Type Here to Get Search Results !

राजर्षी शाहू महाराज सुविचार कोट्स शुभेच्छा मराठी | Rajarshi shahu Maharaj quotes in marathi

राजर्षी शाहू महाराज सुविचार कोट्स शुभेच्छा मराठी | Rajarshi shahu Maharaj quotes in marathi | राजर्षी शाहू महाराज सुविचार मराठी| राजर्षी शाहू महाराज कोट्स मराठी | राजर्षी शाहू महाराज शुभेच्छा संदेश मराठी| rajarshi shahu Maharaj suvichar marathi| rajarshi shahu Maharaj quotes in marathi| rajarshi shahu Maharaj wishes in marathi

राजर्षी शाहू महाराज जयंती २०२३ :- आरक्षणाचे जनक सामाजिक लोकशाहीचे भारस्तंभ समतावादी लोकराजे राजर्षी शाहू महाराज हे एक लोककल्याणकारी राजा होते. बहूजनाना शिक्षण, जातीभेद निर्मूलन,नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्री मुक्तीसाठी कायदा करणारे सुधारणावादी समाज सुधारक होते. 

सिंहाची चाल, गरुडा ची नजर, 
महिलांचा आदर, शत्रूचे मर्दन, 
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन, 
हीच छत्रपती शाहू महाराजांची शिकवण.

राजर्षी शाहू महाराज सुविचार कोट्स शुभेच्छा मराठी


महाराष्ट्र राज्याला ३ समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभल्यामुळे या राज्याला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती २६ जुन रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत राजर्षी शाहू महाराज यांचे प्रेरणादायी सुविचार कोट्स शुभेच्छा मराठी हे तुम्ही शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती.



राजर्षी शाहू महाराज सुविचार कोट्स शुभेच्छा मराठी| rajarshi shahu Maharaj quotes wishes in marathi


1) शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे, असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, असे इतिहास सांगतो.

2) अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी आणि लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे.

3) मनू आणि त्यांच्या मागून आलेल्या शास्त्रकारांनी कमी जातीच्या लोकांसाठी विद्या मंदिराचे दरवाजे बंद केलेत.

4) स्वराज्या ऐवजी आपण प्रथम शिक्षण घेतले पाहिजे. जोपर्यंत हिदुस्थान जाती बंधनांनी निगडित राहील तोपर्यंत स्वराज्य स्थापनेपासून मिळणारे संपूर्ण फायदे त्यास घेता येणार नाहीत.म्हणून निरनिराळ्या समाजातील लोकांना शिक्षण देण्याची पद्धत मी काळजीने अनुसरत आहे.

5) आमच्या थोर देशाच्या नैतिक आणि सांपत्तिक प्रगतीच्या कामी व सार्वजनिक हितासाठी निरनिराळ्या जातींचे एकीकरण करण्याचे आपण शक्य तितके प्रयत्न करूया.

6) अशा स्थितीत मिळणाऱ्या स्वराज्याचा अर्थ मूठभर लोकांच्या हाती सत्ता जाणे होय.

7) जोपर्यंत आमच्यामध्ये जातीजातीतील मतभेद आणि मत्सर जिवंत आहेत, तोपर्यंत आम्ही आपापसात झगडत राहणार आणि आमच्या हितवृद्धीस अपाय करून घेणार.

8) आमच्यातील कलह नाहीसे करण्यास आणि आम्हाला स्वराज्यास पात्र करून -घेण्याकरिता ही अनर्थकारक जाती पद्धती झुगारून देणे आम्हाला अत्यंत आवश्यक आहे.

9) हल्लीच्या स्थितीत आमचे ध्येय साध्य करण्यासाठी जे कर्तव्य आम्हाला करावयाचे आहे, ते आमचा समाज सुशिक्षित करणे व त्याची मने तयार करणे हे होय.

10) प्रत्येक समाजाने आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणाकरिता झटणे अत्यंत आवश्यक आहे.

11) जन्मसिद्ध हक्कांबरोबर कर्तव्यकर्मे व जबाबदारी यांची जोड असते.

12) सुधारणेच्या सर्व चळवळीत पुढाकार घेणे, हे उच्चवर्णीयांचे कर्तव्य आहे.



13) आमच्यातील थोर व पूज्य विभूति श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यापुढे ठेवलेले ध्येय आज विसाव्या शतकात आपण आपल्या नजरेपुढे ठेवले पाहिजे व त्याचे अनुकरण केले पाहिजे.

14) जितक्या लवकर आम्ही आमची जातिबंधने मोडून टाकू, तितक्या लवकर आपली स्वराज्याबद्दलची लायकी वाढत जाईल.हे तत्त्व ज्यादिवशी आमच्या मनात बिबेल, तोच राष्ट्राचा सुदिन होय.

15) आम्ही शेतकरी किंवा सैनिक होऊन राहावे ही स्थिती आम्हाला समाधानकारक नाही.म्हणून व्यापार-धंदे व इतर उच्च प्रतीचे व्यवसाय यात आम्हाला शिरण्याची गरज आहे.

16) व्यापार करण्याचे साहस आम्ही केले नाही, तर आमच्या सर्व चळवळी निस्तेज व निरर्थक होतील.

17) सर्व माणसे ईश्वराची लेकरे असल्याने त्यांचे परस्परांशी बंधुत्वाचे नाते आहे. जातिभेद मोडणे इष्ट आहे, गरजेचे आहे. जातिभेद देशोन्नतीच्या मार्गात अडथळा आहे.

18) जातीभेदाचे कार्य जातीद्वेष हे आहे. जातीद्वेष हा हिदुस्थानचा फार पुराना रोग आहे. त्यासाठी जातीभेद मोडून आपण एक होऊया.

19) माझी सर्व प्रजा मराठी तिसरी इयत्ता जरी शिकून तयार झाली असती, तर त्यांना राज्यकारभाराचे हक्क आनंदाने देऊन मी आजच विश्रांती घेतली असती.

20) ब्रिटिश सरकारच्या हातातून सत्ता काढून घेऊन ती विद्यासंपन्न अशा अल्पसंख्यांक ब्राह्मण वर्गाच्या हाती देणे मला बिलकुल पसंत नाही.

21) खालच्या वर्गाच्या लोकांच्या बुद्धीवर व ज्ञानावर जे जड व जुलमी जू लादले गेले आहे, ते झुगारून देण्याची शक्ती बहुजन समाजाच्या अंगी येण्यास सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाची फार गरज आहे.

22) हिंदुस्थानात आहे या प्रकारचा जातिभेद पृथ्वीच्या पाठीवर कोणत्याही दुसऱ्या देशात नाही.या विश्वात दुसऱ्या कोणत्याही ग्रहावर तरी सापडेल की नाही, याविषयी संशयच आहे.

23) हिदुस्तानला जी गुलामगिरी हजारो वर्ष भोगावी लागत आहे, तिचे प्रमुख कारण हा जातीभेद आहे.

24) जातीभेदापासून नुकसानीपेक्षा फायदा जास्त झाला आहे, असे कोणास दाखवता येईल का?



राजर्षी शाहू महाराज सुविचार कोट्स शुभेच्छा मराठी| rajarshi shahu Maharaj quotes wishes in marathi 


  • मागे पडलेल्यांना मी सारखे म्हणजे एका जातीचे समजतो व त्यांना वर आणण्याचा प्रयत्न करतो. हे माझे पवित्र कर्तव्य आहे, असे मी समजतो.

  • प्रेमाने प्रेम वाढते व द्वेषाने द्वेष वाढतो. प्रेमाने जनावरास वागवले तर ते जनावर देखील उलटे प्रेम करते.

  • वयात आलेल्या व आपले हित- अहित कळणाऱ्या मुलांकडे लक्ष देण्याची आईबापास गरज नसते.

  • पण जी अज्ञात आहेत, ज्यांना चालता येत नाही, ज्यांना धड उभेही राहता येत नाही, त्यांची काळजी आईबापास घ्यावी लागते.असे करणारे आईबापच योग्य तऱ्हेने आपले कर्तव्य बजावतात.

  • स्वार्थाची साधने हाती आली की चांगले लोकही वाईट व जुलमी होतात.

  • आपले शिक्षण आपल्या हाती घ्या व उन्नतीच्या मार्गास झपाट्याने लागा.

  • प्रिय बंधूंनो, एक व्हा. जोराचा प्रयत्न करा व बौद्धिक गुलामगिरीतून सुटून जा.

  • स्वातंत्र्याकरिता जीव द्या. काय वाटेल ते करा, परंतु . तुम्हाला जे पशूप्रमाणे वागवितात त्यांच्यापासून स्वतंत्रता मिळवा.

  • बारीक-सारीक भेद विसरून एक व्हा व जोराचा प्रयत्न करा. अन्यायाने वागू नका.

  • जितक्या जोराने आपल्याला प्रतिकार होईल, जितक्या अधिक अडचणी आपल्या मार्गात येतील, तितक्या अधिक उत्साहाने, अधिक जोराने व अधिक ईर्षेने आपण आपल्या कार्यास लागू व यश मिळवू.

  • आताच्या तीव्र जीवन कलहाच्या काळात कोणताही समाज शिक्षण संपन्न असेल, तरच तो टिकाव धरू शकेल.

  • स्वावलंबन' ही यशाची किल्ली आहे.

  • आमच्या धर्मात जातिभेदामुळे जो उच्चनिचपणा आलेला आहे, तशा प्रकारचा जन्मजात भेदभाव जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणत्याही धर्मात नाही.

  • ज्याप्रमाणे एखादा डॉक्टर अगदी अशक्त व दुबळ्या मुलाला अन्न व औषधे देऊन त्याची जोपासनां सर्वांपेक्षा विशेष काळजीने करून त्याला इतर मुलाच्या जोडीला आणून बसवितात, त्याचप्रमाणे आम्ही अस्पृश्य मानलेल्या लोकांना वर आणले पाहिजे.

  • आपण आपल्या एकाच पूर्वापार धंद्याला चिकटून न राहता शिक्षण घेतले पाहिजे. आपण फौजेत तसेच कचेऱ्या व मोठमोठ्या जागा पटकावल्या पाहिजे.

  • तसेच वकील, बॅरीस्टर, डॉक्टर, व्यापारी वगैरे स्वतंत्र धंद्यात प्रविणता मिळवून आपली उन्नती करून घेतली पाहिजे.

  • कोणत्याही देशाची राजकीय भवितव्यता त्यातील लोकांच्या सुचारित्र्यावर अवलंबून असते.याकरिता सर्वांनी आपले शील सुधारण्याचा प्रयत्न करून आपल्यामध्ये आपल्यास दिलेल्या हक्कांचा उपयोग करण्याची योग्यता आहे, असे आपल्या वर्तनाने दाखवले पाहिजे.


  • बहुजन समाज ब्राह्मणी गुलामगिरीत व अज्ञानात हजारो वर्षे वाढलेला असल्याने सत्यशोधकांच्या कामात पुष्कळ अडथळा येत असतो. अर्थात सुधारकांना अडचणींशी टक्कर देणे भागच पडत असते.

  • व्यक्तीच्या दृष्टीने धर्म ही बाब महत्त्वाची असेल, पण राष्ट्रीय बाबतीत ती केव्हाही आड येता कामा नये.

  • खरा धर्म सर्व देशात एकच आहे. त्याचप्रमाणे वागणाऱ्यांवर म्हणजे शुभ कर्म करणाऱ्यांवर ईश्वर संतुष्ट असणार व त्यांना काही शिक्षा करणार नाही.

  • या देशाची उन्नती लवकर किंवा उशिरा होणे, हे येथील जातिभेद ज्या प्रमाणात नाहीसा होईल त्यावर अवलंबून आहे.

  • सामाजिक नीतिमत्ता वाढवणे हे सामाजिक सुधारणेचे एक महत्त्वाचे अंग आहे.

  • शीलवान नागरिकांशिवाय राष्ट्र बनणे किंवा उदयास येणे या गोष्टी शक्यच नाहीत.

  • आपण योग्य पुढारी नेमून दिले पाहिजेत. जर अयोग्य व अविचारी पुढारी नेमले तर त्यांच्या दुष्परिणामास आपणच जबाबदार होऊ, सरकार होणार नाही.

  • आपण आपली सामाजिक व धार्मिक उन्नती करून घेतली पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये जे पुष्कळसे जातिभेदामुळे पक्ष झाले आहेत, ते मोडले पाहिजेत.

  • सर्वांना समतेने वागवले पाहिजे. सर्वांना विद्या दान दिले पाहिजे. सर्वांचा धार्मिक हक्क समान समजला पाहिजे.

  • आपल्या जातीत विद्येचा प्रसार करण्याचा प्रयत्न करणे '. हे प्रत्येकाचे काम आहे.

  • ज्या समाजात आपण वाढलो, त्या समाजाची उन्नती करण्याची जबाबदारी आपल्यावरही आहे, याचा विसर पडता कामा नये.

  • गवताच्या एका काडीची ताकद जास्त नसते. पण अशा अनेक काड्यांचा वेठ वळला, तर त्याने हत्तीलाही बांधता येते.

  • मागासलेल्या लोकांचा मार्गदर्शक होऊन त्यांना उच्च स्थिती प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करण्यात मला आनंद वाटतो.

  • मी आपला पुढारी झालो तरी आपल्याला केव्हाही भलत्या मार्गाने नेणार नाही.

  • जातिभेदामुळे हिंदू समाजाचे अत्यंत नुकसान झाले आहे, असे माझे ठाम मत आहे.

  • तोंडाने बडबडणारे पुढारी आम्हाला नको आहेत. कृतीने जातीभेद मोडून आम्हाला मनुष्याप्रमाणे वागवतील, असे पुढारी पाहिजेत. .

  • जेथे जेथे आपल्या सामाजिक व मानव जातीला असणाऱ्या नैसर्गिक हक्कांचा प्रश्न येईल तेथे आपण शहाणपणाने, प्रेमाने परंतु दृढ आग्रहाने स्थिर राहिले पाहिजे. आपले हक्क बजावले पाहिजेत.

  • देशाची म्हणजे देश बंधूंची सेवा करणे, जनीजनार्दन शोधणे व पाहणे, हाच खरा धर्म आहे.

  • आमच्या सर्व देश बंधूंना मोठ्या प्रेमाने आपल्या बरोबरीचे हक्क देऊन वागविले पाहिजे.

  • सर्व प्रजाजनास सारखे हक्क आहेत. सर्वांना सारखे कायदे लागू केले पाहिजेत.

  • माझी मते ज्याला पसंत असतील त्यांनी स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वतंत्रपणे माझे अनुकरण करावे.


सुध्दा वाचा ⤵️

➡️ स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण निबंध मराठी 
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी
➡️ राम नवमी २०२३ मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण निबंध मराठी
➡️ महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी
➡️ महापरिनिर्वाण दिनी भाषण
➡️ संविधान दिन भाषण मराठी
➡️ अण्णाभाऊ साठे भाषण मराठी
➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध मराठी
➡️ शिक्षक दिन भाषण मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध कविता मराठी
➡️ गुढीपाडवा निबंध मराठी माहिती !
➡️ प्रजासत्ताक दिन भाषण निबंध सुत्रसंचलन
➡️ स्वातंत्र्य दिन भाषण  




FAQ
Q.1) राजर्षी शाहू महाराज यांची जयंती कधी आहे ?
Ans. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती २६ जुन रोजी आहे.

Q.2) राजर्षी शाहू महाराज यांचे पुर्ण नाव काय होते ?
Ans. राजर्षी शाहू महाराज यांचे पुर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे हे होते.

Q.3) छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कधी झाला ?
Ans. छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला.















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad