Type Here to Get Search Results !

आषाढी एकादशी २०२३ मराठी माहिती pdf | Ashadhi ekadashi 2023 marathi mahiti pdf

 आषाढी एकादशी २०२३ मराठी माहिती pdf | Ashadhi ekadashi 2023 marathi mahiti pdf | आषाढी एकादशी तिथी मुहूर्त उपवास माहिती मराठी| Ashadhi ekadashi thithi muhurt upvas marathi


आषाढी एकादशी २०२३ :- नमस्कार मित्रांनो आज आपण २९ जून रोजी आषाढी एकादशी निमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आषाढी एकादशी संपूर्ण माहिती. आषाढी एकादशी तिथी, मुहूर्त, उपवास,महत्व अशी संपूर्ण माहिती तुम्हाला खालील लेखात बघायला मिळणार आहे. ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.


आषाढी एकादशी तिथी मुहूर्त उपवास माहिती मराठी| आषाढी एकादशी २०२३ मराठी माहिती PDF 


आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशी म्हटली की, आपल्याला वेध लागतात ते आषाढी वाऱ्यांचे. आषाढी वारी सुखात झाली असून, राज्यातील विविध भागांतून लाखो वारकरी पायी पंढरपूरला निघाले आहेत.

जाणून घेऊया आषाढी एकादशी कधी आहे? आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात? एकादशीचा मुहूर्त, पूजाविधी आणि महत्व.

प्रत्येक मराठी महिन्यात दोन एकादशी येतात. ज्यावर्षी अधिक मास असेल, त्यावर्षी दोन एकादशी अधिक असतात. म्हणजेच सामान्य पणे वर्षाला २४ असलेल्या एकादशी अधिक मासाच्या वर्षात २६ होतात.

यंदा देवशयनी एकादशी 29 जून रोजी आहे. या दिवसापासून भगवान विष्णू संपूर्ण 5 महिने योग निद्रामध्ये जातील आणि 23 नोव्हेंबर 2023 रोजी देवऊठी एकादशीच्या दिवशी जागे होतील.

आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्त्व अतिशय वेगळे आहे. विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले वारकरी पंढर पुरात दाखल होतात.

राज्यातील विविध भागांतून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात. संत ज्ञानेश्वरांपासून ते जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला मार्गस्थ होतात.

विठुनामाच्या गजरात तहान-भूक हरपून वारकरीविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढी एका दशीला देवशयनी एकादशी का म्हटले जाते? आषाढीएकादशी कधी आहे, मुहूर्त, पूजाविधी आणि महत्व जाणून घेऊया.


आषाढी एकादशी मुहूर्त आषाढी एकादशी प्रारंभ : 
२९ जून २०२३ पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी ते आषाढी एकादशी समाप्ती : ३० जून २०२३ रोजी पहाटे २ वाजून ४२ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे आषाढी एकादशी गुरुवार २९ जून २०२३ रोजी साजरी करण्यात येईल.

काही पुराणांमधील उल्लेखानुसार, श्रीविष्णूंनी वामन अवतार धारण करून बळी राजाला पाताळात धाडले होते.


त्याचप्रमाणे बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले होते. बळी राजा ला दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा काळ आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीचा मानण्यात आला आहे.

श्रीविष्णू आषाढी एकादशीला बळीच्या राज्यात जातात आणि कार्तिकी एकादशीला स्वगृही क्षीरसागरात परतात, अशी मान्यता आहे. त्या मुळे आषाढी एकादशी देवशयनी आणि कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी नावाने ओळखली जाते.

आषाढी एकादशीची पूजाविधी विठ्ठल हा विष्णूचा अवतार समजण्यात येतो. यामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरात विठ्ठला च्या दर्शनाला रीघ लागते.

एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहावे एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावं. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो.

आषाढी एकादशीचा उपवास कोणी ही आपल्या क्षमतेनुसार करू शकतो. एकादशीचा उपवास करणार्यांनी दशमीच्या दिवसा पासून तामसिक वस्तुंचे सेवन करु नये.

उपवासाच्या दिवशी रताळे, बटाटे, साबुदाणा खिचडी, सैंधव मीठ, दूध, सुकामेवा, केळी, आंबे, खाऊन उपवास करावा.

रात्री हरिभजन करत जागरण करावं. विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा. यादिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी विठ्ठलाची आरती,

विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणं सोडावं. या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करावी आणि अहोरात्र तुपाचा दिवा लाववा.




सुध्दा वाचा ⤵️

➡️ स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण निबंध मराठी 
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी
➡️ राम नवमी २०२३ मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण निबंध मराठी
➡️ महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी
➡️ महापरिनिर्वाण दिनी भाषण
➡️ संविधान दिन भाषण मराठी
➡️ अण्णाभाऊ साठे भाषण मराठी
➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध मराठी
➡️ शिक्षक दिन भाषण मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध कविता मराठी
➡️ गुढीपाडवा निबंध मराठी माहिती !
➡️ प्रजासत्ताक दिन भाषण निबंध सुत्रसंचलन
➡️ स्वातंत्र्य दिन भाषण  




FAQ
Q.1) आषाढी एकादशी २०२३ कधी आहे ?
Ans. आषाढी एकादशी २०२३ गुरुवार २९ जून रोजी आहे.

Q.2) आषाढी एकादशी मुहूर्त तिथी कधी आहे?
Ans.आषाधी एकादशी प्रारंभ २९ जून २०२३ पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी ते आषाढी एकादशी समाप्ती : ३० जून २०२३ रोजी पहाटे २ वाजून ४२ मिनिटे.


Q.3) आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात ?
Ans. श्रीविष्णू आषाढी एकादशीला बळीच्या राज्यात जातात आणि कार्तिकी एकादशीला स्वगृही क्षीरसागरात परतात, अशी मान्यता आहे. त्या मुळे आषाढी एकादशी देवशयनी आणि कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी नावाने ओळखली जाते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad