Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी | national safety day bhashan in marathi

 राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी | national safety day bhashan nibandh in marathi | rashtriya suraksha diwas bhashan marathi


राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी


राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2022 : नमस्कार मित्रांनो आज आपण 4 मार्च 2022 म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा दिवस याबद्दलची माहिती, भाषण, निबंध बघणार आहोत.

राष्ट्रीय सुरक्षा दिवसाच्या निमित्ताने वाद विवाद स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, बॅनर प्रदर्शन अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करून त्यामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या सदस्याला पुरस्कार ही दिला जातो.


राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध मराठी | national safety day bhashan nibandh in marathi


राष्ट्रीय सुरक्षा दिवस : सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान अतिथीवर्ग, सर्व अधिकारी आणि माझ्या सर्व सहकर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे या सुरक्षा सप्ताहाच्या समारोप सोहळ्यात स्वागत करतो आणि आपणा सर्वांनी या सोहळ्याच्या समारोप प्रसंगी मला भाषणाची संधी दिलीत याकरता मी आपला आभारी आहे.

आपण सर्व हे जाणताच की, देशाच्या जनतेला व सर्व कर्मचारी बांधवांना सुरक्षेच्या प्रती जागरूक करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 4 मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच 4 मार्च ते 11 मार्च हा आठवडा सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो.

 या काळात अनेक कार्यालये, कारखाने, औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी सुरक्षाविषयक विविध कार्यक्रम राबवले जातात. ज्यामध्ये फक्त देशाची सुरक्षाच नाही तर स्व सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा, रस्ता सुरक्षा, विविध आजार व रोगांपासून सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा अशा अनेक गोष्टींबद्दल अतिरिक्त माहिती पुरवली जाते.

तसेच सुरक्षा उपकरणे व सुरक्षा साधनांची ओळख ही या काळात करून दिली जाते. जेणेकरून कधी अपघातजन्य परिस्थिती उद्भवल्यास त्या प्रसंगाचा सामना करणे सोयीस्कर होईल. 4 मार्च 1966 रोजी, नॅशनल सेफ्टी कौन्सिल ची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून अनेक औद्योगिक, खाजगी, सरकारी कार्यालये, कारखान्यांच्या ठिकाणी साजरा केला जातो.

आपले कर्मचारी तसेच कामगार मित्र स्व सुरक्षा व त्यासाठी लागणाऱ्या उपाय योजना व उपकरणांसंबधी जागरूक असावे हा एकमेव हेतू त्यामागे असतो. या दरम्याने अनेक स्पर्धांचे ही आयोजन केले जाते. वाद विवाद स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, बॅनर प्रदर्शन अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करून त्यामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या सदस्याला पुरस्कार ही दिला जातो.

तसेच कामगार वर्गाच्या सुरक्षिततेसंबंधी माहिती देणारे प्रशिक्षण वर्ग ही चालवले जातात. ज्यामध्ये कारखान्यात काम करताना कोणत्या उपकरणांसोबत, मशिनरी सोबत काय काळजी घ्यायची व आपत्तीजनक काही परिस्थिती किंवा एखादा अपघात झाल्यास काय प्राथमिक उपाययोजना करायची याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच असा प्रसंग उद्भवू नये याकरिता करायच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती ही या प्रशिक्षण वर्गात दिली जाते.

राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करताना फक्त सुरक्षा विषयक माहितीच नाही तर त्यासंबंधी असलेले भारतीय कायदे व नियम याविषयीचे ज्ञान ही कर्मचारी वर्गाला दिले जाते जेणेकरून कर्मचारी बांधवांना आपले सुरक्षा विषयक अधिकार व हक्क यांची ही जाणीव होईल.

 राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यामागे एकमेव उद्देश हा आहे की, काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा तसेच आपल्या सहकाऱ्यांच्या सुरक्षेविषयी जागरूक करणे. या सप्ताह / दिवशी आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमात सर्वांनी भाग घेऊन या कार्यक्रमाचा लाभ उठवला पाहिजे.

तर मित्रहो, तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन या सोहळ्याचा आनंद घेतला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली या करिता मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. तसेच आपल्यासाठी अशा माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आपल्या अधिकारी वर्गाचे व कार्य संस्थेचे मी धन्यवाद मानतो.

या विविध कार्यक्रमातून तुम्हा सर्वांना स्व सुरक्षे संबंधी, कार्य सुरक्षे संबंधी तसेच अपघात उपाययोजना संबंधी जी काही माहिती मिळाली आहे त्याचा तुम्ही सुयोग्य वापर कराल अशी आशा व्यक्त करतो. मला इथे तुम्हा सर्वसमक्ष आभार प्रदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार.

                      🙏 धन्यवाद 🙏






हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन













FAQ
Q.1) राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो ?
Ans.दरवर्षी 4 मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो.

Q.2) राष्ट्रीय सुरक्षा दिवस 4 मार्चलाच का साजरा केला जातो ?
Ans. 4 मार्च 1966 रोजी, नॅशनल सेफ्टी कौन्सिल ची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून अनेक औद्योगिक, खाजगी, सरकारी कार्यालये, कारखान्यांच्या ठिकाणी साजरा केला जातो.

Q.3) राष्ट्रीय सुरक्षा दिवस का साजरा केला जातो ?
Ans.देशाच्या जनतेला व सर्व कर्मचारी बांधवांना सुरक्षेच्या प्रती जागरूक करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ४ मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad