Type Here to Get Search Results !

लाला लजपतराय मराठी माहिती भाषण निबंध | Lala Lajpat Rai information in marathi

 लाला लजपतराय मराठी माहिती भाषण निबंध | Lala Lajpat Rai information in marathi | lala lajpat rai essay in marathi




लाला लजपतराय जयंती 2022 : नमस्कार मित्रांनो आज आपण स्वतंत्र्यासाठी लढा देणारे स्वातंत्र सेनानी लाला लजपतराय यांच्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामध्ये लाला लजपतराय यांच्या घोषणा, त्याचे विचार, त्याचे पुस्तके ईत्यादी पुढे आपल्याला पहायला मिळेल.


लाला लजपतराय मराठी माहिती | lala lajpat rai information in marathi | lala lajpat rai nibandh in marathi 



 लजपतराय यांनी गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील लाल-बाल पाल या तीन प्रमुख नायकांपैकी ते एक होते. या त्रिकोणातील प्रसिद्ध लाला लजपत राय केवळ एक निस्सिम देशभक्त, शुर स्वातंत्र्य सैनिक आणि एक चांगले नेताच होते असे नव्हे तर एक उत्तम लेखक, वकील, समाज-सुधारक आणि आर्य समाजी देखील होते. 

शेर. ए. पंजाब या उपाधीने सन्मानित आणि भारतातील महान लेखक लाला लजपतराय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 मध्ये धुडिके या गावी एक सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडिल राधाकृष्ण एक चांगले शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी होते आणि त्या शिख परिवारातील होत्या. लालाजींच्या परिवारातील संस्कारांनीच त्यांना देशभक्तीच्या कार्याची प्रेरणा दिली होती. 

कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते एक चांगले वकील देखील झाले पण त्यात त्यांचे मन रमले नाही. वकीली सोडून त्यांनी बँकिंग क्षेत्राकडे आपला मोर्चा वळविला. पी. एन. बी. आणि लक्ष्मी विमा कंपनीची पायभरणी केली. बाल गंगाधर टिळकानंतर लाला लजपतराय त्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते ज्यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. ते काँग्रेसच्या बैठकांना उपस्थित राहात असत. त्यांच्या कार्याला पाहाता 1920 साली त्यांना नैशनल कॉग्रेसचे प्रेसिडेंट म्हणून नियुक्त करण्यात आले.

लाला लजपतराय यांनी संपूर्ण देशात स्वदेशी वस्तु स्विकारण्याकरीता एक अभियान चालवले. बंगाल विभाजनाचा कडाडून विरोध केला आणि या आंदोलनात हिरीरिने सहभाग घेतला. ब्रिटीश सरकार विरुद्ध शक्तीशाली भाषण देत त्यांना हादरवून सोडणारे लाला लजपतराय यांच्या देशाप्रती असलेल्या देशभक्ती आणि निष्ठेला पाहाता त्यांना 'पंजाब केसरी' आणि 'पंजाब चा सिंह' देखील म्हंटल्या जाते.

 सायमन कमीशनचा विरोध शांततेने करण्याची लालाजंची इच्छा होती. त्यांचे म्हणने असे होते की जर कमीशन पैनल मधे भारतीय राहु शकत नाहीत तर या कमिशन ने भारतातून परत जावे.

सरकार त्यांची मागणी मानण्यास तयार नव्हते आणि या उलट त्यांनी लाठी चार्ज सुरू केला या अमानुष लाठीचार्ज मधे लालाजी गंभीररित्या जखमी झाले आणि त्यांची प्रकृति खालावत गेली.

आपल्याशेवटच्या भाषणात ते म्हणाले- माझा शरीरावर लागलेला एक एक गाव ब्रिटिश साम्राज्याचा मृत्यूचे  कारण असेल." पोलिसांकडून झालेल्या या लाठीचार्ज मुळे 17 नोव्हेंबर 1928 ला त्यांचा मृत्यू झाला.

 गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरीता लाला लजपत राय यांनी अखेरच्या वासापर्यंत जोरदार संघर्ष केला आणि शहीद झाले.



लाल लजपतराय पुस्तके | lala lajpat rai books

लाला लजपतराय यांनी लिहिलेली पुस्तके खालल
 प्रमाणे आहेत..

  • द कलेक्टड वर्क्स ऑफ लाला लजपतराय
  • यंग इंडिया
  • महान अशोक
  • लाला लजपतराय रायटिंग अँड स्पीचेस
  • म्याझिनी, ग्यारीबालडी, शिवाजी महाराज यांची उर्दू भाषेत लिहिलेली संक्षिप्त चरित्र
  • श्रीकृष्ण आणि त्यांची शिकवण


हे सुध्दा वाचा ⤵️












FAQ
Q.1) लाला लजपतराय यांचा जन्म कधी झाला ?
Ans. लाला लजपतराय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 मध्ये धुडिके या गावी एक सामान्य कुटुंबात झाला. 

Q.2) लाला लजपतराय कोंग्रेसचे अध्यक्ष कधी बनले ?
Ans. लाला लजपतराय यांना 1920 साली कलकत्त्याला विषेष सत्रात कोंग्रेसचे अध्यक्ष बणवण्यात आले.


Q.3) लाला लजपतराय यांचा मृत्यू कधी झाला ?
Ans. प्रदर्शणात पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज मुळे 17 नोव्हेंबर 1928 ला लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad