google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 १५ ऑगस्ट भाषण मराठी pdf | 15 August bhashan in marathi | १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी
Type Here to Get Search Results !

१५ ऑगस्ट भाषण मराठी pdf | 15 August bhashan in marathi | १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी

  १५ ऑगस्ट भाषण मराठी pdf | 15 August bhashan marathi | १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी | speech on 15 August 2022 | 15 August speech in marathi | स्वातंत्र्य दिन भाषण मराठी | १५ ऑगस्ट मराठी भाषण दाखवा | १५ ऑगस्ट भाषण मराठी लिहून | 10 line speech on 15 August

१५ ऑगस्ट भाषण मराठी pdf

१५ ऑगस्ट भाषण मराठी २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज आपण १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सुंदर सोपे असे भाषण मराठी बघणार आहोत. आज १५ ऑगस्ट २०२२ आपण भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत त्यामध्ये हर घर तिरंगा अभियान आणि स्वराज्य महोत्सव यांचा समावेश आहे.

१५ ऑगस्ट भाषण मराठी pdf | 15 August bhashan in marathi


               " दिन हा भाग्याचा....
                  स्वातंत्र्य दिनाचा,
                चला साजरा करूया....
                 क्षण हा सौख्याचा.”

सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शितल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देशबांधवानों,सर्वांना माझा नमस्कार !

आज १५ ऑगस्ट ! आपला स्वातंत्र्य दिन ! आज आपण सर्वजन इथे भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहेत.
सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...!

१५ ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी खूप खास आहे. १५ ऑगस्ट १९४७ मध्ये आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन आहे.

    मित्रांनो, इंग्रज भारतीयांवर खूप अत्याचार करीत होते. त्या अत्याचारांना कंटाळून भारतीयांनी एकत्र येऊन बंड पुकारले. उठाव, चळवळी, सत्याग्रह, आंदोलने करून इंग्रजांना जेरीस आणले. अखेर १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाला.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, राणी लक्ष्मीबाई अशा अनेक शूरवीरांनी आपले जीवन समर्पित केले. त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझे नमन....!

आपल्या भारतमातेच्या रक्षणासाठी आजही आपले सैनिक सज्ज आहेत. त्यांना माझा सलाम...!

या मंगलदिनी भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात. शाळा, महाविद्यालये, कार्यालये इ. ठिकाणी झंडा फडकवितात तसेच देशभक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते.

भारताने अनेक क्षेत्रात खूप प्रगती किली आहे. भारतात सर्व जाती धर्मांचे लोक राहत असूनही त्यांच्यामध्ये प्रेम, एकता व बंधुत्वाची भावना कायम आहे.

भारत आपली मातृभूमी आहे आणि तिच्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे हे लक्षात ठेवून आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला आत्मनिर्भर व विश्वगुरु बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

                जय हिंद ! जय भारत !१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन १० ओळीचे भाषण | १५ ऑगस्ट अतिशय सोपे भाषण | 10 line speech on independence day 2022

1) नमस्कार.......
     माझे नाव ......... आहे.

2) सर्वप्रथम सर्वांना 'स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

3) आज १५ ऑगस्ट २०२२ आपण भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत.

4)१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस सर्वांसाठी सन्मानाचा व अभिमानाचा आहे.

5) १५ ऑगस्ट १९४७ ला आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.

6) आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीर सैनिकांनी बलिदान दिले.

7) १५ ऑगस्ट २०२२ हा दिवस आपल्याला स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देतो..

8) स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा झंडा फडकवतात

9) स्वातंत्र्य दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे.

10) १५ ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन आहे.

                🙏 जय हिंद 🙏


हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्टला साजरा केला जातो.

Q.2) भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले ?
Ans. १५ ऑगस्ट १९४७.

Q.3) भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष पूर्ण झाली आहेत ?
Ans. ७५ वर्ष.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad