Type Here to Get Search Results !

मराठी उखाणे नवरीसाठी २०२३ | marathi ukhane for female 2023

 मराठी उखाणे नवरीसाठी २०२३ | marathi ukhane for female 2023 | नवरीसाठी स्पेशल उखाणे मराठी | marathi special ukhane for womens | नववधूंसाठी मराठी उखाणे | Marathi ukhane for brides


1) लावित होते कुंकु, त्यात पडला मोती,
…रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती !

2) “नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद ,
…रावांचे नाव घेते द्या सत्यनारायणाचा प्रसाद !”

3) “दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
…चे नाव घेते तुमच्या साठी!”

4) मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,
… रावांचे हेच रुप मला फार आवडले,

5) आज सारे सुख माझ्या दारी दाटले,
…रावांचा प्रेम अजुन तरी नाही आटले.

6) बागेत बाग राणीचा बाग
अनं …….रावांचा राग म्हणजे
धगधगनारी आग.

7) मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा,
…राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा.

8) सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा,
…रावामुळेच लागला मला त्याचा लळा.

9) शिक्षणाने विकसीत होते, संस्कारीत जीवन,
…रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन.

➡️ ११वी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर 


नवरीसाठी गृहप्रवेश उखाणे | gruh pravesh ukhane navari sathi

1) इंद्र धनुष्यात असतात सप्तरंग,
…रावांच्या संसारात मी आहे हंग.

2) निळ्या नभात चंद्राचा प्रकाश,
…रावांवर आहे माझा विश्वास.

3) प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे,
…रावांच्या साथी साठी माहेर सोडावे लागे.

4) प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची,
…रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची.

5) शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन,
… रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन,

6) चंद्राचा झाला उद्य अन् समुद्राला आली भरती,
…रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती.

7) नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,
… रावांचा स्वभाव आहे फारच उदार.

8) करवंदाची साल चंदनाचे खोड,
… रावांचे बोलने अमृतापेक्षा गोड.

9) सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले,
… रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले.

10) वसंतातली डाळ पन्ह, देती थंडावा
…रावांसह मला आपला आशीर्वाद हवा.

11) सुशिक्षीत धराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
रावांशी लग्न करुन सौभाग्यवती झाले.

12) डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,
.. रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.

13) दीन दुबळ्यांचे गाहाने परमेश्वरानी ऐकावे,
… रावा सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे.

14) दारी होता टेबल, त्यावर होता फोन,
… रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं। कौन?

15) अंगणात होती मेथी, पाणी घालु किती,
… रावांच्या हातात सत्यनारायनाची पोथी.

16) हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी.
… रावांचे नांव घेते… च्या दिवशी.

17) वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस,
…रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस,

18) स्वातंत्र्याच्या होमकुंडात विरांनी घेतली उडी,
…रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सुत्राची जोडी.

19) सत्यनारायण पूजा उखाणा
पषातील धुंद वारा छेडीतो, माझ्या अंगाला,
… रावांचे नांव घेते सुर्यनारायनाच्या साझीला.

20) चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,
… रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.

21) नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे,
…रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.

22) …रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा,
त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा.

23) तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले,
…रावांचे मन, मी केव्हाच जिंकले.

24) केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल,
… राव माफ करतात माझी प्रत्येक भुल.

25) वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल,
… रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

26) घातली मी वरमाला हसले… राव गाली,
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.

27) धरला यांनी हात, वाटली मला भिती,
हळूच म्हणाले… राव अशीच असते प्रिती.

28) नव्हती कधी गाठ मेट, एकदाचं झाली नजरा नजर,
आई-वडी विसरले…रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर,

29) राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,
… रावनी घातला मला मंगळ सुत्राचा हार,

30) पोर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा,
… रावांनी आणला मला मोग-याचा गजरा,

31) चांदीचे जोडवे पतीची खुन,
.. रावांचे नांव घेते,… ची सुन.

32) अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,
आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी.

33) गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
… रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.

34) डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले,
… रावांचे नांव घेतांना, आनंदी मला वाटले,

35) अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा,
… रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा,

36) ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,
… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल !

37) अंगावर घातला ……………..
रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला !
कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर,
… रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर !
पिवळा पितांबर श्री कृष्णांचा

38) गणपतीच्या दर्शनासाठी लागतात लांबच लांब
रांगा………..रावांचे नाव घ्याला मला
कधीही सांगा !

39) लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,
… रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.

40) पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
… रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार.

41) आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,
… राव हेच माझे अलंकार खरे.

42) पजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा,
… रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा.

43) सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान,
… रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.

➡️ वटपौर्णिमा उखाणे मराठी 


नवरीसाठी नवीन मराठी उखाणे | Navari sathi marathi ukhane


1) राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,
… रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला,

2) श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,
… रावांच्या जिवनात आदर्श संसार करीन.

3) जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
… रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.

4) शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्तीपेक्षा
युक्तीने
……… रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने.

5) सुखी संसाराची करतोय,
आम्ही आता सुरुवात …………..
वर ठेवा कायम
तुमचा प्रेमळ मायेचा हात.

6) ओल्याचींब केसांना, टावेल द्यां पुसायला,
… रावांचे नाव घेते शालु द्या नेसायला.

7) हिरव्या हिरव्या जंगलात झाडी
घन दाट
……….रावांचे नाव घेते सोडा माझी वाट.


8) माहेरी साठवले मायेचे मोती
………रावांचे नाव घेऊन
जोडते नवी नाती.

9) जीवनरुपी काव्य दोघांनी वाचावी
……………… रावांची साथ जन्मोजन्मी हवी.

10) ईन मिन साडेतीन ,ईन मिन साडेतीन
………माझे राजा आणि मी त्यांची Queen.


11) हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
…………………. रावांचे नाव घेते
शालू नेसून भरजरी.

12) लावीत होते कुंकू त्यात पडले मोती
लावीत होते कुंकू त्यात पडले मोती
………..रावांसारखे मिळाले पती भाग्य
मानू किती.

13) साडी नेसते फॅशन ची पदर घेते साधा
…………माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा.


14) फेसबुक वर ओळख झाली
व्हाट्सअप्प वर प्रेम जुळले
……राव आहेत खरंच बिनकामी
हे लग्नानंतरच कळले.


15) चांदीचे जोडावे पतीची खुण
चांदीचे जोडावे पतीची खुण
…. ……………. रावांचे नाव घेते
……………… ची सून.

16) सोन्याचे मंगळसुत्र सोनाराने
घडविले,……..रावांचे नाव
घ्यायला सगळ्यांनी अडविले


17) नव्या नव्या आयुष्याची नवी
नवी गाणी
……………माझा राजा आणि
मी त्यांची राणी.

18) पूर्णा नदीच्या काठावर कृष्णा
वाजवितो बासरी
पूर्णा नदीच्या काठावर कृष्णा
वाजवितो बासरी
…………..रावांसोबत मी आले सासरी.


19) english मध्ये चंद्राला म्हणतात moon
मी आहे पाटलाची सून
सांगते सासूबाईमुळे राहिले आमचे
हनिमून.😢

20) कपाळाला कुंकू जसा चांदण्याचा
ठसा
…..रावांचे नाव घेते आता खाली बसा.


स्मार्ट मराठी उखाणे | Smart marathi ukhane 

१) कोरोनाचा धुमाकूळ आणि अवकाळी
पावसाचा कहर ………
रावांचे नाव घेते ऐका सारे जण…

२) खमंग चिवड्यात घालतात
खोबऱ्याचे काप
………………चे नाव घेऊन
ओलांडते मी माप.

३) …………ची लेक झाली,
……………ची सून
………..चं नाव घेते
गृहप्रवेश करून.

४) जमले आहेत सगळे
…………….च्या दारात
…………..रावांचे नाव घेते,
येऊ द्या ना घरात.

५) आमचे दोघांचे स्वभाव
आहेत complimetnry
……………….च नाव घेऊन करते
घरात पटकन Entry.

६) गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली
मी सुबक मेंदी
………….. चे नाव घेण्याची
वारंवार संधी.

७) गार गार माठामधले पाणी
ताजे ताजे ………..
राव माझ्या मनाचे झाले राजे.

८) सासरचे निरंजन माहेरची फुलवतात,
……………..रावांचे नाव घेण्यास
करते मी सुरुवात.

९) सोन्याची घागर अमृताने भरावी
……………रावांची सेवा
आयुष्यभर करावी.

१०) नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची
चांदणी तुमच्याच आशीर्वादाणे
बाग फुलवीत …………..च्या अंगणी.

११) माझ्या गुणीला ……….ला पहा सगळ्यांनी
निरखुन
जणू कोहिनूर हिरा आणलाय आम्ही पारखून.

१२) केसात माळते मी रोज गुलाबाचे फुल
केसात माळते मी रोज गुलाबाचे फुल
……..माफ करतात माझी प्रत्येक भूल.

१३) आला आला तीळ संक्रातीचा सण हा
मोठा …………..
राव सोबत असतांना नाही आनंदाला तोटा.

१३) लाल लाल मेहंदी हिरवागार चुडा,
………….रावांमुळे पडला जीवनात
प्रेमाचा सडा.

१४) काही शब्द येतात ओठातून
…………………..चं नाव येतं मात्र हृदयातुन.

१५) कोल्हापूरला आहे लक्ष्मीचा वास
मी भरवते …………….रावांना जिलेबीचा घास
१६) नव्या नव्या संसाराचा
नाजूक गोड अनुभवही नवा
…………..राव व माझ्या संसाराला तुमचा
अखंड आशिर्वाद हवा.

१७) रुसलेल्या राधिकेला श्रीकृष्ण म्हणतो हास
………………..नाव घेते तुमच्यासाठी खास.

१८) काव्य आणि कविता सागर आणि सरिता
…………..चे नाव घेते तुमच्याकरिता.



हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण निबंध मराठी 
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी
➡️ राम नवमी २०२३ मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण निबंध मराठी
➡️ महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी
➡️ महापरिनिर्वाण दिनी भाषण
➡️ संविधान दिन भाषण मराठी
➡️ अण्णाभाऊ साठे भाषण मराठी
➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध मराठी
➡️ शिक्षक दिन भाषण मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध कविता मराठी
➡️ गुढीपाडवा निबंध मराठी माहिती !
➡️ प्रजासत्ताक दिन भाषण निबंध सुत्रसंचलन
➡️ स्वातंत्र्य दिन भाषण  




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad