Type Here to Get Search Results !

पाणी हेच जीवन निबंध मराठी | water is life essay in marathi

 पाणी हेच जीवन निबंध मराठी | water is life essay in marathi | pani hech jivan nibandh marathi


पाणी हेच जीवन निबंध मराठी


पाणी हेच जीवन निबंध मराठी : नमस्कार मित्रांनो आज आपण पाणी हेच जीवन या विषयावर निबंध मराठीमध्ये बघणार आहोत. पाणी हेच जीवन या निबंधाचा उपयोग तुम्ही शालेय जीवनात निबंध लेखन स्पर्धांमध्ये करू शकता.

पाणी हेच जीवन निबंध मराठी | water is life essay in marathi | pani hech jivan nibandh marathi


पाणी पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. संपूर्ण सजीव सृष्टीची उत्पत्ती पाण्यामुळे झाली. सजीवांच्या जीवनात प्राणवायू व पाणी यांना जास्त महत्त्व दिले जाते. म्हणूनच पाण्याचा वापर खूप काटकसरीने केला पाहिजे. पाणी हा नैसर्गिक स्त्रोत असला तरी त्याचे समान वितरण, वाढती मागणी व व्यवस्थापनाचा अभाव यामुळे सध्या त्याची टंचाई जाणवू लागली आहे. पृथ्वीच्या पाठीवरील वाढत्या लोकसंख्येला पाण्याचा पुरवठा करणे कठीण होऊ लागले आहे.

मानवाला पिण्यासाठी घरगुती वापरासाठी, शेती वीजनिर्मिती, कारखाने इत्यादी कामासाठी पाण्याची आवश्यकता भासते. पर्यावरणातील प्रत्येक सजीवाला आपल्या दैनंदिन कामांसाठी पाण्याची आवश्यकता असते. आणि म्हणूनच पाण्याला जीवन किंवा अमृत म्हणतात.

काही दुष्काळग्रस्त भागातील लोकांना थोड्याशा पाण्यासाठी दूरवर वणवण करावी लागते. कारण त्यांच्या राहण्याच्या ठिकाणा पर्यंत पिण्याचे पाणी पोचवण्याच्या सुविधा नसतात. अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर भासते. मानवाचे उच्च राहणीमान, वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. ज्याप्रमाणे पाण्याची आवश्यकता वाढते. त्याचप्रमाणे पाण्याचे प्रदूषण ही वाढते.त्यामुळे सजीवसृष्टीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वातावरणातील अशुद्ध हवा प्रदूषण यामुळे पावसाचे पाणी सुद्धा शुद्ध स्वरूपात मिळत नाही.

सद्यस्थितीत जल प्रदूषण ही मोठी समस्या जगासमोर उभी राहिलेली आहे. कारखान्यातून निघणारे विषारी घटक मिश्रित पाणी समुद्र किंवा नदीत मिसळते. घरगुती सांडपाणी, शेतीतून निघणारे सांडपाणी तसेच नदी, नाले, तलाव यात साठलेला गाळ, पाण्यात गुरांना धुणे,पाण्यात अस्थी व निर्माल्य विसर्जन करणे, इत्यादी सर्व कारणामुळे जलस्रोतातले पाणी दूषित होते.

जल प्रदूषणा मुळे पिण्याच्या पाण्याद्वारे अनेक घातक द्रव्य व रसायने मानव तसेच इतर सजीवांच्या शरीरात जातात. व अनेक रोग जडतात. असे पाणी मानवाच्या शरीरात गेल्याने कावीळ, त्वचारोग, कॉलरा व विषमज्वर इत्यादी रोग होतात. व प्रसंगी मृत्यूही ओढवतो. त्यासाठी शुद्ध व निरोगी पाण्याची आवश्यकता असते. गढूळ पाण्यात क्लोरीन, ब्रोमीन इत्यादी मिसळल्याने त्यातील जंतू मरतात. व पाणी शुद्ध होते. तसेच पाणी गाळून पिणे, त्यात तुरटी चा वापर करणे, आता फिल्टरचा वापर करून पाणी शुद्ध केले जाते. पाण्याची साठवण करण्यासाठी पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शोषखड्डे केले पाहिजेत, नदी व तलावांच्या पात्रातील गाळ काढला पाहिजे. निर्माल्यसाठी ही वेगळी सुविधा केली पाहिजे. कारखान्यातील सांडपाण्यावर योग्य शुद्धीकरणाची प्रक्रिया करून ते बाहेर सोडले पाहिजे सर्व सजीवांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून 
          "पाणी अडवा पाणी जिरवा' 
या मोहिमेचा अवलंब सर्वांनी केला पाहिजे.




हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ रंगपंचमी निबंध मराठी माहिती 

➡️ होळी निबंध मराठी माहिती

➡️ जागतिक ग्राहक दिन निबंध मराठी

➡️ जागतिक महिला दिन भाषण निबंध मराठी

➡️ राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध 

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन









FAQ
Q.1) जागतिक जल दिन कधी आहे ?
Ans. जागतिक जल दिन २२ मार्च २०२२ या दिवशी आहे.

Q.2) जागतिक जल दिन २०२२ ची थीम काय आहे ?
Ans. “Groundwater : making the invisible visible”- भुजल : अदृश्याला दृश्यमान करणे. ही थीम जागतिक जल दिन २०२२ ची आहे.

Q.3)  मानवाला कोणकोणत्या कामांसाठी पाण्याची आवश्यकता भासते ?
Ans. मानवाला पिण्यासाठी घरगुती वापरासाठी, शेती वीजनिर्मिती, कारखाने इत्यादी कामासाठी पाण्याची आवश्यकता भासते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad