Type Here to Get Search Results !

बालिका दिन भाषण निबंध मराठी माहिती | balika din bhashan nibandh marathi mahiti

 बालिका दिन भाषण निबंध मराठी माहिती | balika din bhashan nibandh marathi mahiti



बालिका दिन भाषण निबंध मराठी माहिती



क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात ३ जानेवारी हा दिवस महिला शिक्षण दिन आणि बालिका दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. यापुढे हा दिवस सावित्री उत्सव म्हणून साजरा केला जाईल अशी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. यापूर्वी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येत होता..

राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये महिला दिन, तसेच सावित्रीबाईंचा जन्म, जन्मगाव, मुलींची पहिली शाळा कोठे, कधी स्थापन झाली, सावित्रीबाईंची लेखन संपदा, इतर सामाजिक कार्य या मुद्द्यांवर थेट प्रश्न विचारले जाऊ शकतात,



बालिका दिन निबंध भाषण मराठी|balika din nibandh bhashan marathi mahiti


नमस्कार बालमित्रानो, आज 3 जानेवारी आपण आजचा दिवस बालिका दिन' म्हणून साजरा करतो. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका त्याचप्रमाणे मुलींच्या शिक्षणाची ज्योत प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वसामान्यांच्या घरातील शिक्षण पणती पेटविण्यासाठी धडपडणारी क्रांतीची एक तेजस्वी ज्योत म्हणजेच सावित्रीबाई फुले . आज त्यांचा जन्मदिवस.


 खंडोजी नेवसे पाटील घराण्यातील ह्या ज्योतीचा जन्म सातारा येथील नायगाव येथे दि. ३ जानेवारी १८३१ रोजी झाला .त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्यांचा विवाह वयाच्या ९ व्या वर्षी झाला म्हणजे आज 3 रीत शिकणाच्या मुलीचा त्याकाळी विवाह केला जात होता. यावरून तुम्हाला त्यावेळची सामाजिक परिस्थिती समजून येईल.


सासरच्या घरी आल्यानंतर ज्योतिबांरोबर त्यांचा बालसंसार सुरु झाला. ज्योतीराव शिक्षण घेत होते. ज्योतीरावांनी आपली पत्नी सावित्रीला शिकवण्याचा निर्णय घेतला. अडचण होती ती शाळा, वर्ग, शिक्षक, फळा, खडू यांची यातील कोणतीच गोष्ट मात्र त्यांच्याजवळ नव्हती. मात्र ज्योतीरावांनी ही अडचण लगेच सोडवली .

ज्योतिबांनी शेतीला शाळा बनवलं, झाडांना वर्ग बनवलं, स्वतःला शिक्षक बनवलं, धरतीला फळा बनवलं व गवताच्या काडीला खड्डू बनवलं. या निसर्गाच्या शाळेत ज्योतीरावांनी सावित्रीला मुळाक्षरे शिकवली याच सावित्रीबाई भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व आदर्श मुख्याध्यापिका बनल्या.



 सन १८४० साली फुले मदाम्पत्यांनी भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरु केली. महात्मा फुले यांनी सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेत सावित्रीबाईनी प्रशिक्षित शिक्षिका म्हणून कार्य सुरु केले. त्यांच्या शाळेत सुरुवातीला केवळ ६ मुली शिक्षण घेत होत्या. या सहा विदयार्थीनीपासून त्यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य सुरु झाले. त्यावेळी आजच्या सारखा पगार साधी कवडीसुद्धा मोबदला नव्हता तरीही त्यांनी हे ज्ञानदानाचे कार्य केले.


 सावित्रीबाईचे हे शिक्षणकार्य खरोखरच एक अभ्यासविषय आहे, कारण त्यांनी ज्या काळात हे कार्य सुरु केले तेव्हा भारतीय समाजाची स्थिती मागासव दयनीय होती. एकूणच समाज मानसिक रोगांनी ग्रस्त व सामाजिक व्याधीनस्त होता.


वर्णवर्चस्व, अस्पृश्यता, अज्ञान, अंधश्रद्धा , अनिष्ट रूढी, परंपरा इ. रोगांनी समाजाला ग्रासले होते. अशा वाईट परिस्थितीमध्ये ज्यांनी ज्ञानज्योत पेटविली, त्या सावित्रीबाई महान कर्तृत्ववान होत. त्यांनी हे ओळखले होते की मुक्याला बोलके करायचे असेल, गुलामाला गुरगुरायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही . शिक्षणामुळे सृजनशीलता वाढते सत्यअसत्य भलेबुरे हित-अहित कळायला लागते नवी दृष्टी मिळते.


शिक्षणाने गुलामीची जाणिव होते. माणसाला गुलामीचे जोखड उतरविण्याचे सामर्थ्य सामर्थ्य लाभते. 16 नोव्हेंबर १८५३ रोजी इंग्रज सरकारने त्यांचा गौरव करून त्यांना सन्मानित केले. यावरून समजते की इंग्रजानांही दाखल घ्यावी लागली एवढे प्रेरणादायी सावित्रीबाईनी केले पढे जाऊन त्यांनी ज्योतीबांच्या सामाजिक कार्यातही सक्रीय सहभाग घेतला.


गेल्या दीडशे वर्षांपेक्षा जास्त कालखंडानंतर सावित्रीबाईंच्या विचारांचे स्मरण करण्याची आवश्यकता आहे. त्यांचे विचार अभ्यासूपणे समजून घेतले पाहिजेत.


सावित्रीबाई या केवळ शिक्षिका नव्हत्या तर उत्कृष्ट कवयत्री लेखिका, समाजसेविका होत्या त्यांच्या गरुडभरारीवरून आजच्या महिला- मुली निश्चितच प्रेरणा घेतील व आदर्श भारत घडवतील अशी आशा वाटते.




हे सुध्दा वाचा ⤵️














FAQ
Q.1) बालिका दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. बालिका दिन ३ जानेवारी या दिवशी साजरा केला जातो.

Q.2) मुलींची पहिली शाळा कोठे सुरू झाली ?
Ans. सन १८४० साली फुले मदाम्पत्यांनी भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरु केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad