Type Here to Get Search Results !

शिंधुताई सपकाळ मराठी भाषण निबंध माहिती pdf | shindhutai sapkal information in marathi

 शिंधुताई सपकाळ मराठी भाषण निबंध कविता माहिती | shindhutai sapkal information in marathi | शिंधुताई सपकाळ मराठी माहिती






शिंधुताई सपकाळ यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांच्या जिवनाचा प्रवास 14 नोव्हेंबर 1947 साली सुरू झाला आणि 4 जानेवारी 2022 या दिवशी त्यांच्या जिवनकार्याचा प्रवास संपला.


शिंधुताई सपकाळ यांचा जन्म व बालपण कसे होते ?| शिंधुताई सपकाळ मराठी माहिती निबंध | shindhutai sapkal information in marathi


सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा या जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला. शिंधुताईंच्या वडिलांनी नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यात एक जंगल भाग असलेल ठिकाण म्हणजे नवरगाव ही त्यांची जन्मभूमी आहे. त्यांच्या वडीलांचे आव अभिमान साठे होते आणि ते गुरे वळायचे काम करायचे. गाव लहान असल्याने तेथे सुविधांचा अभाव असे. घरची गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्यानंतर शाळेत जाऊन बसायच्या. लहानपनापासुनच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत त्यांना शिकता आले.



शिंधुताई सपकाळ यांच्या विवाहाची माहिती | shindhutai sapkal information in marathi


शिंधुताई सपकाळ यांचा विवाह वयाच्या ९ व्या वर्षी झाला. त्यांच्यापेक्षा वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. घरी प्रचंड सासुरवास भोगावा लागत असे, कुटुंबात शैक्षणिक वातावरण नाही. माईंना जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करायला जावे लागत असे आणि ते गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळांत लपवून ठेवायच्या. कधीतरी घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करायच्या.

शिंधुताईंच्या अठराव्या वर्षापर्यंत त्यांची तीन बाळंतपणे झाली. माई चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. त्यावेळी गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा आणि गुरांची संख्याही शेकडोंनी असायची. गुरांचे शेण काढता काढता बायकांचे अक्षरशः कंबरडे मोडायचे तरी पण त्याबद्दल कोणतीही मजुरी त्यांना मिळायची नाही. रस्त्यावर दगड, मुरूम फोडणाऱ्यांना मजुरी असायची पण शेण काढणाऱ्यांना नाही आणि त्यांच्या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे त्यामुळे इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. माईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला होता आणि त्यांची जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली.



शिंधुताई सपकाळ यांच्या जिवनातील संघर्ष | shindhutai sapkal information in marathi

दमडाजी या नावाच्या व्यक्तीने सिंधुताईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला त्यामुळे नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस ताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हाकलले. माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वे रुळांच्या कडेने फिरायच्या.एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण ‘लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल’ म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथे त्यांनी कधी एकटे खाल्ले नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच २१ वर्षांच्या ताईंना संरक्षण दिले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने त्यांच्या लक्षात आले की तिथे कायम राहता येणार नाही. शेवटी सिंधुताईंनी स्मशान गाठले.



ममता बाल सदन संस्था माहिती | mamata bal sadan Sanstha


अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत. 



सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या संस्था | shindhutai sapkal information in marathi


  • बाल निकेतन हडपसर (पुणे)
  • सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह (चिखलदरा)
  • अभिमान बाल भवन, वर्धा
  • गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन) 
  • ममता बाल सदन, सासवड
  • सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे
  • मदर ग्लोबल फाउंडेशन (आंतरराष्ट्रीय पातळीवर)



शिंधुताई सपकाळ यांना मिळालेले पुरस्कार |shindhutai sapkal awards

शिंधुताई सपकाळ यांना मिळालेले आजवरचे पुरस्कार खालील प्रमाणे आहेत..

  • पद्मश्री पुरस्कार (२०२१)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)
  •  'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार' (२०१२)
  • 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार' (२०१०)
  • मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)
  •  दत्तक माता पुरस्कार (१९९६)
  •  डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
  • राजाई पुरस्कार
  • शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
  •  'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (१९९२)
  •  'रिअल हीरो पुरस्कार' (२०१२).
  • 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार' (२००८)
  • प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)
  • डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)
  • पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार' 



हे सुध्दा वाचा ⤵️













FAQ
Q.1) शिंधुताई सपकाळ यांचा जन्म कधी झाला ?
Ans. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा या जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला.

Q.2) शिंधुताई सपकाळ यांना २०२१ मध्ये कोणता पुरस्कार देण्यात आला ?
Ans. शिंधुताई सपकाळ यांना २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad