Type Here to Get Search Results !

10वी 12वी परिक्षा पद्धतीत बदल 2022 | 10th 12th Exam New Update 2022

 10वी 12वी परिक्षा पद्धतीत बदल 2022 | 10th 12th Exam New Update 2022


10वी 12वी परिक्षा पद्धतीत बदल 2022


10वी 12वी परीक्षा परीक्षा पध्दतीत यावर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बदल केले आहेत. कोरोना काळात मुलांच्या अभ्यासावर खुप मोठा परिणाम झाला आहे म्हणूनच दहावी बारावी च्या बोर्डाने  विद्यार्थ्यांच्या मानावर असलेले दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून त्याच शाळेतील शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. 


 10वी 12वी परिक्षेत कॉपी प्रकरणांचा शोध घेण्यासाठी यावर्षी "स्कॉड नसणार आहेत. शेजारील शाळेतील एका शिक्षकाची बैठे पथक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.

अशाच प्रकारच्या शैक्षणिक माहितीसाठी आमच्या what's up group मध्ये जॉइन व्हा.
                          ⤵️

         What's up group link


 10वी 12वी परीक्षा पद्धत बदल 2022 | 10th 12th Exam News 2022

इ 10वी 12वी च्या विद्यार्थ्यांनी वर्षभर कोरोणाच्या दुसऱ्या लाटेत वर्षभर ऑनलाईन पद्धतीने क्लास पुर्ण केले आहेत आणि आत्ताच्या घडीला कोरोनाची तीसरी लाट चालु आहे त्यामुळे संपूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांना ऑफलाईन पध्दतीने शिक्षण घेता आले नाही.


इ 10वी 12वी च्या विद्यार्थ्यांना जे काही ऑनलाइन पध्दतीने शिकवण्यात आले होते ते सर्व त्यांच्या डोक्यावरून गेले. तरी सुद्धा वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात कोरोनाचा प्रसार होत असतानाही इ 10वी 12वी चे वर्ग ऑफलाईन ठेवण्यात आले होते परंतु त्या वेळेत संपूर्ण अभ्यासक्रम ऑफलाइन पध्दतीने शिकवता आला नाही. तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत अभ्यासक्रम शिकवायचा थांबला नव्हता.   म्हणूनच या सर्व बाबींचा अभ्यास करून यंदाही एकूण अभ्यासक्रमाच्या 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत आणि इ 10वी 12वी च्या विद्यार्थ्यांना 15 ते 30 मिनिटांचा वेळही वाढवून दिण्यात आला आहे.


यावर्षी इ 10वी 12वी च्या परीक्षा ज्या ठिकाणी त्यांची शाळा आहे त्याच ठिकाणी होणार आहे. तसेच परीक्षेच्या वेळी विषय शिक्षक सोडून शाळेतील सर्वच शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून परीक्षेसाठी नेमले जाणार आहे. कोरोनाचा धोका टळला नसल्यामुळे विद्यार्थ्यांची अंगझडती (body checkup) देखील होणार नाही. 


   ज्या ठिकाणी शाळा तेथे परीक्षा केंद्र असल्याने फिरते पथक नियुक्तीचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे दुसऱ्या शाळेतील एका शिक्षकाला त्या केंद्रावर स्कॉड म्हणून नियुक्त केले जाणार असून गरज भासल्यास प्राथमिक शिक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे. तरीही, विद्यार्थ्यांनी कोणत्याही दडपणाखाली राहू नये, प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, जेणेकरून पुढील शैक्षणिक वाटचाल खडतर राहणार नाही, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडून करण्यात आली आहे.

➡️ इ 10वी कृतीपत्रिका pdf डाऊनलोड



यावर्षी इ 10वी 12वी कॉपी प्रकरणांचा शोध घेण्यासाठी फिरते पथक नसणार आहे.

फिरते पथक यंदा नाहीच दहावी-बारावीच्या परीक्षेत काहीजण प्रश्नपत्रिका सोडविताना पुस्तकात अथवा नोट्समध्ये पाहून उत्तरे लिहितात, परीक्षा पारदर्शक व्हावी, कोणीही कॉपी करू नये म्हणून बोर्डाकडून स्कॉड तथा फिरत्या पथकांची नियुक्ती केली जाते. मात्र, कोरोनामुळे यंदा तसे काही होणार नसून शेजारील शाळेतील शिक्षकच परीक्षा होईपर्यंत त्याठिकाणी बैठे स्कॉड म्हणून नेमले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी कॉपी करून लिहून स्वतःची फसवणूक करू नये, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.



हे सुध्दा वाचा ⤵️











FAQ

Q.1) यावर्षी इ 10वी 12वी च्या परीक्षेत काय बदल झाला आहे ?

Ans. 10वी 12वी परिक्षेत कॉपी प्रकरणांचा शोध घेण्यासाठी यावर्षी "स्कॉड नसणार आहेत. शेजारील शाळेतील एका शिक्षकाची बैठे पथक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.


Q.2) 10वी 12वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी किती वेळ वाढूण दिला आहे ?

Ans. 10वी 12वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 30 मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad