Type Here to Get Search Results !

गुरूपौर्णिमा भाषण निबंध मराठी माहिती | Guru purnima speech essay in marathi

 गुरूपौर्णिमा भाषण निबंध मराठी माहिती | Guru purnima speech essay in marathi | Guru purnima bhashan nibandh marathi mahiti

गुरुपौर्णिमा २०२२ :- नमस्कार मित्रांनो 13 जुलै 2022 वार बुधवार या दिवशी गुरूपौर्णिमा संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आणि या दिवसानिमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गुरुपौर्णिमा भाषण निबंध मराठी माहिती. गुरुपौर्णिमा निमित्त माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.

गुरुपौर्णिमा भाषण निबंध मराठी माहिती | Guru purnima bhashan nibandh marathi

        गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि
            अखंड वाहणारा झरा.....
        गुरू म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य...
     गुरू म्हणजे निस्सीम श्रध्दा आणि भक्ती...
        गुरू म्हणजे विश्वास आणि वात्सल्य...
गुरू म्हणजे आदर्श आणि प्रमाणतचे मूर्तिमंत प्रतिक....

गुरूपौर्णिमेच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा.......

गुरू त्यांच्याजवळील ज्ञान आणि अनुभवातून शिष्याला मार्गदर्शन करत असतात. जीवन जगत असतांना या ज्ञान आणि अनुभवाची प्रत्येकाला गरज असते. स्वानुभवातुन शिकण्यापेक्षा एखादया व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे जीवनातील समस्या लवकर सोडविता येतात आणि जीवन सुखी-समाधानी होते.

थोडक्यात जीवनात गुरूशिवाय तरणोपाय नाही. म्हणूनच जन्म देणारी आई असो अथवा अध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सद्गुरू असोत खरा गुरू मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. ज्याच्या जीवनात खरा गुरू अथवा सद्गुरू आहे त्याचे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र शिष्याला गुरूं प्रती कृतज्ञता आणि श्रध्दा असणे गरजेचे आहे. यासाठीच गुरूपौर्णिमेचे महत्त्व प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे.

        गुरूब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा 
      गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः 

अर्थात गुरू म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश.
...गुरू ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्या गुरूप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरूपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते कारण आदिगुरू व्यासांचा जन्म या पौर्णिमेला झाला होता.

ज्ञानेश्वरांनी सुध्दा ज्ञानेश्वरी लिहितांना 'व्यासांचा मागोवा घेतु' असे व्यास ऋषींबद्दल गौरवोद्गार - काढले आहेत. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडके बनवतो. त्याचप्रमाणे गुरू सजीव - मानवरूपी व्यक्तिमत्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवितात. गुरूंचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे.आपण त्याच्यापुढे नम्र होऊन ज्ञान सागराप्रमाणे .अथांग आहे. आपण त्याच्यापुढे नम्र होऊन ज्ञानकण वेचले पाहिजे. कारण शेवटी गुरुविण कोण दाखविल वाट.

             हजार चांदण्या शोधण्यापेक्षा
            एकच चंद्र शोधा, आणि हजार
     चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा.हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) गुरुपौर्णिमा 2022 कधी आहे ?
Ans. गुरुपौर्णिमा 13 जुलै 2022 वार बुधवार रोजी आहे.

Q.2) गुरुपौर्णिमा म्हणजे काय ?
Ans. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्या गुरूप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरूपौर्णिमा. 

Q.3) गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाते ?
Ans. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad