Type Here to Get Search Results !

वटपौर्णिमा उखाणे मराठी | vat purnima ukhane marathi

 वटपौर्णिमा उखाणे मराठी | vat purnima ukhane marathi | वटपौर्णिमा साठी उखाणे | वटपौर्णिमा स्पेशल उखाणे | vat Savitri ukhane Marathi| vat purnima sathi ukhane | vat purnima 2023 ukhane| vat Savitri purnima che ukhane| vat purnima vishes ukhane 

Vat purnima ukhane marathi:- नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वटपौर्णिमा उखाणे मराठी. वटपौर्णिमेसाठी नवीन आणि हटके उखाणे आज आपण पाहणार आहोत. हे उखाणे ऐकून तुमच्या मैत्रिणीही करतील तुमच कौतुक.
       
वटपौर्णिमा व्रत दरवर्षी जेस्ट महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला पाळले जाते. वटसावित्री पौर्णिमा व्रताला वटपौर्णिमा असेही म्हणतात.

वटपौर्णिमा उखाणे मराठी

वटसावित्री पौर्णिमा व्रत २०२३ तारीख :- पंचांगानुसार यावर्षी ३ जून रोजी सकाळी ११.१६ वाजता जेष्ठ पौर्णिमा तिथी सुरू होत आहे. ही तारीख दुसऱ्या दिवशी ४ जून रविवारी सकाळी ९.११ वाजेपर्यंत वैद्य असेल. अशाप्रकारे ३ जुन रोजी वटसावित्री व्रत पाळला जाणार आहे. यादिवशी वटवृक्ष, सावित्री आणि सत्यवान यांची पुजा केली जाईल.

➡️ वटपौर्णिमा पुजा विधी मुहूर्त साहित्य सामग्री मराठी माहिती 


वटपौर्णिमा उखाणे मराठी | vat purnima ukhane marathi| वटपौर्णिमा स्पेशल उखाणे मराठी

१ ) वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात,
------- रावांची लाभो मला जन्मोजन्मीची साथ !

२) तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास,
------ रावांसाठी ठेवला मी वटपौर्णिमेचा उपवास !

३) वडाची पूजा करून मागितले दीर्घायुष्याचे दान,
-------- रावांसोबत मी संसार करीन छान !

४) रामाने सीतेसाठी उचलले शिवधनुष्य,
------- रावांसाठी मागते देवाकडे दीर्घायुष्य !

५) वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यासाठी जमल्या साऱ्या बायका,.  ..... रावांचे नाव घेते सर्वजण एका !

६) वडाच पूजा करून गुंडाळते सफेत धागा,
......... रावांच्या जीवनात सदैव राहो माझ्यासाठीच जागा !

७) पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल,
….... रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल !

८) वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास,----रावांचे नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास !

९) दारी होती तुळस ,तिला घातले होते पाणी ,आधी होते आई बाबांची तान्ही ,आता झाले …………ची राणी !


१०) चंदेरी चळिला सोनेरी बटन………..रावांना आवडते तंदूरी चिकन !





वटपौर्णिमा मराठी उखाणे| vat purnima marathi ukhane | वटपौर्णिमा उखाणे मराठी २०२३

११) नवे घर ,नवे लोक, नवी नवी नाती, संसार होईल मस्त………….. राव असता सोबती !


१२) दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र,

—– रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र !


१३) गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, ….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं !


१४) गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट, .…रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट !


१५) नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे, …….रावांना शेवटी अहोच म्हणायचे !


१६) हळद असते पिवळी, कुंकू असते लाल, …. रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल !


१७) मंगळसुत्रातील दोन वाट्या एक संसार आणि दुसरे माहेर, ………….रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर !


१८) पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते, ….. रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते !


१९) जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते मुक होऊन,घडविले देवानी… रावांना जीव लावून !


२०) प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतिची वात,…..रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात !



वटसावित्री पौर्णिमा उखाणे मराठी | vat Savitri purnima ukhane marathi 

२१) नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,   …... रावां सोबत आली मी सासरी !


२२) शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी,आता ….राव माझे जीवनसाथी !


२३) संसाररुपी पुस्तकाचे उघडले पहिले पान ,      …… रावांचे नाव घेते सर्वांचा राखून मान !


२४) राजा-राणीच्या या खेळात त्यांनी केलय मला चेकमेट, …रावांच नाव घेते.. ……..कारण ते आहेतच खूप ग्रेट !


२५) आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हा विष्णु आणि महेश,

….. रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश !


२६) मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर,

…..रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर !


२७) गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी,

…... रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी !


२८) पार्वती ने पन केला महादेवालाच वरीन,

…रावांच्या साथीन, आदर्श संसार करीन !


२९) पौर्णिमेच्या चंद्राची उज्वल प्रभा,

..... राव आहेत माझ्या आयुष्याची शोभा !


३०) नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे,

...... सारखे पती मला जन्मोजन्मी मिळावे !


हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण निबंध मराठी 
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी
➡️ राम नवमी २०२३ मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण निबंध मराठी
➡️ महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी
➡️ महापरिनिर्वाण दिनी भाषण
➡️ संविधान दिन भाषण मराठी
➡️ अण्णाभाऊ साठे भाषण मराठी
➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध मराठी
➡️ शिक्षक दिन भाषण मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध कविता मराठी
➡️ गुढीपाडवा निबंध मराठी माहिती !
➡️ प्रजासत्ताक दिन भाषण निबंध सुत्रसंचलन
➡️ स्वातंत्र्य दिन भाषण



FAQS
Q.1) वटपौर्णिमा कधी आहे ?
Ans. वटपौर्णिमा ३ जुन २०२३ वार शनिवारी रोजी आहे.

Q.2) वटपौर्णिमा व्रत कधी पाळले जाते ?
Ans.वटपौर्णिमा व्रत दरवर्षी जेस्ट महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला पाळले जाते.

Q.3) वटपौर्णिमेच्या दिवशी कोणा कोणाची पूजा केली जाते ?
Ans.वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्ष, सावित्री आणि सत्यवान यांची पुजा केली जाईल.


TAGS
Vat Savitri purnima ukhane Marathi,
Vat purnima ukhane marathi,
Vat purnima marathi ukhane,
Vat Savitri purnima २०२३ ukhane,
Vat Savitri ukhane,vat purnima sathi ukhane,vat Savitri purnima che ukhane, vat purnima special ukhane,vat purnima vishesh ukhane,



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad