Type Here to Get Search Results !

लता मंगेशकर मराठी माहिती | लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश | lata mangeshkar information in marathi

 लता मंगेशकर मराठी माहिती निबंध | lata mangeshkar information in marathi |लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश


लता मंगेशकर मराठी माहिती निबंध



गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच निधन झालेलं आहे गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारांना त्या प्रतिसाद देऊ शकल्या नाहीत. संगित क्षेत्रातील एका अनमोल हिऱ्याचा आज प्रवास संपला आहे. कोरोणा आणि निमोनिया या दोन रोगांशी त्या झुंज देण्यास कमी पडल्या. मागिल 29 दिवसापासून ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते पण आज अखेर वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.



 लता मंगेशकर माहिती मराठी निबंध | lata mangeshkar information in marathi 


लता मंगेशकर या भारतातील सुप्रसिद्ध गायिका आहेत. त्यांचा जन्म: सप्टेंबर २८, १९२९ मध्ये मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता मंगेशकरांचे मूळ गाव मंगेशी (गोवा) हे आहे .

लता मंगेशकर या आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ/मोठे अपत्य आहेत. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची लहान भावंडे आहेत.

 लता मंगेशकर यांना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी लता मंगेशकर यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. लता मंगेशकर यांनी 'पहिली मंगळागौर' या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले आहे.

लता मंगेशकर या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या गायनाच्या कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी  चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे.

 लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते. लता मंगेशकराना भारतीय कोकिळा (Indian Nightingale) म्हणतात.त्यांना चित्रपट सृष्टीतील सर्वोच्य असा दादासाहेब फाळकेपुरस्कार मिळाला आहे. तसेच,
भारतरत्न' पुरस्कार प्राप्त करणाऱ्या भारतातील त्या पहिल्या महिला कलाकार आहेत. हा पुरस्कार त्यांना २००१ साली मिळाला.

लता मंगेशकर यांचे नाव 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड् मध्ये इ.स. १९७४ ते इ.स. १९९९ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नोंदले गेले आहे. अशा या महान व्यक्तिचे आज 06 फेब्रुवारी 2022 या दिवशी 8.12 मिनिटांला झाले.
              💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐


लता मंगेशकर यांना मिळालेले पुरस्कार awards


पद्मभूषण
 1969 मध्ये, लताजींना प्रथमच देशाच्या सरकारने पद्मभूषण, देशाचा तिसरा क्रमांक पुरस्कार प्रदान केला.

दादासाहेब फाळके 
 1989 मध्ये लताजींना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पद्मविभूषण
 1999 मध्ये लताजींना देशाचा चौथा क्रमांकाचा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारतरत्न
 2001 मध्ये लताजींना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देण्यात आला.

जीवनगौरव
 2008 मध्ये, स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त, लताजींना देशाच्या सरकारने जीवनगौरव कामगिरीसाठी वन टाइम पुरस्काराने सन्मानित केले.


लता मंगेशकर यांना मिळालेले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार


  •  परिचय (1972) – सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक

  •  कोरा कागज (1974) - सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक

  •  पण (1990) – सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक


लता मंगेशकर यांचे निधन कसे झाले ?

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच निधन झालेलं आहे गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारांना त्या प्रतिसाद देऊ शकल्या नाहीत. संगित क्षेत्रातील एका अनमोल हिर्याचा आज प्रवास सुरू आहे.कोरोणा आणि निमोनिया या दोन रोगांशी त्या झुंज देण्यास कमी पडल्या. मागिल 29 दिवसापासून ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते पण आज अखेर वयाच्या 93व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.



लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी | lata mangeshkar bhavpurn shradhanjali


दिव्य प्रतिभेच्या धनी, गानकोकिळा लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

💠 लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश

 भारतरत्न पद्मभूषण स्वरयोगिनी पार्श्वगायिका गानकोकीळा लतादीदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

🎯lata mangeshkar bhavpurn shradhanjali marathi

स्वरांची दैवी देणगी... सुरांचा पिढीजात वारसा.... भारतीय संगीताचा हा आरसा ! लता दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

🔯 Lata mangeshkar bhavpurn shradhanjali sandesh

काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुमचे अचानक जाणे.. आजही घुमतो स्वर तुमचा कानी, वाहतांना श्रध्दांजली डोळ्यात येते पाणी...लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! !

🔰 Lata didi bhavpurn shradhanjali

आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण दीदी तुमची येत राहील.लता दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !


🔵 Lata Mangeshkar bhavpurn shradhanjali status

ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृती आठवणीना दाटून आली, भाव सुमनांची ओंजळ भरुनी, वाहतो आम्ही श्रद्धांजली.लता दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !


 

हे सुध्दा वाचा ⤵️













FAQ
Q.1) लता मंगेशकर यांचे निधन कसे झाले ?
Ans. कोरोणा आणि निमोनिया या दोन रोगांशी त्या झुंज देण्यास कमी पडल्या. मागिल 29 दिवसापासून ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते पण आज अखेर त्यांचे निधन झाले आहे.

Q.2) लता मंगेशकर यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले?
Ans. लता मंगेशकर यांना भारतरत्न, पद्मभूषण, दादासाहेब फाळके, पद्मविभूषण, जिवनगौरव ही सर्व पुरस्कार मिळाले.

             

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad