Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर | Grampanchayat Election 2022 Declared

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर | Grampanchayat Election 2022 Declared 

  राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे - निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांत ग्रामपंचायतींच्या सदस्यपद आणि सरपंचपदाच्या निवडणुकीचा निर्णय घेतला आहे . 


ग्रामपंचायतींच्या 7 हजार 751सरपंच निवडणुकीसाठी १८ डिसेंबर २०२२ ला मतदान होणार आहे - त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल २० डिसेंबर २०२२ ला समोर येईल, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले आहे.


निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल ?

  • नव्याने स्थापित सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.
  • नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील.
  • नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल.
  • नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.
  • मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.
  • नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.
  • मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.

कोणत्या जिल्हा व तालुक्यात निवडणुका होणार ?

अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड , भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ, नांदेड व नाशिक इत्यादी ठिकाणी निवडणुका होतील.

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका - हि बातमी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा.


हे सुध्दा वाचा ⤵️



FAQ
Q.1) ग्रामपंचायत निवडणूक मतदान करण्याची तारीख काय आहे ?
Ans.ग्रामपंचायत निवडणूक मतदान करण्याची तारीख 18 डिसेंबर 2022 ही आहे.

Q.2) सरपंच पदासाठी अर्ज आपण कधीपासून करू शकतो ?
Ans. 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील.

Q.3) राज्यात किती ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत ?
Ans.ग्रामपंचायतींच्या 7 हजार 751सरपंच निवडणुकीसाठी १८ डिसेंबर २०२२ ला मतदान होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad