Type Here to Get Search Results !

जागतिक कामगार दिन मराठी माहिती भाषण निबंध| international workers' day marathi mahiti

 जागतिक कामगार दिन मराठी माहिती भाषण निबंध | international workers' day marathi mahiti pdf| jagtik kamgar din marathi mahiti 

International worker's day 2022 : नमस्कार मित्रांनो आज आपण १ मे रोजी साजरा होणारा दिवस म्हणजेच जागतिक कामगार दिन याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत. जागतिक कामगार दिनानिमित्त खालील लेखात दिलेली माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.


जागतिक कामगार दिन मराठी माहिती भाषण | international worker's day marathi mahiti

अमेरिकेतील शिकागो येथे १८८६ साली कामगारांनी कामाचा आठ तासांचा दिवस असावा म्हणून संघर्ष केला. या आंदोलकावर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. त्यात सात कामारांचा मृत्यू झाला. ती कामगारांची चळवळ दडपून टाकण्यासाठी सरकारने मालकाची बाजू घेऊन कामगारांस वेठीस धरले व कठोर मार्ग अवलंबिले. त्या शहीदांच्या त्यागातून सर्व जगभर कामगार चळवळ उभी होण्यास मदत मिळाली.

तेव्हापासून १ मे हा जगातील कामगारांच्या निर्धाराचा व ऐक्याचा दिवस पाळाला जातो. १ मे जगातील कामगारांसाठी मोठा स्फूर्तिदायक दिवस आहे. या दिवशी शिकोगोमधील कामगारांनी दिलेल्या आहुतीमुळेच जगातील कामगारांना त्यांचे न्याय हक्क प्राप्त झाले आहेत. आज खाजगीकरण व अन्य आर्थिक धोरणामुळे कामगार शक्तीला दडपण्याचा घाट मालकवर्गाबरोबर देशातील सत्याधीश वर्ग करीत आहे,

जागतिकीकरण, जागतिक मंदी, स्वेच्छा निवृत्ती, कामगार कपात. इ. मुळे कामगार देशोधडीला लागला आहे. त्यांचा वाली कोणीही नाही. अशी दयनीय अवस्था कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. कामगारांसाठी नवा कंत्राटी कायदा आणला आहे. ठेकेदारी कायदेशीर करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो कामगारांचा उदरनिर्वाह, राहणीमानाचा प्रश्न उभे आहेत.

काम करुन घ्यायचे व नंतर त्यांना कमी करायचे असा शॉर्टकट मालकवर्गाला सापडला आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही युरोपखंडातील जिन्हेवा शहरात १९१९ मध्ये स्थापन करण्यात आली. कामगार जीवनाशी संबंधित सर्व प्रश्नांचे संशोधन, माहिती संकलन, मार्गदर्शन, बेकारी निवारण इत्यादी बाबतीत ही संघटना भरीव कार्य करते.

आपल्या भारतातही अखिल भारतीय कामगार संघटना (आयटक), इंटक, हिंदू मजदूर सभा इत्यादी असंख्य कामगार संघटना स्थापन झाल्या संगणकीकरणामुळे मनुष्यबळ कमी लागते. कामगार दिनी त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी.



हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ इ १०वी १२वीच्या निकालाची तारीख जाहीर



FAQ
Q.1) जागतिक कामगार दिन कधी साजरा केला
जातो ?
Ans.जागतिक कामगार दिन 1 मे रोजी साजरा केला जातो.

Q.2) आंतरराष्ट्रीय कामगार संघटना कधी स्थापन करण्यात आली ?
Ans. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही युरोपखंडातील जिन्हेवा शहरात १९१९ मध्ये स्थापन करण्यात आली.

Q.3) भारतात कोणकोणत्या संघटना कामगारांसाठी काम करतात ?
Ans.भारतात अखिल भारतीय कामगार संघटना (आयटक), इंटक, हिंदू मजदूर सभा इत्यादी असंख्य कामगार संघटना कामगारांसाठी काम करतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad