Type Here to Get Search Results !

संत सेवालाल महाराज माहिती मराठी | sant sevalal maharaj information marathi

 संत सेवालाल महाराज माहिती मराठी | sant sevalal maharaj information in marathi | सेवालाल महाराज जयंती माहिती मराठी| sevalal maharaj jayanti mahiti marathi | सेवालाल महाराज माहिती मराठी | sevalal maharaj mahiti marathi 


संत सेवालाल महाराज माहिती मराठी

संत सेवालाल महाराज माहिती मराठी :- नमस्कार मित्रांनो आज १५ फेब्रुवारी म्हणजेच संत सेवालाल महाराज यांची जयंती सर्वत्र आनंदाने साजरी करण्यात येते. संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत संत सेवालाल महाराज यांच्या बद्दलची अतिशय सुंदर माहिती. खालील लेखात दिलेली संत सेवालाल महाराजांविषयी माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी अशी नम्र विनंती.

➡️ संत सेवालाल महाराज जयंती भाषण 



संत सेवालाल महाराज माहिती मराठी |sant sevalal maharaj mahiti marathi


संत सेवालाल महाराज माहिती मराठी :- संत सेवालाल हे एक महान मानवतावादी संत गोरबंजारा समाजामध्ये होऊन गेले.त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक तर आईचे नाव धरमणी होते. हे कुटुंब पशुपालक कुटुंब होते. भीमा नाईक यांना चार पुत्र होते. यापैकी सेवालाल हे ज्येष्ठ होते. सुरुवातीपासून ते विरक्त व निर्मोही स्वभावाचे होते.त्याकाळी बंजारा समाज निरक्षर होता. त्यामुळे सेवालाल महाराजांनी समाज सुधारण्याचे कार्य हाती घेतले. संत सेवालाल महाराजांनी समाजातील कुप्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मानवतेचा व पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. धर्मरक्षणासाठी त्यांनी युद्ध देखील केले. दारुबंदी करून स्त्रियांना अधिकार दिले.

महाराजांनी लोकगीत भजन यामाध्यमातून समाजप्रबोधन केले. त्याकाळी समाजाला भजनाची आवड होती हे ओळखून त्यांनी बंजारा बोली भाषेत भजन रचना करून समाजात धार्मिक व सांस्कृतिक बदल घडवून आणले. संत सेवालाल हे त्यागी, दूरदर्शिता असणारे थोर समाज सुधारक होते.संत सेवालाल महाराजांचे क्रांतिकारी बोल मानवाला वास्तववादी विचार करण्यास भाग पडतात. त्यांनी बळी प्रथा बंद करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. ते स्वतः शाकाहारी होते. सामाजिक परिवर्तनाचा व प्रगतीचा त्यांनी ध्यास घेतला होता. त्यासाठी ते आजन्म प्रयत्नशील राहिले. त्यांची जयंती महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यासह इतर अनेक राज्यात मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने साजरी केली जाते.



हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध मराठी 

➡️ शिवजयंती शुभेच्छा संदेश मराठी 

➡️ संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहिती 

➡️ राजमाता जिजाऊ भाषण निबंध मराठी 

➡️ इ.१० वी प्रश्नपत्रिका संच 

➡️ इ.१२ वी प्रश्नपत्रिका संच 

➡️ शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी



FAQ
Q.1) संत सेवालाल महाराजांची जयंती कधी साजरी करतात ?
Ans. संत सेवालाल महाराजांची जयंती १५ फेब्रुवारी रोजी साजरी करतात.

Q.2) संत सेवालाल महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते ?
Ans. संत सेवालाल महाराजांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक हे होते.

Q.3) संत सेवालाल महाराजांनी कोणता संदेश दिला ?
Ans. संत सेवालाल महाराजांनी मानवतेचा व पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. 












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad