राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी | Rajarshi shahu Maharaj essay in marathi | राजर्षी शाहू महाराज मराठी माहिती | Rajarshi shahu Maharaj nibandh marathi
राजर्षी शाहू महाराज जयंती २०२२ : नमस्कार मित्रांनो आज आपण राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त निबंध बघणार आहोत. २६ जुन म्हणजेच राजर्षी शाहू महाराज जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते व हा दिवस संपुर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून मोठ्या आनंदाने साजरा करतात जसे की निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा इत्यादी. खालील लेखात दिलेली माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.
राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी | Rajarshi shahu Maharaj nibandh marathi
हिरे माणिके, सोने उधळा
जयजयकार करा ॥
जय राजर्षी शाहू राजा
तुजला मानाचा मुजरा ॥
गोरगरिबांच्या झोपडीमध्ये ज्ञानाचा दिवा पेटावा म्हणुन आयुष्यभर एका दिव्याप्रमाणे तेवत राहणारा एक नंदादीप, अठरा पगड जातीनां एकाच पंगतीत जेवू घालणारा एक महामानव,कोल्हापूर संस्थानातील रयत, त्या रयतेतील माणसे आणि माणसांच्या मनावर आधिराज्य गाजवणारा रयत राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय.
इतिहासामध्ये राजाचा मुलगाच राजा होतो, पण याला काही असामान्य आपवाद असतात. इतिहासाने मान्य केले आहे , राजा हा कधी जन्माला येत नसतो, तर तो आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळवतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शाहू महाराज होय. शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाडगे यांच्या घराण्यात झाला. त्यांना कोल्हापूरच्या महाराणीने दत्तक घेतले. योगायोगाने ते छत्रपती बनले. राजकोट येथे संस्थानिकांच्या मुलांसाठी असलेल्या विद्यालयात त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. तेथील फ्रेझर या गुरुचा त्यांच्यावर प्रभाव पडला. अगदी लहान वयात म्हणजे वयाच्या केवळ २० व्या वर्षी २ एप्रिल १८९४ रोजी त्यांनी कोल्हापूरच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेतली. सत्ता, संपत्ती, वैभव सारे हाती आले असता त्या मोहपाश्चात गुंतून न राहता जनतेच्या कल्याणाची काळजी करणारा राजा भेटला हे कोल्हापूरच्या जनतेचे, मातीचे सद्भाग्यच समजावे लागेल. हातात आलेला राजदंड वापरुन शाहू महाराजांनी सर्व प्रथम वर्णभेदाची उतरंड उध्वस्त केली. या भूमीत संतांनी उभारलेली समतेची पताका महाराजांनी स्वतःच्या खांद्यावर पेलली.
"बोले तैसा चाले,
त्याची वंदावे पाऊले"
या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांची दुष्काळाच्या दारातून मुक्तता व्हावी यासाठी राधानगरीचे धरण बांधले.
कुलकर्णी वतन नष्ट करुन तलाठीपद निर्माण केले, बलुते पध्दती नष्ट केल्या, पुर्वाश्रमीच्या गुन्हेगारांना मुक्त केले, प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले, ठिकठिकाणी वसतिगृह उभारली.
शाहू महाराज हे परिवर्तनाची सुरूवात स्वतः पासून करणारे कृतिवंत होते, गोरगरिबांचे, दीनदलितांचे राजे होते, विद्वानाचे चाहते होते कलावंताचे त्राता होते, स्थिरचित्ताने धोरण आखणारे नेते होते, उच्चवर्गीय समाजाच्या गुलामगिरीतुन गरिबांना मुक्त करणारे सत्ताधिश होते. त्यांचे कार्य असे होते कि, त्याला मर्यादाच नव्हती. म्हणून असे म्हटले जाते कि,
सागराला किनाऱ्याची,
आकाशाला क्षितिजाची
मर्यादा असते पण।
शाहू महाराजांच्या कार्याला
मर्यादाच नाही।।
अशा या युगप्रवर्तक राजाला अवघे ४८ वर्षांचे आयुष्य लाभले, पण त्यांनी केलेले कार्य आज २१व्या शतकातही प्रेरणादायी ठरते. म्हणून म्हणावेसे वाटते कि,
असा देह मिळवावा,'
चंदनासारखा झिजवावा।
आयुष्य संपले तरी,
सुगंध दरवळत रहावा ॥
हे सुध्दा वाचा⤵️
FAQ
Q.1) राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे ?
Ans. राजर्षी शाहू महाराज जयंती २६ जुन या दिवशी आहे.
Q.2) राजर्षी शाहू महाराजांचा जन्म कधी झाला ?
Ans.राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाडगे यांच्या घराण्यात झाला.
Q.3) राजर्षी शाहू महाराजांनी कधी कोल्हापूरच्या प्रशासनाची सुत्रे हाती घेतली ?
Ans. राजर्षी शाहू महाराजांनी अगदी लहान वयात म्हणजे वयाच्या केवळ २० व्या वर्षी २ एप्रिल १८९४ रोजी त्यांनी कोल्हापूरच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेतली.