Type Here to Get Search Results !

15 जानेवारी 2022 भारतीय आर्मी दिवस मराठी माहिती | 15 January 2022 Indian army day marathi mahiti

 15 जानेवारी 2022 भारतीय आर्मी दिवस | 15 January 2022 Indian army day |army divas 2022 


15 जानेवारी 2022 : भारतीय सेना दिन हा दिवस देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या आणि देशाचा अभिमान वाढवणाऱ्या सैनिकांना सन्मान करण्याचा दिवस (Indian Army Day 2022) आहे. पण, हा दिवस 15 जानेवारीलाच का साजता केला जातो हे तुम्हाला माहीत आहे का ?

भारतीय सेना दिवसाबद्दलची माहिती तुम्हाला शालेय जीवनात, भाषण निबंध लिहायला नक्कीच उपयोगी पडणार आहे तरी खाली दिलेली सर्व माहिती शेवटपर्यंत वाचावी.


अशाच प्रकारच्या job(नोकरी) विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये शामील व्हा 👇



Indian army day 2022 | भारतीय सेना दिन २०२२ मराठी माहिती

Indian army day 2022 : 15 जानेवारी म्हणजेच भारतीय सेना दिन भारतासाठी खुपच महत्त्वाचा दिवस आहे. 15 जानेवारी हा दिवस दरवर्षी भारतीय सेना दिन (Indian Army Day 2022) म्हणून साजरा केला जातो. 15 जानेवारी हा दिवस सीमेवर रक्षण करणाऱ्या आणि भारताचा अभिमान वाढवणाऱ्या सैनिकांना सन्मान करण्याचा दिवस आहे. भारताचा 74 वा लष्कर दिन ( Indian army day 2022 ) यंदा साजरा होत असल्याने नवी दिल्ली आणि सर्व लष्करी मुख्यालयात 15 जानेवारी या दिवशी लष्करी परेड, लष्करी प्रदर्शन आणि इतर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.


भारतीय सैन्याची स्थापना केव्हा झाली ?

राजे महाराजांच्या कारकिर्दीत, प्रत्येक राज्यकर्त्याचे स्वतःचे सैनिक होते. परंतु, ईस्ट इंडिया कंपनीने 1776 साली कोलकाता येथे भारतीय सैन्याची स्थापना केली. त्यावेळी भारतीय लष्कर ही ईस्ट इंडिया कंपनीची एक तुकडी होती, ज्याला नंतर ब्रिटिश इंडियन आर्मी असे नाव मिळाले. स्वातंत्र्यानंतर अखेर देशातील सैनिकांना भारतीय सैन्य म्हणून मान्यता मिळाली.



हे सुध्दा वाचा⤵️










भारतीय लष्कर दिन हा 15 जानेवारीलाच का साजरा केला जातो ?

 भारतीय सेना दिवस भारतीय सैन्यासाठी आणि भारताच्या इतिहासासाठी अतिशय खास मानला जातो. वास्तविक भारतीय सेना दिन फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. फील्ड मार्शल केएम करिअप्पा कोण आहेत आणि त्यांच्या सैन्यातील योगदानाबद्दल तसेच 15 जानेवारीला आर्मी डे का साजरा केला जातो हे आपण समोर जाणून घेऊया


भारतीय सेना दिवसाचा इतिहास :

Indian army day 2022  : भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी आपल्या लष्करावर ब्रिटिश सेनापतींची सत्ता होती. इ.सन 15 ऑगस्ट 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतीय लष्कराचे नेतृत्व ब्रिटिश वंशाच्या व्यक्तीकडे होते. इ.स 1949 मध्ये स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर-इन-चीफ जनरल फ्रान्सिस बुचर हे होते. ब्रिटिश कमांडर-इन-चीफ जनरल फ्रान्सिस बुचर यांची जागा भारतीय लेफ्टनंट जनरल केएम करिअप्पा यांनी घेतली. केएम करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करी अधिकारी होते. केएम करिअप्पा यांनी विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात भारतीय सैन्याचे नेतृत्व देखील केले होते त्यानंतर पुढे करिअप्पा फील्ड मार्शल बनले.



भारतीय सेना दिन 15 जानेवारीलाच का साजरा केला जातो ?

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फील्ड मार्शल केएम करिअप्पा हे 15 जानेवारी 1949 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करप्रमुख झाले. भारताच्या इतिहासात ही सर्वात महत्त्वाची घटना आहे, म्हणूनच दरवर्षी 15 जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिन म्हणून साजरा केला जातो. करिअप्पा जेव्हा लष्करप्रमुख झाले तेव्हा भारतीय सैन्यात सुमारे 2 लाख सैनिक होते. करिअप्पा भारताच्या लक्ष्करप्रमुख या पदावरून 1953 मध्ये निवृत्त झाले आणि 1993 मध्ये वयाच्या 94 व्या वर्षी करिअप्पा यांचे निधन झाले.


करिअप्पा यांचे कर्तृत्व

करीअप्पा यांनी 1947 च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे नेतृत्व केले. निवृत्तीनंतर त्यांना 1986 मध्ये फील्ड मार्शल पद देण्यात आले. याशिवाय दुसऱ्या महायुद्धात बर्मामध्ये जपान्यांना पराभूत केल्याबद्दल त्यांना ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायरचा सन्मानही मिळाला होता.


भारतीय सैन्याची स्थापना केव्हा झाली ?

राजे महाराजांच्या कारकिर्दीत, प्रत्येक राज्यकर्त्याचे स्वतःचे सैनिक होते. परंतु, ईस्ट इंडिया कंपनीने 1776 साली कोलकाता येथे भारतीय सैन्याची स्थापना केली. त्यावेळी भारतीय लष्कर ही ईस्ट इंडिया कंपनीची एक तुकडी होती, ज्याला नंतर ब्रिटिश इंडियन आर्मी असे नाव मिळाले. स्वातंत्र्यानंतर अखेर देशातील सैनिकांना भारतीय सैन्य म्हणून मान्यता मिळाली.



 हे सुध्दा वाचा ⤵️










FAQ

Q.1) भारतीय सैन्याची स्थापना केव्हा झाली ?

Ans. भारतीय सैन्याची स्थापना 1776 साली झाली.


Q.2) 15 जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिन म्हणून का साजरा केला जातो ?

Ans.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फील्ड मार्शल केएम करिअप्पा हे 15 जानेवारी 1949 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करप्रमुख झाले. भारताच्या इतिहासात ही सर्वात महत्त्वाची घटना आहे, म्हणूनच दरवर्षी 15 जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिन म्हणून साजरा केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad