Type Here to Get Search Results !

महाशिवरात्री पुजा विधी मुहूर्त साहित्य मराठी | mahashivratri puja vidhi muhurt marathi

 महाशिवरात्री पुजा विधी साहित्य मुहूर्त मराठी | mahashivratri puja vidhi sahitya marathi


महाशिवरात्री पुजा विधी साहित्य मुहूर्त मराठी

महाशिवरात्री 2022 (mahashivratri 2022) : नमस्कार मित्रांनो आज आपण 1 मार्च या दिवशी सुरू होत असलेली महाशिवरात्र याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत. महाशिवरात्रीची पुजा, विधी मुहूर्त कधी आहे ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत.


महाशिवरात्री पुजा विधी मुहूर्त साहित्य मराठी  | mahashivratri puja vidhi muhurat marathi 

महाशिवरात्री हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी 'महाशिवरात्री' म्हणून ओळखली जाते.

महाशिवरात्री हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी 'महाशिवरात्री' म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान शंकर पृथ्वीच्या अधिक जवळ येतात. 

तमोगुणांचे ते प्राशन करतात, पण यादिवशी मात्र ते विश्रांती घेतात म्हणून महाशिवरात्री हा दिवस महादेवाचा सगळ्यात आवडता दिवस असतो. यावेळी मंगळवार 1 मार्च 2022 रोजी महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा केली जाईल. या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, अशी मान्यता आहे..

 महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा असतो. एका मान्यतेनुसार या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 ते 3 या प्रहरात महादेवांचा जागर केला जातो. 

शंकराला बेलपत्र, रुद्राक्ष प्रिय आहेत म्हणून ते अर्पण केले जातात. या दिवशी शंकरांच्या पिंडिवर अभिषेक केला जातो. बेलपत्र पांढरी फुले, धोत्रा, आंबा यांची पत्री आणि भस्म अर्पण केला जातो. काही ठिकाणी गंगाजलाचा अभिषेकही केला जातो.





महाशिवरात्रीची पुजा वीधी पद्धत मराठी | mahashivratri puja vidhi paddhat

शिवरात्रीच्या व्रताची पुजा विधी पद्धत :

  • मातीच्या भांड्यात पाणी किंवा दूध भरून, वर बेलाची पाने, आक-दतुरा, तांदूळ इत्यादी ओतून शिवलिंगाला अर्पण करावे. जर जवळपास शिवमंदिर नसेल तर घरामध्ये मातीचे शिवलिंग बनवून त्यांची पूजा करावी.
  • या दिवशी शिवपुराणाचे पठण आणि महामृत्युंजय मंत्र किंवा शिवाच्या पंचाक्षर मंत्राचा जप ओम नमः शिवाय करावा. यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी रात्र जागरणाचाही नियम आहे.
  • शास्त्रीय विधीनुसार शिवरात्रीची पूजा 'निशिथ काळात' करणे उत्तम. मात्र, भाविकांना त्यांच्या सोयीनुसार रात्रीच्या कोणत्याही चार प्रहरांमध्ये ही पूजा करता येते.



महाशिवरात्री मुहूर्त मराठी | mahashivratri muhurth marathi

 महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त 1 मार्चला मंगळवारी 3 वाजून 16 मिनिटांपासून सुरू होईल आणि बुधवारी 2 मार्च रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत असेल. रात्रीची पूजा संध्याकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी ते रात्री 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत चालणार आहे. शिवरात्रीच्या रात्री चार पहर पूजा केली जाते.


महाशिवरात्री चार प्रहर पूजाविधी वेळ :

प्रहर पहिला : मंगळवार 1 मार्च 2022 संध्याकाळी 6.21 मी ते 9.27 मिनिटापर्यंत असणार आहे.


प्रहर दुसरा : मंगळवार 1 मार्च 2022 रात्री 9.27 मी ते 12.33 मिनिटापर्यंत असणार आहे.


प्रहर तीसरा : बुधवार 2 मार्च 2022 रात्री 12.33 मी ते सकाळी 3.39 मिनिटापर्यंत असणार आहे.


प्रहर चौथा : बुधवार 2 मार्च 2022 सकाळी 3.39 मी ते 6.45 मिनिटापर्यंत असणार आहे.


शिवरात्रीचा व्रत करण्यासाठी शुभ मुहूर्त :

 शिवरात्रीच्या व्रत शुभ मुहूर्त 2 मार्च 2022 बुधवार संध्याकाळी 6. 46 मिनिटांपर्यंत राहणार आहे.



हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन











FAQ

Q.1) महाशिवरात्रीचा पुजेचा शुभ मुहूर्त कधी सुरू होत आहे ?

Ans. महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त 1 मार्चला मंगळवारी 3 वाजून 16 मिनिटांपासून सुरू होईल आणि बुधवारी 2 मार्च रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत असेल.


Q.2) महाशिवरात्रीची पुजा कशी करावी ?

Ans. या दिवशी शिवपुराणाचे पठण आणि महामृत्युंजय मंत्र किंवा शिवाच्या पंचाक्षर मंत्राचा जप ओम नमः शिवाय करावा. यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी रात्र जागरणाचाही नियम आहे.


Q.3) महाशिवरात्री कधी असते ?

Ans. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी 'महाशिवरात्री' म्हणून ओळखली जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad