....
संपला नाही आणि संपणारही नाही,
माझ्या शिवबांचा दरारा....

➡️ शिवाजी महाराज चारोळ्या शायरी मराठी 

➡️ 19 फेब्रुवारी शिवजयंती भाषण मराठी 


श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक |‌life of chatrapati shivaji maharaj

छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि आदर्श राजा होते. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांना पिता शहाजी राजेंकडून शौर्याचा वारसा मिळाला; तर माता जिजाऊंनी शिवरायांच्या मनात स्वराज्याची बीजे पेरली.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा अभिमान आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. राजा कसा असावा ? त्याने राज्य कसे सांभाळावे, नीती कशी मांडावी ? कुंटुंब आणि प्रजा यांची सांगड कशी घालावी हे त्यांनी जगाला दाखवून दिले.

छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी राजा होते. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही अंगावर शहारे आणतात. जसे की- जावळीवर स्वारी, अफजलखानचा वध, शाहिस्तेखानाचा पराभव, पुरंदरचा तह, आग्राहून सुटका, शिवराज्याभिषेक इ. शिवरायांनी गनिमी काव्याचा वापर करून अनेक लढाया जिंकल्या. रयतेला सुखी केले. परस्त्रीला मातेसमान मानले. स्वतःचा विचार न करता रयतेसाठी झटले.

छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल संघटक, जाणता राजा तसेच रयतेचा राजा होते. म्हणून म्हणावेसे वाटते
की - " झाले बहु, होतील बहु....
परंतु शिवरायांसारखा कोणी नाही....."

जय श्री छत्रपती शिवाजी महाराज!
जय जिजाऊ, जय महाराष्ट्र !!

➡️ छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी 



छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक |‌शिवाजी महाराज जीवन चरित्र व शिकवण मराठी 

श्री छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते. त्यांचे जीवन आणि शिकवणूक आपणा सर्वांना नेहमी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. असाच त्यांच्या जीवनातील एक थरारक प्रसंग -

छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने अफझल खानाला पाठवले. अफझलखान खूप धिप्पाड आणि शक्तिशाली होता. शिवाजी महाराजांना अफजलखान काही कटकारस्थान करेल याचा अंदाज होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीने अफझल खानाला प्रतापगडाच्या पायथ्यासी बोलावले. त्यानंतर शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला.

या घटनेमुळे छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाची चमक संपूर्ण देशाने पाहिली. स्वराज्य निर्मितीसाठी ही घटना खूप महत्त्वाची ठरली.






FAQ
Q.1) छत्रपती शिवाजी हे कोण होते ?
Ans. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आणि लोककल्याणकारी राजे होते. ते मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.

Q.2) छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते ?
Ans. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू राजमाता जिजाऊ ह्या होत्या.

Q.3) शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते ?
Ans. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले हे होते.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad