Type Here to Get Search Results !

जागतिक जल दिन मराठी माहिती भाषण निबंध | jagtik jal din information in marathi

जागतिक जल दिन मराठी माहिती भाषण निबंध | jagtik jal din information in marathi | jagtik jal din bhashan nibandh marathi mahiti


जागतिक जल दिन मराठी माहिती भाषण निबंध

जागतिक जल दिन २०२२ : नमस्कार मित्रांनो आज आपण २२ मार्च २०२२ या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजे जागतिक जल दिन या दिवसाबद्दलची माहिती बघणार आहोत. 

जागतिक जल दिन २०२२ ची थीम काय आहे ?
Ans. जागतिक जल दिन २०२२ ची थीम आहे “Groundwater : making the invisible visible”- भुजल : अदृश्याला दृश्यमान करणे.



जागतिक जल दिन भाषण मराठी माहिती | jagtik jal din bhashan marathi mahiti 

 आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील गुरुजनवर्ग, आणि जमलेल्या माझ्या वर्गमित्रांनो आज आपण जागतिक जल दिन साजरा करत आहोत त्या निमित्ताने आज आपण इथे जमलो आहोत जल दिनाचे निमित्त साधून दोन शब्द सांगतो

           काय उपयोग तुमच्या पैशांचा, 
             आणि सोन्याच्या नाण्याचा,
              जेव्हा नसेल तुमच्याकडे 
                एकही थेंब पाण्याचा...

पाणी म्हणजे जीवन आणि या जीवसृष्टीच्या मूलभूत गरजा पैकी एक म्हणजे पाणी. सर्व सजीव शृंखला पाण्या भोवती गुंत आहे, पाणी नाही तर तिचा देखील काही उपयोग होऊ शकत नाही, म्हणून असे पाण्याचे महत्त्व जगाला पटवून देण्यासाठी २२ मार्च हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक जल दिन म्हणून साजरा करावा असे सांगितले आणि लगेच २२ मार्च १९९३ हा पहिला जागतिक जल दिन भारतात साजरा करण्यात आला.

 स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांपेक्षा दृष्य कला, पाण्याचा संगीत आणि संगीताचे सण, स्थानिक तलाव, तलाव, नदी आणि पाणी साठवण, पाणी व्यवस्थापन आणि सुरक्षेचा विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे हा साजरा केला जातो. टेलिव्हिजन आणि रेडिओ वाहिन्या किंवा इंटरनेटद्वारे संदेश प्रसार करणे, स्वच्छ पाणी आणि संवर्धन उपाययोजनांवर आधारित शिक्षण कार्यक्रम. गीता आणि उपक्रम बरेच. वर्ल्ड वॉटर डे उत्सवाचे मुख्य चिन्ह म्हणजे निळा जलाशयाचा आकार.

पूर्वीचे काळी लोकसंख्या खूप कमी होती. त्यामुळे दरडोई पाण्याची उपलब्धता जास्त होती. आता लोकसंख्या वाढीमुळे दरडोई उपलब्धता घसरली आहे. पण माणसाने पाण्याच्या वापरात मात्र काहीच बदल केले नाहीत. या उलट पाणी वापराचे नवनवीन मार्ग मात्र तो शोधित असतो. त्यामुळे पाणी प्रश्नाची तीव्रता वाढतच चालली आहे. ती थांबवायची असेल तर आपण आपली मानसिकता बदलून पाणी बचतीचे नवनवीन मार्ग शोधून काढावयास हवेत.

 पावसाच्या पाण्याची साठवणूक कशी करता येईल? भूजलाची पातळी कशी थांबवता येईल ? तलावांमधील आक्रमण थांबवून त्यांचं संवर्धन कसं करता येईल ? पाण्याचा पुनर्वापर कसा होईल ? पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल ? पाण्याचा सरकारीकरण कसं थांबवता येईल ? याचे जनप्रबोधन करून जलसाक्षरतेचे महत्त्व पटवून ठेवूया !

 प्रत्येक गोष्टीसाठी पाणी हे लागतात पाण्याचा वापर करणे आपण थांबवू शकत नाही पण पाण्याच्या सुयोग्य वापर यामुळे पाणी वाचवू शकतो उद्याची तहान भागवण्यासाठी. 
               शेवटी एवढेच म्हणेन... 
           आपण पाणी वाचवु शकतो, 
पण बनवू शकत नाही.आजोबांनी नदीत पाणी पहिले वडिलांनी विहिरीत पहिले...मी नळात पाहिले... माझ्या मुलांनी बाटलीत पाहिले... पुढची पिढी कुठं बघेल..... हा विचार करा... त्यामुळे पाणी वाचवा देश वाचवा.




हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ रंगपंचमी निबंध मराठी माहिती 

➡️ होळी निबंध मराठी माहिती

➡️ जागतिक ग्राहक दिन निबंध मराठी

➡️ जागतिक महिला दिन भाषण निबंध मराठी

➡️ राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध 

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन








FAQ
Q.1) जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. जागतिक जल दिन २२ मार्च या दिवशी साजरा केला जातो.

Q.2) भारतात पहिला जागतिक जल दिन कधी साजरा करण्यात आला ?
Ans. २२ मार्च १९९३ हा पहिला जागतिक जल दिन भारतात साजरा करण्यात आला.

Q.3) जागतिक जल दिन २०२२ ची थीम काय आहे ?
Ans. जागतिक जल दिन २०२२ ची थीम आहे “Groundwater : making the invisible visible”- भुजल : अदृश्याला दृश्यमान करणे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad