Type Here to Get Search Results !

यशवंतराव चव्हाण भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी | Yashwantrao Chavhan speech in marathi

 यशवंतराव चव्हाण भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी | Yashwantrao Chavhan speech essay in marathi | Yashwantrao Chavhan bhashan nibandh marathi


यशवंतराव चव्हाण भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी


यशवंतराव चव्हाण जयंती २०२२ : नमस्कार मित्रांनो आज आपण स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी भाषण निबंध सुत्रसंचालन बघणार आहोत. ही माहिती तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील लहान मुलांना शाळेत होणाऱ्या भाषण स्पर्धामध्ये उपयोगी पडू शकते. 


यशवंतराव चव्हाण भाषण निबंध मराठी | Yashwantrao Chavhan speech essay in marathi


        "मराठी मातीचा सुगंध दरवळला 
          संह्याद्री मिळाला हिमालयाला, 
       देह त्यागी या जीवाचे मूल्य ते काय आहे 
     ध्येयार्थ जगल्या जिवाचे जगणे अमुल्य आहे."

सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरूजन वर्ग येथे बसलेल्या माझ्या बाल मित्रांनो ! आज मी तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.

स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे पूर्ण नाव यशवंत बळवंत चव्हाण होते. त्यांचा जन्म १२ मार्च १९१३ मध्ये देवराष्ट्र गावात झाला.

बालपणातच त्यांनी आपल्या वडिलांना गमावले. त्यानंतर विठाबाई, यशवंतराव चव्हाण यांची आई, तिने आपल्या भावाच्या मदतीने मुलांना सांभाळलं,शिकवलं. विठाबाईंनी यशवंत रावांना लहानपणापासूनच देशप्रेम आणि स्वावलंबनाचे धडे दिले.

 यशवंतरावांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. त्यामुळे मराठी सोबतच संस्कृत आणि इंग्रजीचंही त्यांनी अफाट वा केलं. वडील लहानपणीच गेल्यामुळे चव्हाण कुटुंबाना गरीबीचा सामना करावा लागला, शाळेचे शुल्क सुद्धा भरने त्यांना अशक्य होत होते. तरीही शिक्षण चालूच ठेवायचं निर्धार त्यानी केला होता.

 यशवंतराव चव्हाण कॉलेजात असताना यशवंतराव महात्मा गांधी, नेहरू, मार्क्स आणि राममनोहर लोहिया यांच्या विचारसरणीकडे आकर्षित झाले होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींनी स्वीकारलेला अहिंसेचा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि गांधी, नेहरू विचारसरणीचा स्वीकार केला तो कायमचाच.

१९४६ मध्ये मुंबई प्रांताच्या विधीमंडळात यशवंतरावांनी प्रवेश केला आणि त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. मोरारजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतरावांनी मंत्री म्हणून काम सुरू केले. मग द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्य केले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना देखील राबवल्या.

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दीड-पावणे दोन वर्षे त्यांनी काम केले पण तेवढय़ा काळात या राज्याच्या जडणघडणीचा ठोस असा पाया त्यांनी घातला. एकाचवेळी शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, आर्थिक अशा विविध पातळ्यांवर विकास कामांना आणि नवीन संस्थात्मक उपक्रमांचा त्यांनी प्रारंभ केला.

१९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले आणि पंडित नेहरूंनी यशवंतरावांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला बोलावले. यशवंतराव यांचा मृत्यू २५ नंवबर १९८४ मध्ये हृदय विकाराच्या झटक्याने झाला तेंव्हा ते ७१ वर्षांचे होते.येवढे बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत !
                 
                      🙏 धन्यवाद 🙏


हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन












FAQ
Q.1) यशवंतराव चव्हाण यांचा जन्म कधी झाला ?
Ans. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ मध्ये देवराष्ट्र गावात झाला.

Q.2) यशवंतराव चव्हाण यांचे पुर्ण नाव काय होते ?
Ans.स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे पूर्ण नाव यशवंत बळवंत चव्हाण होते.

Q.3) यशवंतराव चव्हाण यांचा मृत्यू कधी झाला ?
Ans. यशवंतराव यांचा मृत्यू २५ नंवबर १९८४ मध्ये हृदय विकाराच्या झटक्याने झाला तेंव्हा ते ७१ वर्षांचे होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad