मराठी भाषा गौरव दिन चारोळ्या | marathi bhasha Gaurav din charolya | 27 फेब्रुवारी चारोळ्या मराठी | मराठी राजभाषा दिन चारोळ्या
मराठी भाषा गौरव दिन 2022 : नमस्कार मित्रांनो आज आपण 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला खालील लेखात पहायला मिळेल.
मराठी भाषा दिवस सुत्रसंचालन pdf
⤵️
मराठी भाषा गौरव दिन चारोळ्या | 27 फेब्रुवारी चारोळ्या मराठी |marathi bhasha gaurav din Charolya
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी...
ज्ञानेश्वरांनी लिहली ज्ञानेश्वरी,
समृद्ध संपन्न झाली,
तुकोबांनी रचली गाथा,
माझी मराठी भाषा.
माझ्या मराठीचा गंध,
जाई-जुई मोग-याचा,
माझ्या मराठीचा संग,
संत-साधू सज्जनांचा.
माझा शब्द माझे विचार,
माझा श्वास माझी स्फूर्ती,
माझ्या रक्तात मराठी,
माझी माय मराठी !!
कुसुमाग्रजांची प्रसिध्द विशाखा,
वि.स.ची गाजली ययाति,
माझी मराठी दिव्य भाषा,
जशी जोडते शब्दांतूनी नाती.
बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध,
वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध,
मराठीच्या उद्घारासाठी,
कंबट कमुनी आम्ही कटिबद्ध
असतील जगी लाखो शब्द,
असतील जगी भाषा हजार,
माझ्या मराठी भाषेचा गोडवा,
नित्य आहे सदाबहार.
माझी मराठी माझी मराठी,
सर्वांच्या खेळू द्या हो ओठी.
कीर्तन, भजन, ओवी, पोवाड्याने,
माझी मराठी सजली,
शब्द, अलंकाराचा साज लेवून,
माझी मराठी बहरली.
आपणच आपणासी ताटी,
मराठीची किमिया न्यारी.
मातृभाषा महाराष्ट्राची,
आहे मराठी भाषा,
तिला समृद्ध करण्याची,
आहे माझी आशा.
साहित्याचा वारसा चालवूया गडे,
मराठी पाऊल पडते पुढे.
माझे विचार मराठी,
माझा शब्द, माझी लेखणी,
माझा श्वास, माझी स्फूर्ती,
माझा आचार मराठी.
"पुन्हा मानव जन्म मिळाला तर....
फक्त मराठीच होईन......
आम्हाला गर्व आहेच मराठी असल्याचा !!
स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे,
मराठी पाऊल पडते पुढे!
रुजवू मराठी, फुलवू मराठी !
चला बोलू फक्त मराठी !!
साहित्याचा हा खजिना,
मराठी वाचवूनी जाणून घ्याना.
"वाहते रक्तात माझ्या मराठी
गर्वाने सांगतो, आहे मी मराठी,
संस्कृती माझी माय ती मराठी
अभिमानाची ती माय मराठी
हे सुध्दा वाचा ⤵️
FAQ
Q.1) मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो.
Q.2) मराठी भाषा गौरव दिन कोणाच्या जन्मदिवसा निमित्त साजरा केला जातो ?
Ans.मराठी भाषा गौरव दिन कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसा निमित्त साजरा केला जातो.