Type Here to Get Search Results !

संत गाडगेबाबा यांचे विचार मराठी माहिती | sant gadge baba quotes in marathi

 संत गाडगेबाबा यांचे विचार मराठी माहिती | sant gadge baba quotes wishes in marathi


गाडगे बाबांची थोडक्यात माहिती : 

संत गाडगे बाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ कोतेगाव (शेंडगाव) येथे झाला. ते गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती.

संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. त्यांचे कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती बोलती पाठशाळा होती.

 माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली.

डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.

डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.

सामाजिक सुधारणा १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास घेतला. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना 'गाडगेबाबा' म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.

संत गाडगेबाबा यांचा मृत्यू :

लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.

अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.

॥ गोपाला, गोपाला, देवकीनंदन गोपाला॥


संत गाडगेबाबा यांचे प्रेरणादायी विचार मराठी | sant gadge baba quotes wishes in marathi


  • शिंहाला पहावे वणात,हत्तीला पाहावे रानात आणि गाडगेबाबाला पहावे किर्तनात.आचार्य अत्रे.

  • जशी हवा आहे, लाल आहे, हिरवी आहे, पिवळी आहे, ते समजत नाही आणि त्याचे ठिकाण नाही, असाच परमेश्वर आहे.

  • हे जे तिर्थात देव बसलेले आहेत ना, हे पोट भरण्याचे देव आहेत.

  • संत तुकाराम महाराज म्हणतात देव देव करता शिनले माझे मन, मी खूप फिरलो, मला शिन आला, मी थकलो. पण देव दिसला नाही.

  • देव पाहिला नाही, देव दिसला नाही आणि देव कोणाला दिसणारही नाही.

  • कोणी म्हणते रात्री स्वप्नात परमात्मा दिसले. शंख, चक्र, गदा सर्व साहित्य सोबत घेऊन.परमात्मा दिसला नाही.

  • जे जे मनी बसे, ते ते स्वप्नी दिसे.माझा बाप स्वप्नात तुम्ही पाहिला होता का कधी? मग जे पाहिल नाही ते दिसतच नाही.

  • मग जो फोटो पाहतो. तो फोटोतलाच देव दिसतो. देव दिसत नाही. देव दिसायची गोष्ट नाही.

  • गणपती बसवणे देवाची भक्ती नाही.जेव्हा तुम्ही गणपतीला आणता, बँड लावता, भजन लावता आणि वाजवत वाजवत आणता आणून सिंहासनावर बसवता अन् त्याची पूजा करता.निवद, मोदक, आरत्या आणि शेवटच्या दिवशी उठवता.ज्याची एवढी भक्ती केली,एवढी शोभा केली, ज्याच्या आरत्या केल्या. त्याला पाण्यात बुडवून मारता !

  •  तुमच्यावर कधी खटला भरला तर फौजदारी होते,ही देवाची भक्ती नाही. देवाची भक्ती म्हणजे भजन
 

  • ज्या साली लढाई झाली त्या साली एक एक आगबोट 50-50 कोटी रुपयांची पार तळाला गेली. अशा किती आगबोटी बुडाल्या.

  •  सत्यनारायण करणाऱ्या महाराजाला म्हणावं, अडीच रुपये घेऊन कशाला एवढी बडबड करता?अडीच लाख रुपये घ्या, अडीच कोटी रुपये घ्या. समुद्राच्या किनाऱ्यावर एक सत्यनारायण करा अन् एक आगबोट वर आणा. हे त्यांना जमणार नाही.

  • देव देवळात नाही. देऊळ तयार झालं, मूर्ती आणावी लागते. मूर्ती विकत भेटते.देव विकत भेटतो का? मेथीची भाजी आहे की कादे-बटाटे आहेत?

  • देव विकत भेटते हेही समजत नाही ज्या माणसाला, तो माणूसचं कसा!

  • तुमच्या देवाचा देवळा पूरता तरी उजेड पडतो का? नाही.मग दिवा विझला, मंडळी दर्शनाला आली, बापूराव दिवा लावा.मग देव कोणी दाखवला दिव्यानं...! तर दिवा मोठा की देव मोठा? दिवा...!

  •  माणसाचे घन तिजोरी नाही, सोनं नाही, हिरे नाही, मोटर नाही. माणसाचं धन कीर्ती आहे.

  • चार महिने बरसात परमात्मा देते. मग जमीन पिकते. चार महिने बरसात नाही पडली, तर जमीन पिकेल का? हजारो करोडो लोक मरतील

  • देवाला आपण फुलं वाहतो. फुलं कोणी पैदा केली? आपल्या आजाने की पंजाने? देवाने केली.मग त्याचीच फुलं, त्याचीच बरसात, आपण त्याचं त्यालाच देतो.

  •  गरिबांसाठी बायांचे दवाखाने बांधा. गोरगरिबाला औषधी द्या. गोरगरिबाला कपडे द्या. आस्तेर पावशेर चावल द्या. गोरगरिबांवर दया करा.

  • मराठे, माळी, तेली, न्हावी, धोबी, चांभार, कोळी, कुंभार, लोहार, वडारी, बेलदार, कैकाडी, गोंड, गवारी, मांग आणि महार हे लोक का गरीबीत राहिले? त्यांना विद्या नाही आणि ज्याला विद्या नसेल, त्याला खटाऱ्याचा बैल म्हटलं तरीही चालेल.

  • आता तरी सुधरा. आता तरी मुलांना शिक्षण द्या. पैसे नाही म्हणालात तर जेवणाचं ताट मोडा. हातावर भाकरी खा. बायकोला लुगडं कमी भावाचं, कमी किंमतीचं घ्या. ईव्हायाला पाहुणचार करू नका. पण मुलांना शाळेत घातल्याशिवाय सोडू नका.

  • विद्या मोठं धन आहे. विद्या मोठी गोष्ट आहे.तुम्हाला आम्हाला विद्या नाही तर मजुरी तरी लागली. पण या टायमाला मुलांना विद्या दिली नाही,तर तुमच्या मुलाला मजुरी लागणार नाही, तर बूट पॉलिश करावी लागेल.

  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या वडिलांना सद्बुद्धी सुचली आणि आंबेडकर साहेबाला शाळेत घातलं. आंबेडकर साहेबान काही लहान-सहान कमाई नाही केली. हिंदुस्तानची घटना केली, घटना!अन् तेच शाळेत गेले नसते अन् शिकले नसते तर झाडू मारणंच त्यांच्या कर्मात होतं.

  •  मारवाडी, गुजराती, ब्राह्मण हे लोक रोज तुपातला शिरा का खातात? कारण त्यांच्या घरी जमा खर्च आहे.




हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ संत गाडगेबाबा जयंती भाषण निबंध मराठी













FAQ
Q.1) संत गाडगेबाबा यांचा जन्म कधी झाला ?
Ans. संत गाडगे बाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ कोतेगाव (शेंडगाव) येथे झाला.

Q.2) संत गाडगेबाबा यांचा मृत्यू कधी झाला ?
Ans. लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad