Type Here to Get Search Results !

लोकमान्य टिळक भाषण मराठी माहिती | Lokmanya Tilak speech in marathi

 लोकमान्य टिळक भाषण मराठी माहिती | Lokmanya Tilak speech in marathi | Lokmanya Tilak bhashan marathi mahiti | लोकमान्य टिळक मराठी भाषण

 लोकमान्य टिळक जयंती 2022 : नमस्कार मित्रांनो आज आपण २३ जुलै रोजी लोकमान्य टिळक जयंती निमित्त भाषण मराठी माहिती बघणार आहोत. लोकमान्य टिळक जयंती निमित्त खालील लेखात दिलेले भाषण तुम्हाला शालेय जीवनात विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी पडेल. लोकमान्य टिळक भाषण तुम्ही शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती.

लोकमान्य टिळक भाषण मराठी | Lokmanya Tilak speech in marathi

आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष,आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र - मैत्रिणींनो आज आपण येथे सर्वजण लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त जमलेलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना लोकमान्य टिळक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे,आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना आत्मविश्वासाने आणि धाडसाने सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक.अशा या महान नेत्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरवात करते.भारतीय स्वातंत्र्यलढयातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, संपादक, वक्ते यांमुळे 'लोकमान्य' अशी उपाधी प्राप्त झालेले लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे आहे.

लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते.टिळक हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते. गणित हा त्यांचा आवडता विषय होता.त्यांच्या या कुशाग्र बुध्दिमुळेच त्यांचे शिक्षक त्यांना 'सुर्याचे पिल्लू' म्हणत. टिळकांच्या लहान वयातच आईचे छत्र हरविले आणि ते अवघे सोळा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा ही मृत्यू झाला. टिळकांना अन्याविरूध्द चिड होती.त्यांची बंडखोरी वृत्ती आणि कणखर बाणा हा लहानपणापासूनच दिसत होता.

वयाच्या १६व्या वर्षी लोकमान्य टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि १७व्या वर्षी त्यांचे लग्न सत्यभामाबाई ऊर्फ तापीबाई यांच्यासोबत झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला.त्यांचे गणित व संस्कृत हे आवडते विषय होते. १८७६ साली टिळक गणित विषयातून बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. यावरच न थांबता पुढे त्यांनी एल. एल. बी. पर्यंत मजल मारली.

डेक्कन कॉलेजमध्ये असताना लोकमान्य टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली.या मैत्रीच्या मदतीने त्यांनी सामाजिक क्षेत्रातही काम केले. १८८० मध्ये त्यांनी विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि आगरकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि १८८५ मध्ये फर्ग्युसन कॉलेज चालू केले.
मराठी व केसरी ही वृत्तपत्रे चालू केली. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. लोकांनी एकत्र यावे आणि त्यांच्या मनामध्ये राष्ट्रियत्वाची भावना निर्माण व्हावी, हाच त्यांचा उद्देश होता.

१८९६ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. टिळकांनी शेतक-यांना संघटीत होण्याचे आवाहन केले. त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले आणि केसरी वर्तमान पत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या हक्कांची जाणिव करून दिली.१८९७ साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्वपूर्ण ठरली. इंग्रज सरकारशी लढताना त्यांना ६ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली, त्यावेळी त्यांनी मंडालेच्या तुरूंगात 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला.

इ.स. १९२० साली आजारपणामुळे लोकमान्य टिळकांचे निधन झाले. पंडित जवाहरलाल नेहरूंना ही बातमी कळताच त्यांनी 'भारतातील एक तेजस्वी सुर्याचा आज अस्त झाला' असे उदगार काढले. भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणा-या या नेत्याला असंतोषाचे जनक म्हणले जाते. असे थोर व्यक्तिमत्व आपल्याला लाभले, याचा मला फार अभिमान आहे. अशा या महान नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम !!
              
                    🔴  धन्यवाद 🔴



हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) लोकमान्य टिळक यांचा जन्म कधी झाला ?
Ans.लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. 

Q.2) लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव काय होते ?
Ans. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते.

Q.3) लोकमान्य टिळक यांचे निधन कधी झाले ?
Ans. इ.स. १९२० साली आजारपणामुळे लोकमान्य टिळकांचे निधन झाले. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad