Type Here to Get Search Results !

MHT CET 2021 result महाराष्ट्राचा निकाल करा डाउनलोड | How to download MHT CET Result |cetcell.mahacet.org

 MHT CET 2021 Result महाराष्ट्राचा निकाल करा डाउनलोड | How to download MHT CET Result |cetcell.mahacet.org


नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा सेल यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ http://cetcell.mahacet.org/ यावर MHT CET निकाल जाहीर केला आहे.विद्यार्थ्यांनी त्यांचे स्कोअर कार्ड डाऊनलोड करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्डसोबत लॉग इन करणे आवश्यक आहे.
स्कॉरकार्डमध्ये रोल नंबर , percentage मार्क , उमेदवाराचे नाव आणि भेटलेले गुण इत्यादींचा समावेश असतो.

 MHT CET  या परीक्षेच्या गुणांच्या आधारावर आपल्याला फार्मसी, कृषी आणि अभियांत्रिकी या पदवी शिक्षणामध्ये प्रवेश दिला जातो.

 

 MHT CET 2021 result  वेबसाईट लिंक

  1.  http://cetcell.mahacet.org
  1. http://mhtcet2021.mahacet.org


MHT CET 2021 चा निकाल कसा डाऊनलोड करावा

 MHT CET या परीक्षेसाठी एकूण 8 लाख उमेदवार बसले होते.या परीक्षेचे स्कॉरकार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील steps पुर्ण करा.
 
  • गुगल वर जाऊन http://cetcell.mahacet.org/ या वेबसाईट वर जा
  • उमेदवार लॉगिन अशी दिसणारी लिंक शोधा व त्यावर क्लिक करा
  • Log in  असा दिसणारा डेसबोर्ड वर तुमचा वापरकर्ता आईडी आणि पासवर्ड टाकुन लॉग इन करा
  • तुमची परीक्षा MHT CET चा रिझल्ट तुमच्या स्क्रिन वर दिसेल. तर तुमच्या वाटचालीसाठी तो तुम्ही डाऊनलोड करायचा आहे.

महाराष्ट्र सीईटी ही राज्यस्तरीय परीक्षा आहे जी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (BE/B.Tech), फार्मसी, फार्म डी आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते.   हे संगणक आधारित पद्धतीने आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये गणित / जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

MHT CET निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पात्रतेनुसार किंवा गुनानुसार सामायिक प्रवेश प्रक्रिया म्हणजेच फार्मसी, कृषी आणि तंत्रशिक्षण पदवी यासाठी cet cell यावर registration करावे लागते .  CAP चे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.  CAP मध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवारांनी नोंदणी करणे, अभ्यासक्रम आणि महाविद्यालयासाठी प्राधान्ये निवडणे आणि आवश्यकतेनुसार कागदपत्रे अपलोड करणे अपेक्षित आहे.

 सर्व तपशील सबमिट केल्यानंतर, महाराष्ट्र राज्य/अखिल भारतीय उमेदवारांसाठी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाते.  या विरोधात, उमेदवार तक्रार असल्यास, सादर करू शकतात.  तक्रारींचे निराकरण झाल्यानंतर, अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाते.  समुपदेशनादरम्यान, उमेदवारांना MHT CET परीक्षेतील गुण आणि रँकच्या आधारे जागा वाटप केल्या जातात.

⤵️ हे सुध्दा वाचा

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad