Type Here to Get Search Results !

pm किसान योजनेची ekyc कशी करावी | pm kisan ekyc process online

 pm किसान योजनेची ekyc कशी करावी | pm kisan ekyc process online



pm किसान योजनेची ekyc कशी करावी



नमस्कार शेतकरी मित्रांनो वर्षाला 6000 रूपये देणारी योजना म्हणजे pm किसान सन्मान निधी योजना. या योजनेचा 2000 रूपयाचा पुढील हफ्ता येण्यासाठी आपल्याला ekyc करणे बंधनकारक आहे अशाप्रकारच एक नोटिफिकेन सरकारद्वारे काढण्यात आलेले आहे.

pm किसान सन्मान निधी योजनेची ekyc करत असताना अनेक शेतकरी बांधवांना खुप अडचणी येत होत्या. pm kisan पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे शेतकऱ्यांना ekyc करता येत नव्हती त्यामध्ये कोणाला ओटिपी येत नव्हता तर कोणाचा कॅपचा सेट होत नव्हता अश्या प्रकारच्या खूप अडचणी येत होत्या त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत होता परंतु आता पोर्टल अपडेट झालेलं आहे आणि ekyc ची प्रक्रिया सुरू झाली आहे.


PM किसान योजनेची ekyc कशी करावी|pm kisan ekyc process online


pm किसान योजनेची ekyc करण्याची पद्धत आपण step by step पाहणार आहोत.

  • सर्वप्रथमआपल्याला https://pmkisan.gov.in/ या pm किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. ज्या ठिकाणी ekyc बंधनकारक आहे अशा सुचणा तुम्ही पाहु शकता.

  • pm किसान या पोर्टलवरती उजव्या बाजूला तुम्हाला Farmers corner असे पहायला मिळेल त्याखाली ekyc  असा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

  • ekyc पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल तर त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आधार क्रमांक मागितला आहे.

  • Pm किसानच्या योजनेअंतर्गत आपण जो आधार क्रमांक दिलेला आहे तो आधार क्रमांक तीथे Enter करायचे आहे आणि एंटर केल्यानंतर तुम्हाला सर्च वर क्लिक करायचं आहे.

  • सर्च वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नविन विंडो ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्ही जो मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला आहे तो मोबाईल नंबर इथे मागितला जाणार आहे.

  • यामध्ये आधार, मोबाईल नंबर टाकल्यानंतर GET OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुमचा जो नंबर आधार कार्डशी लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. हा OTP येण्यासाठी वेळ देखील लागु शकतो.

  • आपल्या मोबाईलवर OTP आल्यानंतर तुम्हाला Enter OTP number या पार्यायाच्या खालच्या box मध्ये हा OTP टाकायचा आहे आणि सबमीट बटणवरती क्लिक करायचं आहे.

  • यानंतर आपल्याला आधारचा एक वेगळा OTP मागितला जातो तो आपल्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती येईल. OTP number टाकल्यानंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे.

  • Submit वर क्लिक केल्यानंतर आपल्याला ekyc सबमीट झाली आहे असे समोर पहायला मिळेल किंवा ekyc submitted successfully असे दिसते म्हणजे आपली ekyc पुर्ण झाली.


ekyc करत असताना OTP येण्यासाठी बराच वेळ लागु शकतो असे झाल्यास परत एकदा आपली माहिती भरून OTP साठी प्रयत्न करावा.

अनेक शेतकरी पोर्टलवरती ekyc करत असल्याने पोर्टलवरती लोड येत आहे त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना OTP येण्यासाठी वेळ लागु शकतो.





हे सुध्दा वाचा⤵️




FAQ
Q.1) pm किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला किती पैसे मिळतात ?
Ans. pm किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रूपये मिळतात.

Q.2) pm किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईट कोणती आहे ?
Ans.pm किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईट
https://pmkisan.gov.in/ ही आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad