Type Here to Get Search Results !

गांधी जयंती निबंध मराठी माहिती | Gandhi Jayanti essay in marathi

 गांधी जयंती निबंध मराठी माहिती | Gandhi Jayanti essay in marathi | महात्मा गांधी जयंती निबंध मराठी pdf | Mahatma Gandhi Jayanti essay in marathi pdf | महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi essay in marathi | Gandhi Jayanti nibandh marathi pdf


गांधी जयंती निबंध मराठी माहिती


गांधी जयंती निबंध मराठी माहिती:- नमस्कार मित्रांनो आज आपण 2 ऑक्टोंबर गांधी जयंती निमित्त अतिशय सुंदर निबंध बघणार आहोत. खालील लेखात दिलेला निबंध तुम्ही शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.


गांधी जयंती निबंध मराठी माहिती | Gandhi Jayanti essay in marathi


महात्मा गांधीजी हे भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांना आपण 'बापू' तसेच 'राष्ट्रपिता' असेही म्हणतो. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोंबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला. त्यांच्या वडि- लांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई हे होते.

त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथे व माध्यमिक शिक्षण राजकोट येथे पूर्ण केले. वयाच्या १३ व्या वर्षी गांधी - जींचा विवाह कस्तुरबा गांधी यांच्यांशी झाला. ते इंग्लंडला जाऊन वकिलीची परीक्षा पास झाले.

पुढे ते भारतात परतले. त्यावेळी भारतात इंग्रजांची सत्ता होती. महात्मा गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम केले. त्यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी येथील मीठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन इ. महत्वपूर्ण आंदो- लने केली. चले जाव, भारत छोड़ो अशा घोषणा देत इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.

गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम केले. त्यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी येथील मीठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन इ. महत्वपूर्ण आंदो- लने केली. चले जाव, भारत छोड़ो अशा घोषणा देत इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. अखेर अनेक प्रयत्नांमुळे व महात्मा गांधीजींच्या नेतृत्वा- मुळे देश स्वतंत्र झाला.

महात्मा गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सत्य व अहिंसेचा मार्ग निवडला. ते फक्त देश स्वतंत्र करण्यासाठी झटले नाहीत तर देशाला स्वावलंबी बनवण्यावर त्यांनी भर दिला. त्यांची राहणी साधी व विचार उच्च होते. त्यांनी परकीय वस्तूंवर बहिष्कार घातला व स्वदेशी वस्तूच्या वापरावर भर दिला.

दुर्देवाने, ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजींनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. महात्मा गांधीजींचे संपूर्ण जीवन आदर्श होते. त्यांनी जगाला सत्य व अहिंसेची मोलाची शिकवण दिली. महात्मा गांधीजींचे कार्य आजही प्रत्येकाला प्रेरणा देते.




गांधी जयंती दहा ओळी निबंध मराठी |10 line essay on Gandhi jayanti


१) भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते म्हणजे महात्मा गांधी.

२) महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे.

३) महात्मा गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ साली गुजरातच्या पोरबंदर शहरात झाला.

४) महात्मा गांधीजींच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई असे होते.

५ ) वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजींचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला.

६) गांधींजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर, माध्यमिक शिक्षण राजकोट आणि वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले.

७ ) भारतीयांना मूलभूत गरजा आणि न्याय मिळवून देण्यासाठी गांधीजींनी इंग्रजांविरूध्द आंदोलन केले.

८) गांधीजींनी इंग्रजांविरूध्द सत्य, अहिंसा, दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव चळवळ हे मार्ग वापरून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

९) रविंद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना 'महात्मा' ही उपाधी दिली.

१० ) ३० जानेवारी १९४८ साली गांधीजींची हत्या झाली.



हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) गांधी जयंती २०२३ कधी आहे ?
Ans. गांधी जयंती २ ऑक्टोंबर २०२३ वार सोमवार रोजी आहे.

Q.2) महात्मा गांधीजी यांचा जन्म कधी झाला
?
Ans. महात्मा गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ साली गुजरातच्या पोरबंदर शहरात झाला.

Q.3) महात्मा गांधीजी यांची हत्या कधी झाली ?
Ans.  ३० जानेवारी १९४८ साली गांधीजींची हत्या झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad