Type Here to Get Search Results !

गांधी जयंती भाषण मराठी | Gandhi Jayanti Speech in marathi

 गांधी जयंती भाषण मराठी | Gandhi Jayanti Speech in marathi | महात्मा गांधी जयंती भाषण मराठी| Mahatma Gandhi Jayanti Speech in marathi | महात्मा गांधी भाषण मराठी pdf | Mahatma Gandhi bhashan marathi pdf 

गांधी जयंती भाषण मराठी

गांधी जयंती भाषण मराठी :- नमस्कार मित्रांनो आज  २ ऑक्टोंबर २०२३ म्हणजेच आज महात्मा गांधीजी यांची जयंती. महात्मा गांधी जयंती संपूर्ण देशात मोठ्या आनंदात साजरी केली जाते. गांधी जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण शाळा कॉलेज महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात म्हणुन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गांधी जयंती भाषण मराठी हे तुम्ही विविध कार्यक्रमांमध्ये भाषण करण्यासाठी वापर करू शकता. खालील लेखात दिलेले भाषणं तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.



गांधी जयंती भाषण मराठी | Gandhi Jayanti Speech in marathi 

जीवन जगले देशासाठी....
देशच होता त्यांचा प्राण !
स्वतंत्र केली भारतमाता....
ते गांधीजी फार महान !

सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय
गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणीनों....
मी पवन....
सर्वांना माझा नमस्कार !

आज मी आपणासमोर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते, सत्य व अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याविषयी बोलणार आहे.

महात्मा गांधी हा शब्द कानावर पडताच आपल्याला आठवते ते म्हणजे डोळ्यावर चष्मा, हातात काठी आणि अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळीबाई असे होते.

महात्मा गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर, माध्यमिक शिक्षण राजकोट व वकिली- चे शिक्षण इंग्लंडला झाले.

त्यावेळी भारतात इंग्रजांचे राज्य होते.ते भारतीयांना अपमानास्पद वागणूक देत होते. म्हणून गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सत्य व अहिंसा या तंत्राचा वापर केला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले.

त्यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी येथील मीठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन इ आंदोलने केली. चले जाव, भारत छोडो अशा घोषणा देत इंग्रजांना पळवून लावले. अखेर अनेक प्रयत्नांमुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.

महात्मा गांधीजींची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. त्यांनी देशवासियांना सत्य, अहिंसा व मानवतेची शिकवण दिली. त्यांनी 'महात्मा'व राष्ट्रपिता अशा पदव्या प्राप्त केल्या लोक प्रेमाने त्यांना 'बापू' म्हणत.

दुर्देवाने 30 जानेवारी १९४८ रोजी
महात्मा गांधीजींची प्राणज्योत मालवली.
परंतु आजही त्यांचे कार्य व विचार आपणास प्रेरणा देतात.शांततेच्या मार्गाने लढा देणाच्या अशा
या थोर देशभक्तास माझे कोटी-कोटी प्रणाम
जय हिंद ! जय भारत !
🙏धन्यवाद 🙏




गांधी जयंती भाषण मराठी pdf | Gandhi Jayanti Speech in marathi pdf 


नमन स्वीकारा आमुचे,
बापू तुम्ही महात्मा.
भारताच्या भवितव्यासाठी,
तुमचा अमर आत्मा ।"

आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो

आज मी आपणासमोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी चार शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे, ही माझी नम्र विनंती.

महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य- संग्रामातील प्रमुख नेते होते. त्यांचे, पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते. महात्मा गांधी यांचा जन्म हा २ ऑक्टोंबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळीबाई असे होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला.

महात्मा गांधीजींनी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर पुढील शिक्षण इंग्लंड. मध्ये घेतले. तिथे अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले. पुढे ते आपल्या मायदेशी भारतात परतले.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी तसेच समाजातील अस्पृश्यता निवारण्यासाठी या महापुरुषाने मोलाची कामगिरी केली. त्यांनी सत्य, अहिंसा, शांतता व स्वदेशीचा स्वीकार करून भारतीय जनतेचे ऐक्य वाढवले. महात्मा गांधीजींनी साधी राहणी व उच्च विचार या तंत्राचा अवलंब करून गोरगरीब जनतेच्या मनात आदराचे स्थान मिळवले.

महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन, दांडी यात्रा, चंपारण्य सत्याग्रह, सविनय कायदेभंग अशी महत्वाची आंदोलने केली. त्यांनी 'चले जाव' 'भारत छोडो' अशा घोषणा देत इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. अखेर, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला व महात्मा गांधीजींचे स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार झाले.

दुर्देवाने, ३० जानेवारी १९४८ रोजी एका असंतुष्टाने या थोर महात्म्याची गोळ्या झाडून हत्या केली.

महात्मा गांधीजी हे त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे संपूर्ण विश्वासाठी सदैव वंदनीय व आदर्शवादी आहेत. अशा या महान राष्ट्रपित्यास व सर्वांच्या लाडक्या बापूस
माझे कोटी कोटी प्रणाम !
जय हिंद, जय भारत!





गांधी जयंती १० ओळी भाषण मराठी | 10 lines speech on Gandhi Jayanti 


१. महात्मा गांधी हे एक महान स्वातंत्र्यसैनिक होते.


२. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते.


३. आपण त्यांना प्रेमाने 'बापू' किंवा 'राष्ट्रपिता' असे म्हणतो.


४. महात्मा गांधीजींचा जन्म २ ऑक्टोंबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला.


५. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद, आईचे नाव पुतळीबाई व पत्नीचे नाव कस्तुरबा गांधी हे होते.


६. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अतोनात कष्ट केले.


७. महात्मा गांधीजींची राहणी साधी व विचार उच्च होते.


८. त्यांनी जनतेला सत्य व अहिंसेचा महान संदेश दिला.


९. दुर्देवाने, ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे या माथेफिरूने गोळ्या झाडून महात्मा गांधींची हत्या केली.


१०. भारतात त्यांचा वाढदिवस 'गांधी जयंती ' म्हणून व जगभरात 'आंत- राष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून साजरा केला जातो.



हे सुध्दा वाचा ⤵️



FAQ

Q.1) गांधी जयंती कधी साजरी केली जाते ?

Ans. गांधी जयंती २ ऑक्टोंबर रोजी साजरी केली जाते.


Q.2) महात्मा गांधीजी यांचे पुर्ण नाव काय होते ?

Ans. महात्मा गांधीजी यांचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते.


Q.3) गांधीजी यांचा जन्म कधी झाला ?

Ans. महात्मा गांधी यांचा जन्म हा २ ऑक्टोंबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला.


Q.४)  महात्मा गांधीजी यांना आपण प्रेमाने काय म्हणतो ?

Ans. महात्मा गांधीजी यांना आपण त्यांना प्रेमाने 'बापू' किंवा 'राष्ट्रपिता' असे म्हणतो.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad