Type Here to Get Search Results !

पंतप्रधान ठिबक सिंचन योजना 2022 | pm krushi shinchan yojana 2022

पंतप्रधान ठिबक सिंचन योजना 2022|pm krushi shinchan yojana 2022


पंतप्रधान ठिबक सिंचन योजना 2022


नमस्कार मित्रांनो आज आपण पंतप्रधान ठिबक सिंचन योजना व त्यामध्ये झालेल्या बदलाविषयी माहिती बघणार आहोत. पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा अर्ज करावा, या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करावा या बद्दलची माहिती आपण पुढे बघणार आहोत. ही माहिती शेतकऱ्यांसाठी खुप महत्वाची ठरणार आहे.


अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये join व्हा👇



 पंतप्रधान ठिबक सिंचन योजना 2022|pm krushi shinchan yojana 2022


pm krushi shinchan yojana याबद्दलची माहिती तुम्हाला असेल, पंतप्रधान ठिबक सिंचन योजना 2015 मध्ये सुरु करण्यात आली होती मात्र यामध्ये आता काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.


Pm ठिबक सिंचन योजनेमध्ये आता 2 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे, म्हणजेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ 2025-26 पर्यंत घेता येणार आहे - तसेच केंद्र सरकारने या योजनेकरिता 50 हजार कोटींची तरतूद देखील केली आहे.


तसेच सिंचनासाठी जर स्प्रिंकलरचा वापर केला तर 80 ते 90 टक्के अनुदानही शेतकऱ्यांना मिळणार आहे



Pm krushi shinchan yojana 2022|पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेचा लाभ कोणाला घेता येईल ?


 pm krushi shinchan या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतजमिन असणे आवश्यक आहे आणि तसेच शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ वैयक्तिक तर घेताच येईल ,याव्यतिरिक्त शेती गट, संस्था, सहकारी संस्था तसेच कॉर्पोरेट कंपन्या, शेती उत्पादक कंपन्यांच्या गटांचे सदस्य आणि इतर पात्र संस्थांचे सदस्य यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे


याव्यतिरिक्त पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेचा फायदा अशा शेतकऱ्यांनाही घेता येणार आहे जे गेल्या सात वर्षांपासून भाडेपट्टी करारांतर्गत शेतजमिन करत आहेत.



pm krushi shinchan yojana|पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेचा अर्ज कुठं करायचा ?


  • अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी महाडीबीटी (mahadbt) पोर्टल ओपन करा, त्यानंतर सिंचन साधने सुविधा यावर क्लिक करुन समोरील बाबी निवडा हा पर्याय ओपन करायचा आहे 


  •  यामध्ये जिल्हा तालुका गाव आणि वैयक्तिक माहिती भरा, नंतर सिंचन साधने आणि सुविधा हा घटक निवडा - त्यांनतर ज्या पिकासाठी आपल्याला ठिबक सिंचन पाहिजे आहे त्याची माहिती भरा 


  • सेव्ह बटनावर क्लिक करा, नंतर अर्ज सादर करा या पर्याया वर क्लिक करा - त्यानंतर तालुका हे ऑप्शन दिसेल तसेच आपण ज्यासाठी अर्ज केला आहे त्या योजनेचे नाव देखील येते समोर येईल


  • यानंतर अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून 23 रुपये 60 पैसाचे पेमेंट करावे लागणार आहे 


पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेमध्ये- मुदतवाढ झाली हि माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी, खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा 



हे सुध्दा वाचा⤵️








FAQ
Q.1) पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करावा ?
Ans. पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज mahadbt या शासनाच्या अधिकृत पोर्टलवर करावा.

Q.2) पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेमध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत ?
Ans. Pm ठिबक सिंचन योजनेमध्ये आता 2 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे, म्हणजेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ 2025-26 पर्यंत घेता येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad