Type Here to Get Search Results !

इ 10 वी प्रवेशपत्र(हॉल टिकीट) कसे डाऊनलोड करावे | How To Download 10th Admit Card 2022

 इ 10 वी प्रवेशपत्र(हॉल टिकीट) कसे डाऊनलोड करावे | How To Download 10th Admit Card 2022 |ssc exam admit card 2022


नमस्कार विद्यार्थी, पालक आणि बांधवांनो इ 10वी ची लेखी परीक्षा एका महिन्याभरावर येऊन ठेकली आहे म्हणूनच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, यांनी महिनाभर अगोदर प्रवेशपत्र(हॉल टिकीट) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इ 10वी चे प्रवेशपत्र(हॉल टिकीट) शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर 18 फेब्रुवारी पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्यावी 👇


इ 10वी परीक्षा हॉल टिकीट (Admit Card) कधी मिळणार आहे ? SSC Online Admit Card 2022


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक या सर्वांना सूचित करण्यात येते की इ.10वी परीक्षा मार्च एप्रिल 2022 साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

इ 10वी च्या सर्व माध्यमिक शाळांना मार्च एप्रिल 2022 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेची प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाईटवर शुक्रवार दिनांक 18/02/2022 रोजी दुपारी 1.00 वाजल्यापासून School Login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांना हॉल टिकीट (Admit Card) बाबत दिलेल्या सुचना :

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व माध्यमिक शिक्षण संस्थांनी परीक्षेची ऑनलाईन प्रेशपत्रे (Admit Card) प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.

  • इ 10वी च्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online ) पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची (हॉल टिकीट) प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.

  • इ 10वी च्या प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket) विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.

  • प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे..


  • प्रवेशपत्र विद्यार्थ्याकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) अस शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.

  • फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.

NOTE : तरी मार्च एप्रिल २०२२ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० बी) परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व माध्यमिक शाळा यांनी उपरोक्त बाबीची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी.



हे सुध्दा वाचा ⤵️











FAQ
Q.1) इ 10वी चे प्रवेशपत्र(हॉल टिकीट) कधीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत ?
Ans.इ 10वी चे प्रवेशपत्र(हॉल टिकीट) शुक्रवार दिनांक 18/02/2022 रोजी दुपारी 1.00 वाजल्यापासून School Login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील.

Q.2) इ 10वी चे प्रवेशपत्र (हॉल टिकीट) कोणत्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे ?
Ans. इ 10वी चे प्रवेशपत्र (हॉल टिकीट) शासनाची अधिकृत वेबसाईट www.mahahsscboard.in 
यावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad