Type Here to Get Search Results !

सरदार वल्लभभाई पटेल जयंती २०२१ | मराठी माहिती | sardar Vallabhbhai Patel jayanti 2021

 सरदार वल्लभभाई पटेल जयंती २०२१ | मराठी माहिती | sardar Vallabhbhai Patel jayanti 2021


    
सरदार वल्लभभाई पटेल जयंती २०२१


सरदार वल्लभभाई पटेल मराठी माहिती

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 39 ऑक्टोबर १८७५ रोजी लेवा पाटेल समाजामध्ये त्यांच्या मामांच्या नडियाद (गुजरात), येथील घरी झाला. त्यांचे पूर्ण नाव वल्लभभाई झवेर भाई पटेल असे होते. त्यांचे वडील झवेरभाई हे खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होते. वल्लभभाई पटेल यांच्या आईचे नाव लाडबा होते. वल्लभ भाई पटेल हे झवेरभाई व लाडबा देवी यांचे चौधे पुत्र होते. सोमाभाई, नसिंहभाई व विठ्ठलभाई ही वल्लभभाईची मोठी भावंड होती तसेच काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती.
  वल्लभभाई पटेल यांचा विवाह वयाच्या 18 व्या वर्षी जवळच्या गावातील १२-१३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाला वल्लभभाई पटेल हे मॅट्रीकची परीक्षा बचाच्या २२ व्या वर्षी उत्तीर्ण झाले. त्यांनी पुढील शिक्षण घेत असताना इतरांकडे पुस्तके मागून आणि कुटुंबापासून दूर राहून वकीलीची परीक्षा पास झाले. वल्लभभाई व झवेरबा यांना १९०४ मध्ये मणीबेन आणि १९०६ मध्ये डाहयाभाई मशी दोन अपत्ये झाली. वल्लभभाई पटेल हे पेशाने वकील होते. वकीली करत असताना ते महात्मा गांधीजींच्या प्रभावाखाली आले गुजरातच्या खेडा, बोरसद व बारडोली गावच्या खेडूतांना संघटित करून त्यांनी ब्रिटीश अत्याचारा विरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. वल्लभभाई पटेल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक महत्वाचे नेते होते 'भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.

सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष का म्हणतात

सरदार वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणान्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतिस्थापने करिताही त्यांनी कार्य केले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानाचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. सरदार वल्लभभाई पटेल यांनी मुत्यदोगरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून संस्थाने भारतात विलीन केली. म्हणूनच त्यांच्या या कार्याबद्दल ते भारताचे लोहपुरूष म्हणूनच ओळखले जातात.  

सरदार वल्लभभाई पटेल हे एक भारतीय राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचे महान कार्य व योगदानाबद्दल त्यांना भारतीय महिलांनी 'सरदार' या पदवीने सन्मानित केले. सरदार वल्लभभाई पटेल यांना 'सरदार' व भारताचे 'लोहपुरुष' म्हणून आजही ओळखले जाते. अशा या थोर अशा महापुरुषाचे १५ डिसेंबर १९५० रोजी निधन झाले.


 ⤵️हे सुध्दा वाचा



FAQ 
Q.1) सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म कधी झाला ? 
Ans.सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 39 ऑक्टोबर १८७५ रोजी लेवा पाटेल समाजामध्ये त्यांच्या मामांच्या नडियाद (गुजरात), येथील घरी झाला.
Q.2) सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष का म्हणतात?
Ans.सरदार वल्लभभाई पटेल यांनी मुत्यदोगरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून संस्थाने भारतात विलीन केली. म्हणूनच त्यांच्या या कार्याबद्दल ते भारताचे लोहपुरूष म्हणूनच ओळखले जातात.  
Q.3) सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आईचे नाव काय होते?
Ans.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आईचे नाव लाडबा हे होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad