Type Here to Get Search Results !

जागतिक पर्यावरण दिन निबंध भाषण मराठी माहिती | jagtik paryavaran din nibandh marathi

 जागतिक पर्यावरण दिन निबंध pdf भाषण मराठी माहिती | jagtik paryavaran din nibandh marathi mahiti|पर्यावरण दिन भाषण मराठी |पर्यावरण दिन काळाची गरज निबंध मराठी | World Environment day 2022


जागतिक पर्यावरण दिन २०२२ : सर्वांना नमस्कार दरवर्षी 5 जुनला जागतिक पर्यावरण दिन फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पर्यावरण दिन साजरा करत असताना पर्यावरणाप्रती आपली जागरूकता वाढावी आणि आपले वर्तन पर्यावरण पूरक असावे हा अतिशय महत्त्वाचा उद्देश आहे. आज आपण जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक अप्रतिम निबंध पर्यावरण समतोल काळाची गरज. विद्यार्थी व अभ्यासकांनी हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.

जागतिक पर्यावरण दिन निबंध मराठी माहिती | jagtik paryavaran din nibandh pdf marathi mahiti


५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन वेगवेगळ्या संकल्पना मांडून साजरा करण्याचे आव्हान केले जाते. 'जागतिक पर्यावरण दिन' साजरा करण्यात सर्व लोकांच्या सहभागाला महत्त्व असून यातून शासन, सामाजिक गट, कारखानदार या सर्वांना पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करण्यासाठी प्रेरणा मिळते. जगभरातील १०० पेक्षा अधिक देशांमध्ये हा दिवस निरनिराळ्या पध्दतींनी साजरा केला जातो.

यात पथयात्रा, हरित सोहळे, निबंध व पोस्टर स्पर्धा, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम यासारखे उपक्रम राबविले जातात. हा दिवस साजरा करून आपण स्वतःला व इतरांना पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्रेरित करत असतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे.

दरवर्षी ५ जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, पर्यावरणाच्या समस्या व पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून सुयोग्य अशा पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

पर्यावरण हा शब्द मूळ फ्रेंच शब्द Environ या शब्दापासून तयार झाला आहे. सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून निर्माण झालेली सजीवांच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील अत्याचाराचे भयावह परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले.

त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या चांगल्या स्वरुपाबरोबरच त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागतील ह्याची प्रखर जाणीव झाली. म्हणून इ. स. १९६० मध्ये पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे लागू करण्यात आले. तसे पाहिले तर मानव हा पर्यावरणाचाच एक अत्यंत बुध्दीमान सजीव भाग म्हणा वा सजीव घटक आहे.

मात्र पर्यावरणाच्या इतर बहुतांशी सर्वच सजीव असो वा निर्जीव अशा प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण बनले आहे. सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच सरोवरातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमानसात पटवून देण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करणे. नद्यांचे प्रदूषण शहरी सांडपाण्यामुळे होत असल्याने त्या विषारी बनत आहेत. त्यासाठी त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. पर्यावरण व प्रदुषणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने सहमत केलेल्या अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविल्यास आपण ख-या अर्थाने पर्यावरणाच्या समृद्धीचा दिशेने वाटचाल करू, यात शंका नाही.

पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरुनच सुरुवात करुया. पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणा-या वस्तू जसे पेपर, काचेच्या वस्तू, अल्युमिनियम, मोटरऑईल अशांची पुनर्निर्मिती करुया. हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करुया. शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करु या.

प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणा-या कागदी पिशव्या वापरु या. अन्न आणि भाजीपाला प्लॅस्टीकमध्ये न ठेवता अल्युमिनियमच्या वस्तुत ठेवूया. पाण्याचा गैरवापर करणे थांबवूया. घरातील रुम हिटरचा वापर न करता स्वेटर घालून इलेक्ट्रीक ऊर्जेचा वापर टाळूया. गरज नसल्यास घरातील टी. व्ही. बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवूया.

घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बदं करुया. याशिवाय आणखी एक पाऊल पुढे जाऊन, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणा-या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी विविध मोहिमा राबवूया आणि या माध्यमातूनच जनजागृती करुया.

आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करून चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो हे आपण सुनामी, सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे.

हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने वरीलप्रमाणे उपक्रम राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू आणि ख-या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु.




हे सुध्दा वाचा⤵️
FAQ
Q.1) जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. दरवर्षी ५ जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.

Q.2) जागतिक पर्यावरण दिन का साजरा करण्यामागील उद्देश काय आहे ?
Ans. जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे.

Q.3) पर्यावरण हा शब्द कसा तयार झाला ?
Ans. पर्यावरण हा शब्द मूळ फ्रेंच शब्द Environ या शब्दापासून तयार झाला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad