Type Here to Get Search Results !

नारळी पौर्णिमा निबंध pdf मराठी माहिती | narali purnima essay in marathi

 नारळी पौर्णिमा निबंध pdf मराठी माहिती | narali purnima essay in marathi | नारळी पौर्णिमा मराठी माहिती | narali purnima nibandh marathi mahiti

नारळी पौर्णिमा निबंध मराठी माहिती

नारळी पौर्णिमा २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज आपण ११ ऑगस्ट ला येणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा याबद्दलचा अतिशय सुंदर निबंध बघणार आहोत. 

नारळी पौर्णिमा निबंध मराठी माहिती | narali purnima essay in marathi

        " सण आयलाय गो आयलाय गो
                  नारली पुनव चा 
                मनी आनंद मावणा 
                 कोळ्यांचे दुनियेचा.

भारतीय संस्कृतीत नातेसंबंधांना खूप महत्त्व आहे. आपल्या सणवारांनी, रूढी-परंपरांनी ही नात्यांची वीण अधिक घट्ट केली आहे. असा एक सण म्हणजे रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा. या दिवशी भावावरचे प्रेम व आदरभाव व्यक्त करण्यासाठी बहीण भावाला राखी बांधते. याच दिवशी समुद्राविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोळी बांधव त्याची भक्तिभावे पूजा करतात. म्हणून बहीण-भाऊ नाते, कोळ्यांचे आणि समुद्राचे नाते खऱ्या अर्थाने व्यक्त करणारा हा दिवस.

महाराष्ट्राच्या किनारी भागात नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात कोळी बांधव साजरा करतात. कोळी बांधवांची उपजीविका समुद्रावरच अवलंबून असते. समुद्रामुळे त्यांना मासे मिळतात व ते विकून त्यांचा उदरनिर्वाह चालतो.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव वाजत-गाजत पारंपरिक वेशभूषा करून समुद्रकिनाऱ्यावर जमतात. यावेळी गायन-नृत्य याला उधाण आलेले असते.होडीला रंगरंगोटी करून एखादया नववधूप्रमाणे सजवतात. या दिवशी वरुण देवतेसाठी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात. तसेच होडीची पूजा करून होडी समुद्रात नेतात.

वरुण ही पर्जन्याची देवता या पौर्णिमेच्या आधी दोन महिने भरपूर पाऊस पडत असतो. समुद्रावर वादळी वारे वाहतात. समुद्र खवळलेला असतो.त्याचे ते स्वरूप भयंकर असते त्या स्थितीन समुद्रात संचार करणे अशक्य असते. श्रावणी पौर्णिमेपासून समुद्र शांत होतो. मासेमारीला सुरुवात होते.

   या दिवशी नारळाच्या पदार्थाला महत्त्व असते. देवाला नारळ भाताचा आणि ओल्या नारळाची करंजीचा नैवेध्य अर्पण करतात. नारळी पौर्णिमेला अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक मानले जाते तसेच ते सर्जन शक्तीचे प्रतीक मानले आहे.

निसर्गातल्या बदलांपुढे ननमस्तक करणारा आणि नातेसंबंध अधिक दृढ करणारा हा सण आहे.



हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) नारळी पौर्णिमा २०२२ कधी आहे ?
Ans. नारळी पौर्णिमा ११ ऑगस्ट २०२२ वार गुरुवार रोजी आहे.

Q.2) नारळी पौर्णिमा कोठे साजरी केली जाते ?
Ans. नारळी पौर्णिमा महाराष्ट्रत साजरी केली जाते.

Q.3) नारळी पौर्णिमा कोणत्या महिन्यात येते ?
Ans. नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यात येते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad