Type Here to Get Search Results !

वसुबारस मराठी माहिती २०२१ | कथा पुजा महत्व | vasubaras marathi mahiti 2021

 वसुबारस मराठी माहिती २०२१|कथा पुजा महत्व| vasubaras marathi mahiti 2021

    
वसुबारस मराठी माहिती २०२१|


 द्वादशी म्हणजेच वसुबारस ही १ नोव्हेंबर २०२१ वार सोमवार दुसरी १.२१ मी पासुन ते २ नोव्हेंबर मंगळवार ११.३१ मी पर्यंत राहील.या दिवसांपासून दिवाळीची सुरुवात होते.


१ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वास आपल्या सर्व परिवारास माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा 
 ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास
     आंनदाची आणि भरभराटिची जाओ.
               || शुभ दीपावली |
|


दिवाळीचे सहा दिवस

  • वसुबारस -१ नोव्हेंबर २०२१ (सोमवार)
  • धनत्रयोदशी -२ नोव्हेंबर २०२१ (मंगळवार)
  • शिवरात्री -३ नोव्हेंबर २०२१ (बुधवार)
  • नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपुजन-४ नोव्हेंबर २०२१ (गुरुवार)
  • बलिप्रतिपदा आणि दिपाळी पाडवा-५ नोव्हेंबर २०२१ (शुक्र)
  • भाऊबीज - ६ नोव्हेंबर २०२१ (शनिवार)


वसुबारस पौराणिक कथा

वसुबारस हा दिवस साजरा करण्यामागे एक पौराणिककथा सांगीतली जाते.ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी त्यातुन पाच कामधेनुंची उत्पत्ती झाली होती. या कामधेनुंमधे नंदा नावाची एक कामधेनु होती तीला उद्देशुन वसुबारस हा दिवस साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. असं म्हणतात की मानवाच्या जन्मोजन्मीच्या ईच्छा पुर्ण व्हाव्यात आणि गायीच्या अंगावर जेवढे केस आहेत तितकी वर्ष स्वर्गात वास्तव्य करता यावे म्हणुन गोवत्स व्दादशीचा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली

कथा युट्यूब लिंक👉 https://youtu.be/GNk-nsh9a_w

आपला देश शेतीप्रधान आणि कृषीप्रधान असल्याने या दावसाच वेगळच अस महत्व समजल्या जातं. हिंदु संस्कृतीत गायीला गोमाता समजले जाते तिच्या उदरात तेहतीस(३३) कोटी देवांचा वास आहे आणि म्हणुन गायीप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता वसुबारस हा दिवस साजरा केला जातो.

वसुबारस दिवशी गाय वासरांची पुजा कशी करावी

दिवाळीच्या दिवसांमधे पहाटे उठुन दारात रांगोळी रेखाटावी दिवे लावावेत. तिन्ही सांजेला गायीचे पाय धुवुन गाय वासराची पुजा करावी. तीला हळद कुंकु, फुलं, अक्षता वाहाव्यात फुलांचा हार घालावा निरांजन ओवाळावी. गायीच्या वासराची देखील अश्याच पध्दतीने पुजा करावी गोडाधोडाचा घास भरवावा. गायीभवती प्रदक्षिणा घालावी. अनेक ठिकाणी गाय वासरू उपलब्ध होत नाहीत त्यावेळी आपल्या घरी देवपाटाजवळ गायवासराचे चित्र रेखाटावे आणि पुजा करावी.

पुजा युट्यूब लिंक 👉 https://youtu.be/ddBUosaw6ZM

वसुबारस या दिवसाचे महत्त्व

गायीचे दुध (दुधापासुन दही, ताक, लोणी, तुप) अमृतासमान मानले जात असुन अनेक रोगांवर रामबाण उपाय देखील आहे. अश्या गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता या दिवसाचे महत्व सांगितले आहे. आपल्या मुलांना चांगल्या आरोग्याचा लाभ व्हावा आणि ते सुखी व्हावे म्हणुन सुवासिनी या दिवशी पुजा करतात. या दिवशी दुधापासुन बनविलेले पदार्थ खात नाहीत. सवाष्ण स्त्रिया वसुबारस या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खातात.

आपल्याला दूध देऊन आपले पोषण करणाऱ्या या प्राण्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून स्त्रिया ही पूजा करतात. आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. या 'दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

 ⤵️हे सुध्दा वाचा



FAQ
Q.1) वसुबारस कधी आहे ? 
Ans. वसुबारस ही १ नोव्हेंबर २०२१ वार सोमवार दुसरी १.२१ मी पासुन ते २ नोव्हेंबर मंगळवार ११.३१ मी पर्यंत राहील.या दिवसांपासून दिवाळीची सुरुवात होते.
Q.2) वसुबारस या दिवसाचे महत्त्व काय आहे?
Ans.गायीचे दुध (दुधापासुन दही, ताक, लोणी, तुप) अमृतासमान मानले जात असुन अनेक रोगांवर रामबाण उपाय देखील आहे. अश्या गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता या दिवसाचे महत्व सांगितले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad